Read In
गुरूवार 22 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्ररास धनु अहोरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 24:57 पर्यंत आहे. आजपासून त्रिरात्रोत्सवास प्रारंभ होत असून आज सरस्वती पूजनाचा सोहळा घरोघरी होणार आहे. आज षष्ठी ची तिथी 07:39 असून त्यानंतर सप्तमी सुरू होत आहे. आजपासून त्रिरात्रोत्सवास सुरूवात होत आहे. ज्या उपासकांना नऊ दिवस उपोषण करणे शक्य नसेल,जे अशक्त आहेत अशांनी त्रिरात्र किंवा एकरात्रही व्रतांचे आचरण केल्यास श्रीदुर्गा आता इच्छित फळ देते.
मेष:–अपत्यप्राप्तीच्या जोडप्यांना गोड बातमी कळेल. नोकरीत आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेतली जाईल. मानसिक आजार असलेल्यांना आरामाची व समुपदेशनाची गरज भासेल. श्री जगदंबेच्या कृपदृषीचा लाभ होईल.
वृषभ :–औषधाच्या शेअर्समधे गुंतवणूक करण्यास आजचा दिवस चांगला आहे. महिलांनी श्री दुर्गा मातेचे पूजन करून नियमात रहावे. भागिदारीतील कामातील ढिलाई त्रासदायक ठरेल. नवीन कपड्यांची काळजी घ्या.
मिथुन :–श्री महालक्ष्मीच्या कृपेने आर्थिक प्रश्र्न सुटू लागतील. आजचे सरस्वती पूजन थाटामाटात करून प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करा. आनंदाच्या भरात स्वतःची मौल्यवान गोष्ट देऊन टाकाल. बहिणीकडील खुशाली विचारा.
कर्क :–विद्यार्थी वर्ग नवीन विषयाच्या बाबतीत विचार करतील. आरोग्याची तपासणी करण्यात वेळ लावू नका. घरातील अत्यावश्यक नसलेली वस्तू घेऊन खर्चात भर घालाल. आज बरीच कामे मार्गी लागतील. उधार उसनवार पैसे देण्यापूर्वी विचार करा.
सिंह :–जून्या गुंतवणूकीतून फायदा होईल. राजकिय मंडळीना समाजासाठी करण्याची संधी मिळेल. कामाच्या ताणाने आजारपण आल्यासारखे वाटेल पण येणार नाही. श्री जगदंबेच्या कृपेने मानसिक तणावावर मात कराल.
कन्या :–बहिणभावंडाचा संवाद आईवडिलांना सुखावून जाईल. कलाकार मंडळींचे समाजाकडून कौतूक होईल. सुग्रास भोजनाचा लाभ होईल. लहान मुलांची चंचलता वाढेल व धडपड पण वाढेल. महत्वाची वस्तू सांभाळा.
तूळ :–नवनवीन प्रयोग करून बघण्याच्या दृष्टीने आखणी कराल. विजेच्या उपकरणांपासून सावध रहा. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. आज श्रीदुर्गा मातेच्या पूजनाने व बीजमंत्राने परिसराचे सोने कराल.
वृश्र्चिक :–फँशन डिझायनर्सना चांगले उत्पन्न मिळेल. वैयक्तिक बाबतीत स्वच्छता पाळावी. लहान मुलांना उलटी जुलाबाचा त्रास संभवतो. महिलांनी सासूबाईंची काळजी घ्यावी. वडिलांच्या मनाला आनंद देणार्या घटना तुमच्याकडून घडतील.
धनु :–व्यवहारातील पारदर्शकता महत्वाची ठरेल. आज शेअर्स मधील उलाढाल नुकसानी कारणीभूत होईल. विवाहेच्छूंना योग्य जोडीदाराची निवड करता येईल. स्वतंत्र व्यवसाय करणार्यांना योग्य दिशा सापडतील.
मकर :–कोणताही निर्णय घेताना भावनेच्या आहारी जाऊ नका. राजकारणी लोकांनी कोणतेही व्यवहार करू नये. रक्तदाबाचा त्रास असणार्यांनी काळजी घ्यावी. व्यवसायात नवीन गिर्हाईकांमुळे आर्थिक आवक वाढेल.
कुंभ :–धार्मिक कामातील सहभागामुळे प्रतिष्ठा वाढेल. श्री दुर्गा मातेच्या कृपेने समाजाचे प्रेम जाणवेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल पण डिसचार्ज मिळणार नाही.
मीन :–मुलांचे अनाहूत सल्ले लगेच स्विकारू नका. नुकसानीचा विचार करूनच पैसे गुंतवा. कष्टाचा मोबदला पुरेपुर मिळेल. स्पर्धकांना असूया वाटेल तरी स्वत:ची आर्थिक परिस्थिती ऊघड करून सांगू नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण राहील.
|| शुभं – भवतु ||