Read In
बुधवार 21 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज रास धनु अहोरात्र. चंद्रनक्षत्र मूळ 25:12 पर्यंत नंतर पूर्वषाढा. अश्विन नावरात्रातीलबसरी सरस्वती देवीची स्थापना ही मूळ नक्षत्रावर असते. ज्यांना खूप शिकवायची इच्छा आहे त्यांनी मूळ नक्षत्रावर श्री सरस्वती देवीचे आवाहन करावे. व पूर्वाषाढा नक्षत्रावर पूजा, होम व उपोषण करावे.
सरस्वती अवहानापासून दि दुर्गामातेच्या उपासनेने श्री नवारण मंत्राचा पाठ करावा.
आज नवरात्राची पाचवी माळ असून पंचरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे.
मेष :- वडिलांबरोबर पूजेचा श्री दुर्गामातेच्या पूजेचा लाभ घ्या. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. कुटुंबात जोडीदाराबरोबर बौध्दिक चकमक होईल. खरेदीचे बेत करू नका.
वृषभ:- सरकारी अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार जपून करावेत. वडिलांकडील नातेवाईकांचे येणे होईल. कुटुंबात आनंद व उत्साह वाढेल. वरसाहक्कांच्या चर्चेला तोंड फुटेल. श्री दुर्गामातेच्या कृपेने लहान मुलांवरील संकट टळेल.
मिथुन:- महिलांना धाडस करावेसे वाटेल. श्री दुर्गामातेच्या पूजनामध्ये तरुण महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढेल. विद्यार्थी बुद्धीचातुर्याने स्पर्धा जिंकतील. वयस्कर मंडळींना पोटदुखीचा त्रास जाणवेल.
कर्क:- महिला वर्ग पुरुषांच्या बरोबरीने यश संपादन करेल. आजोळकडील मंडळींच्या बुद्धीचा प्रभाव पडेल. तरुण मुलांच्या मनात आई वाडीलांविषयी अढी निर्माण होईल. उच्च शिक्षित पती पत्नींमध्ये बौद्धिक खटके उडतील.
सिंह:- चैनीच्या/आवडीच्या वस्तूंची खरेदी कराल. नोकरीत महत्वाच्या कामासाठी दुसऱ्या ऑफिसमध्ये बदली होईल. बागेत किंवा शेतीचे काम करणाऱ्यांनी जनावरांपासून सावध राहावे. लहान मुलांच्या बोलण्याला आवर घालावा लागेल.
कन्या:- श्री दुर्गामातेच्या कृपेने आजचा दिवस सुख समाधान व आनंदाचा जाणार आहे. तरुण वर्ग हौसेमौज करण्यासाठी मोठा खर्च करेल. उच्च शिक्षित महिला आपले काम नव्या स्वरूपात सार करतील. तरुण मुलांना अपचनाचा त्रास जाणवेल.
तूळ:- बुद्धीच्या जोरावर जग जिंकण्याची स्वप्ने बघाल. आपल्या जवळील पैसाच इतरांना अंदाज देऊ नका. आई जगदंबेच्या सेवेसाठी मोठा खर्च कराल. महत्वाच्या कामासाठी लहानसा प्रवास संभवतो. आर्थिक व्यवहार जपून करावेत.
वृश्चिक:- मनाचा थांगपत्ता इतरांना लागणार नाही. मनासारखी उधळपट्टी कराल. मनावर विचारांचे आक्रमण होऊ नये यासाठी श्री जगदंबेची उपासना वाढवा. व मन:शांतीसाठी देवी पूजनामध्ये सहभाग घ्या.
धनु:- सामाजिक कार्यात इतरांशी संवाद साधान्याची संधी मिळेल. ज्योतिषी, प्रवचनकार व पुजारी यांना श्री दुर्गामातेचे दैवी शक्तीचा अनुभव येईल. लहान मुलांचा लहरीपणा वाढेल.
मकर:- कामातील ताणतणाव कमी करण्यासाठी मॅन:शांतीची गरज भासेल. एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीकडून उपाय घ्यावा. जमा व खर्चाचा मेळ लागणार नाही. टोकदार वस्तूंपासून लहान मुलांच्या डाव्या डोळ्याचे रक्षण करा.
कुंभ:- श्री दुर्गामातेची पूजा अर्चा करताना स्वतःला हरवून जाल. समाजातील गरजू लोकांकरिता मोठा खर्च कराल. लहान भावंडांच्या लहरीपणाचा त्रास होईल. प्रवासात मानसिक व शारीरिक त्रास संभवतो. वडिलांचा आदर वाटेल.
मीन:- मनातील राग उफाळून येईल. तरी रागावर नियंत्रण ठेवा. आज आवक जावक समसमान होणार आहे. प्रवासाचा बेत आखु नका. कुटुंबात आनंदाचे व समाधानाचे वातावरण राहील.सरकारी कामे युक्तीने करून घ्याल.
।।शुभं भवतू ।।
Dhanyawad Tai
Tai Aabhari Aahe