navratri day 2

सप्तशती च्या ग्रंथातील सिद्ध मंत्रांची माहिती

Read In

 

श्री दुर्गायै नम:

श्री प्तशती ग्रंथातील सिद्ध मंत्रांची माहिती

navratri day 3

श्री मार्कंडेय पुराणातील देवीमहात्ममधे ‘श्र्लोक ‘, अर्धश्र्लोक’, व उवाच असे मिळून एकूण ७०० मंत्र आहेत. यालाच आपण श्री दुर्गा सप्तशती असे म्हणतो. हा ग्रंथ मनुष्याला धर्म, अर्थ, काम, व मोक्ष हे चारही पुरूषार्थ ांची प्राप्ती करून देणारा आहे. जी व्यक्ती या ग्रंथाचे यथाविधी पारायण वाचन करते त्याला त्याच्या ईच्छापूर्ती चा अनुभव येतो. म्हणूनच आज आपण या सप्तशती ग्रंथातील कांही सिद्ध मंत्र बघणार आहोत. तुम्ही श्रद्धेने या मंत्रांची उपासना, नामस्मरण केले तर तुम्हालाही नक्कीच त्याचा अनुभव येईल.

आज आपल्या हातात आहेत. कोरोनाच्या संकटामुळे आपण कोणी कोणाला भेटू शकत नाहीय पण या मंत्राचा सामूहिक पद्धतीने जप करू शकतो.

मंत्र पहिला :- सामूहिक कल्याणासाठी.

अर्थ :— सामाजिक हिताचे विशिष्ट कार्य सिद्धीस जाण्यासाठी देवी आई जगदंबेला  प्रार्थना करावी. प्रथम संकल्प करून जपाची वेळही निश्चित करावी. हा मंत्र एकट्यानेही करता येतो पण इतरांचा सहभाग घेतल्यास त्याची फलप्राप्ती लवकर होते.

मंत्र पहिला :–देव्या यया ततमिदं जगदात्मशक्त्या l

              निश्शेषदेवगणशक्तिसमूहमूर्त्या l

             तामम्बिकामखिलदेवमहर्षिपूज्यां  भक्त्या नताः स्म विद्धातु शुभानि सा नः ll

************************

मंत्र दुसरा :–विश्र्वातील अशुभ आणि भय  यांच्या नाशासाठी

अर्थ :– संपुर्ण जगावर आलेले संकट दूर व्हावे, त्याचप्रमाणे दुष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा म्हणून आई भगवती दुर्गा मातेची प्रार्थना करावी. प्रथम संकल्प करून जपाची वेळही निश्चित करावी. हा मंत्र एकट्यानेही करता येतो पण इतरांचा सहभाग घेतल्यास त्याची फलप्राप्ती लवकर होते.

मंत्र दुसरा :–यस्याः प्रभाव मतुलं भगवाननन्तो ब्रम्ह हरच्छ न हि वक्तुमलं भलं च l

             सा चण्डिकाखिलजगत्परिपालनाय  नाशाय चाशुभभयस्य मतींम करोतु ll

*************************

मंत्र तिसरा :–विश्र्वाच्या कल्याणासाठी.

अर्थ :– जगाचा नाश करणाऱ्या विनाशक व विघातक प्रवृत्ती पासून जगाचे रक्षण व्हावे या हेतूने या मंत्राचा जप सामूहिक पद्धतीने केल्यास सर मानव जातीचे कल्याण होऊन शांतता प्रस्थापित होते.

मंत्र तिसरा :– या श्री: स्वयं सुकृतिनां भवनेष्वलक्ष्मी: पापात्मनां कृतधियां ह्रदयेषु बुद्धि😐

                  श्रद्धा सतां कुलजन प्रभवस्य लज्जा  तां त्वां नता : स्म परिपालय देवि विश्र्वम् ll

**************************

 मंत्र चौथा :--विश्र्वव्यापी संकटांचा नाश होण्यासाठी.

 अर्थ :– कोणत्याही नैसर्गिक आपत्त्ती पासून संरक्षण करण्यासाठी जसे रोगराई, महापूर, भूकंप यापासून संपूर्ण जगाचे रक्षण              व्हावे म्हणून ह्या जपाचे पाठ करावेत. श्री जगदंबा आईला प्रार्थना करून हा जप सामूहिक पद्धतीने केल्यास लवकर फलप्राप्ती होते. या मंत्रांच्या प्रभावाने सनत्कुमारांची कौमारी शक्ती सहाय्य करते.

मंत्र:–चौथा :-देवी प्रपन्नार्तिहरे प्रसीद

                     प्रसीद मातर्जगतोSखिलस्य l

                     प्रसीद विश्वेश्वरी पाहि विश्वं l

                      त्वमीश्वरी देवि चराचरस्य l|

*****************************

 

मंत्र :– पाचवा:- महामारीच्या नाशासाठी

अर्थ:- देशामधे, गावामध्ये आलेल्या महामारीच्या संकटापासून रक्षण करण्यासाठी या मंत्राचा वयक्तिक व सामूहिक पद्धतीने संकल्प करून जप केल्यास श्री महकालीच्या कृपेने आपल्या सर्वांचे नक्कीच रक्षण होईल.

मंत्र:–पाचवा:- जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी

दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वध नमोsस्तुते l|

 

ll शुभं – भवतु  ll

 

 

One thought on “सप्तशती च्या ग्रंथातील सिद्ध मंत्रांची माहिती

  1. खूप ज्ञान पूर्ण भक्तिमय यश देणारे शांती देणारे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *