Read In
सोमवार 19 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज सोमवार चंद्ररास वृश्र्चिक अहोरात्र, चंद्र नक्षत्र अनुराधा 27:51 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. वरील नक्षत्रांच्या कालावधीचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार नक्षत्रीय फलादेश देत आहे. आज सप्तरात्रोत्सव आज आश्र्विन नवरात्राचा तिसरा दिवस असल्याने
आज आश्र्विन शुक्लपक्ष तृतीया म्हणजे नवरात्राचा तिसरा दिवस. आज सप्तरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. या नवरात्राच्या नऊ दिवसात तुमची सुरू असलेली उपासना अशीच सुरू राहूदे. नवरात्रामधे सप्तशती पाठ/ देवी महात्म वाचन, कुंजिका स्तोत्र, श्रीमहालक्ष्मीअष्टक, श्रीसुक्त, श्री अर्गला स्तोत्रम सप्तश्लोकी दुर्गास्तोत्रम इत्यादींचे वाचन केल्यास ते फलदायी होते. तरी तुमच्या अडचणींनुसार त्यावर समाधान देणारे वाचन करावे. त्याबाबत तुम्हाला जर माहित नसेल तर देववाणीच्या फोनवर मेसेज केल्यास तातडीने सांगितले जाईल.
रोज एका कुमारिकेची पूजा करावी. कुमारिकांची नांवे अनुक्रमाने अशी आहेत.
१)दोन वर्षाची ती कुमारिका… २) ३ वर्षाची ती त्रिमूर्ती… 3) ४ वर्षाची था कल्याणी.. ४) ५ वर्षाची ती रोहिणी.. ५) ६ वर्षाची ती काली . ६) ७ वर्षाची ती चंडिका… ७) ८ वर्षाची ती शांभवी ८) ९ वर्षाची ती दुर्गा… ९) १० वर्षाची ती सुभद्रा. तरी याप्रमाणे त्या कुमारिकेची पाद्धपूजा करून , तिला गोडाधोडाचे साग्रसंगीत जेवण देवून तिच्या उपयोगाची वस्तु व वस्त्र द्यावे तिची पूजा करताना गंध, पुष्प अक्षता, यांनी पूजन करावे.
मंत्र म्हणावा
मंत्राक्षरमयीं लक्ष्मी मातृणां रूपधारिणीम् | नवदुर्गात्मिकां साक्षातकन्यामावाहयाम्यहम्||
मेष :– आज तुमची तब्बेत काहीशी नरमगरम राहील. ज्यांना उपवास सोसत नाही त्यांनी उपवासाऐवजी एकवेळ जेवण व एकवेळ उपवास असे करावे. नवीन घर घेण्याच्या विचारात असाल तर आज व उद्यापासून शोधमोहीम सुरू करायला हरकत नाही. नोकरी नसलेल्यांनी नोकरीसाठी जोमाने प्रयत्न करावेत.
वृषभ :–व्यवसायात अचानक आश्चर्यकारक पण समाधान देणारा अनुभव येईल. आई वडिलांची सेवा करण्याची संधी कोणत्याही परिस्थितीत गमावू नका. नवरात्रातील देवीची उपासना तुम्हाला शारिरीक त्रास कमी करणारी आहे. आजारी मंडळीना जरी स्नान करणे जमले नाही तरी हातपाय धुवून डोक्याला पाण्याचा हात फिरवून श्री दुर्गा मातेची उपासना करावी.
कुमारिका मिथुन:–नोकरीतील कामाचा त्रास श्री दुर्गा मातेच्या कृपेने कमी होत आहे असे जाणवेल. भावाची चौकशी करणे महत्वाचे आहे हे लक्षांत घ्या. महिलांनी सध्या फक्त उपासनेकडे लक्ष द्यावे बाकी सगळे गौण. व्यावसायिक मंडळीना नवीन मार्ग सापडतील.
कर्क :–मुलाकडून आईवडीलांना सुखद अनुभव येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. ज्याना शक्य आहे त्यांनी आज अन्नधान्याचे दान करावे.श्रीदुर्गामातेची उपासना करावी.
सिंह :आजवर केलेल्या उपासनेचे फलित मिळत असल्याचा अनुभव येईल. सप्तशती ची पोथीवाचन करणार्यांना दिवसभरात वेगळाीच संवेदना मिळेल. बुद्धीच्या जोरावर वाद घालण्याच्या ईच्छेपुढे तुमचे कांही चालणार नाही.
कन्या :– स्वतःची पदरमोड करून इतरांची सोय बघाल. श्री दुर्गा मातेच्या बीजमंत्राने घरातील वातावरण बदलून जाईल व वेगळी जाणीव होईल. कुटुंबातील रेंगाळलेल्या प्रश्र्नांना चर्चेतून सोडवाल.
तूळ :–बौद्धीक क्षेत्रातील मंडळीना आज समाजाला प्रबोधन करण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांना समाधान देणार या गोष्टी घडतील. श्री दुर्गा मातेच्या कृपेने मानसिक ताण कमी होईल.
वृश्र्चिक :–आज तुमच्या मनालाही महत्व प्राप्त होणार आहे. वडिलांकडील नात्याची चौकशी करावी लागेल आणि त्यासाठी आर्थिक तजवीज करावी लागेल. श्री दुर्गा मातेच्या पूजेने मनाला समाधान मिळेल. आरोग्याचे नियम काटेकोरपणाने पाळावे.
धनु :–सामाजिक स्तरावर तुम्हाला गुरूतुल्य अनुभवले जाईल. तुमच्या वाणीतील शक्तीने सहकारी भारावून जातील. नोकरीतील कामाचा आवाका आवरणार नाही. श्री दुर्गा मातेच्या बीजमंत्राने परिसराचे सोने कराल.
मकर :–कामातील केलेल्या दिरंगाई साठी इतरांना दोष देऊ नका. लोकांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करा. श्री दुर्गा मातेची पूजाअर्चा करण्याचा मान मिळेल. सामाजिक स्तरावर तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल.
कुंभ :–बर्याच दिवसापासूनचे मनातील विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल. सामुहिक कामातील पुढार महत्वाचा राहिल. श्री दुर्गा मातेच्या कार्यक्रमात अग्रक्रमाने सहभागी व्हाल.
मीन :–दवाखान्यातील अँडमिट असलेल्या मंडळीना उद्याला डिसचार्ज मिळेल. कुटुंबातील अडचणींवर मार्ग निघेल. श्री दुर्गा मातेच्या पूजेच्या खर्चाची जबाबदारी स्विकाराल. मानसिक बळ वाढेल.
|| शुभं – भवतु ||
Aabhari Aahe Tai