Read In
साप्ताहिक भविष्य
साप्ताहीक भविष्य रविवार 18 आँक्टोबर ते शनिवार 24 आँक्टोबर 2020
साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.
या सप्ताहात चंद्र तूळ, वृश्र्चिक, धनु व मकर या राशीतून भ्रमण करणार आहे. 18 रविवार 24:26 पर्यंत तूळ व नंतर धनु चंद्रनक्षत्र स्वाती सकाळी 08:50 पर्यंत व नंतर विशाखा सुरू होत आहे. सोमवार 19 रोजी वृश्र्चिक अहोरात्र चंद्रनक्षत्र अनुराधा 27:51 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. मंगळवार 20 रोजी वृश्र्चिक 26:11 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 26:11 पर्यंत व नंतर मूळ. बुधवार 21 रोजी धनु अहोरात्र, चंद्र नक्षत्र मूळ 25:12 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा. गुरूवार 22 रोजी धनु अहोरात्र, चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा 24:57 पर्यंत व नंतर उत्तराषाढा. शुक्रवार 23 रोजी धनु 07:01 पर्यंत नंतर मकर. चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 25:27 पर्यंत व नंतर श्रवण. शनिवार 24 रोजी मकर अहोरात्र. चंद्रनक्षत्र श्रवण 26:37 पर्यंत व नंतर धनिष्ठा. याप्रमाणे प्रत्येक नक्षत्रीय कालावधी च्या अभ्यासाने व रोजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रविवार 17 पासून नवरात्र सुरू झाले आहे.
- सोमवारी सप्तरात्रोत्सव नवरात्रास प्रारंभ होत आहे.
- मंगळवारी ललितापंचमी आहे व विनायक चतुर्थीचा अंगारकी योग आहे.
- बुधवारी पंचनवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. सरस्वती आवाहन.
- गुरूवारी सरस्वतीपूजन. त्रिरात्रोत्सवारंभ.
- शुक्रवारी महालक्ष्मी पूजन व घागरी फुंकणे.
- शनिवारी दुर्गाष्टमी,एकरात्रोत्सवारंभ. व महानवमी उपवास.
- रविवारी महानवमी व विजयादशमी, नवरात्रोत्थापन.
मेष:–बौद्धीक क्षेत्रातील मंडळीना 18 व 19 ला अनेक अडचणींवर मात करण्यासाठी योग्य मार्ग सापडेल. कांहीही कष्ट न करता दुसर्यांना तुमच्याकडून मिळालेल्या आनंद व समाधान मुळे तुम्हाला बक्षिस मिळेल. . या नवरात्राच्या कालावधीत जेवढी देवीची उपासना कराल त्याचे फळ चांगले मिळेल. लहान मुलांच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी श्री दुर्गा देवीला शरण जा व मुलासाठी वेगळ्या ऊपासनेस सुरूवात करा. 22 व 23 ला आईवडिलांशी अचानक संपर्क होईल किंवा भेटही घडेल.
वृषभ :–मनातील मळभ दूर करण्यासाठी श्री महालक्ष्मीची उपासना व नामस्मरण सुरू करावे. नव्याने व्यवसायाचा विचार करत असलेल्यांनी 21, 22 , व 23 रोजी मनातील कल्पना साकार कराव्यात. 23 चे महालक्ष्मी पूजन लाभदायक राहील. 19 ला जूने येणे वसूल होईल. 25 चा दसरा एकदम सुखसमाधानाचा जाईल व आवडत्या वस्तूंची खरेदी होईल. मनःशांती व ऐहिकसुखासाठी श्रीत्रिपुरसुंदरीस्तोत्रम् वाचावे.
मिथुन :–भाग्य म्हणजे काय याचा अनुभव येईल. एखाद्या दैवी चमत्काराचा अनुभव येईल. श्रीमहालक्ष्मी च्या पूजनाचा आनंद घ्याल. वयस्कर मंडळीना देवीच्या सेवेची संधी मिळेल. महिलांना उपासनेचे महत्व कळेल. नोकरीत अडचणी असलेल्यांनी संकल्प करून श्री महाकालीची उपासना सुरू करावी. कुटुंबातील मंडळीनी 23 व 24 रोजी पासून सर्वानी एकत्र संकल्प करून श्री कुलदेवतेची सामुहिक उपासना सुरू करावी.
कर्क :–12 व 20 रोजी प्रथम श्रीगजाननाला साकडे घालून मग संकल्प करावा व श्रीदेवीकवच वाचण्याचा प्रारंभ करावा. कुटुंबातील सतत चालणार्या मतभेद, वादावादीचा त्रास कमी होउन कुटुंबातील एकी टिकण्याकरिता श्री देवीकवचाचे मोठ्याने वाचन करावे व इतरांनी ऐकावे. कुळाचारही तितकेच महत्वाचे आहेत हेलक्षांत घेऊनकुलस्वामिनीची माफी मागून शारिरीक व्याधी तून मुक्त करण्याची विनंती करावी. 22 व 23 ला विद्यार्थ्यांनी श्री सरस्वतीला नमस्कार करून अभ्यासाला सुरूवात करावी. व इच्छित फलप्राप्तीसाठी प्रार्थना करावी.
सिंह :–या नवरात्रातील 19 ते 22 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या दिशा ठरवून श्रीदेवीमातेचा आशिर्वाद घ्यावा. नोकरदार मंडळीनी नोकरीतील अडचणी दूर होऊन आर्थिक बाजू भक्कम होण्याकरता श्रीमहालक्ष्मीची उपासना सुरू करावी. कुटुंबातील मंडळीनी एकत्र संकल्प करून श्रीमहालक्ष्मीअष्टक वाचण्यास सुरूवात करावी. संततीच्या प्रतिक्षेतील पतीपत्नीनी कुमारिकेची पूजा करून गोड खाऊ व वस्त्र द्यावे. श्री वंशवृद्धिकरं वंशकवचम् चे वाचन करावे.
कन्या :– वास्तविक तुम्हाला सूर्याची उपासना करणे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपली आंतरिक ऊर्जा वाढवण्याकरिता श्रीदुर्गास्तोत्राचे वाचन करण्याचा संकल्प करावा. शारिरीक व्याधी असलेल्यांनी 20 पासून देव्यपराधक्षमापनस्तोत्रम् याचे संकल्प करून वाचन करावे. वाहन चालवण्याचा व्यवसाय असलेल्यांनी श्रीभगवत्याकीलकस्तोत्रम् याचे संकल्प करून वाचन करावे. मंगळवारी किंवा शुक्रवारी किमान एकदा तरी श्री महाकाली देवीचे दर्शन घ्यावे.
तूळ :–मानसिक त्रास, व मनातील दुःखावर उपाय सापडत नसेल तर श्रीलक्ष्मीसूक्ताचे वाचन करावे. प्रथम श्रीमहालक्ष्मीची पूजा करून संकल्प करावा. व्यवसाय करणार्यांनी नित्य नेमाने श्री महाकाली मातेचे दर्शन घ्यावे.वयात आलेल्या मुलींनी ललितापंःचरत्न स्नानानंतर रोज म्हणावे. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागत असलेल्यांनी 24 रोजी श्री कुलस्वामिनीला सर्व वस्तुस्थिती सांगून रोज श्री लघुसप्तशतीस्तोत्रम् वाचण्याचा संकल्प करावा.
वृश्र्चिक :–मानसिक शांती नसलेल्यांनी श्री देवीसूक्तम् चे पाठ करावेत. शारिरीक त्रास दूर करण्याकरीता श्री महाकाली चा जप करून श्रीदेवीक्षमापनस्तोत्रम् चे वाचन संकल्प करून करावे. 19 व 20 रोजी वर्षभराचे जे सांगायचे ते सांगून टाका. व श्रीनवदुर्गांचा कृपाप्रसाद घ्या. 24 च्या दिवशी महत्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नये. कुटुंबात कोणालाही शारिरीक दोष किंवा त्वचारोग असल्यास प्रथम कुलस्वामिनी समोर संकल्प करून श्रीशीतलाष्टकाचे पाठ सुरू करावेत.
धनु :–19 व 20 रोजी प्रथम श्री गजाननाची प्रार्थना करून श्री महालक्ष्मीचे ध्यान करावे. व्यवसायासाठी कर्जाचा विचार करत असणार्यांनी श्री चण्डीकवचम् चे पाठ करण्याचा संकल्प करावा. ज्यांनी गुरूमंत्र घेतला आहे त्यांनी प्रथम श्री गुरूमाउलीचे ध्यान करून मगच या गोष्टी कराव्यात. लहान मुलांना अग्नी पासून भय असेल तर त्याच्यासाठी मुलांच्या आईवडिलांनी प्रथम संकल्प करून भगवत्याकीलकस्तोत्रम् चे पाठ करावेत.
मकर :– कष्टाचे काम करणार्या व जबाबदारीचे काम करणार्यानी श्री महाकालीची उपासना करावी. या नवरात्राच्या कालावधीपासून रोज लघुसप्तशतीस्तोत्रम् वाचावे. 20 रोजी श्री गणेशाचे ध्यान करून, नंतर श्री कुलस्वामिनी ची परवानगी घेऊन वाचनास सुरूवात करावी. विद्यार्थ्यांनी 22 रोजी 10:43.ते 12:49 या धनु लग्नावर अभ्यासास सुरूवात करावी. अध्यात्मिक अभ्यासकांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री दुर्गादेवी स्तवन वाचावे. ध्यान धारणेस मदत होईल.
कुंभ :–20 रोजीच्या बुधाच्या नक्षत्रावर व 22 च्या शुक्राच्या नक्षत्रावर नवीन दुकानाचा किंवा व्यवसायाचा श्रीगणेशा करावा. 23 चे श्रीमहालक्ष्मीपूजन लाभ करून देईल. बँक, व कर्ज प्रकरणांसाठी श्री महाकाली देवीला शरण जाऊन सांकडे घालावे व श्री कनकलक्ष्मीधारास्तवः या स्तोत्राचे वाचन सुरू करावे. सर्व कामे सुखकर होतील. शारिरीक व्यांधीनी त्रासलेल्यानी संकल्प करून उत्तम आरोग्यासाठी लघुसप्तशतीस्तोत्रम् वाचावे.
मीन :–19 व 20 रोजी अध्यात्मिक अभ्यासकांनी आपले ध्यान चांगले लागण्यासाठी श्री दुर्गादेवी स्तवन वाचावे. विद्यार्थ्यांनी उज्वल यशाकरता श्री ललितापंचरत्नम्23 च्या महालक्ष्मीच्या पूजनात सहभाग घ्यावा. गूढविद्ध्येच्या अभ्यासकांनी श्री रोज लघुसप्तशतीस्तोत्रम् वाचण्याचा संकल्प करावा. कुटुंबातील वाद मिटून एकी साधण्याकरीता श्रीदुर्गाकवचम् वाचावे.
|| शुभं – भवतु ||
Thank you Tai