navratri day 2

आश्र्विन नवरात्र 18 आँक्टोबर 2020 लेख दुसरा

Read In

 

आश्र्विन शुक्ल प्रतिपदा नवरात्रारंभ 17 आँक्टोबर 2020 लेख दुसरा

रविवार 18 आँक्टोबर 2020 :-  आश्र्विन नवरात्रातील देवीच्या पूजेचा गर्भितार्थ :-

navratri day 2

शनिवार 17 पासून आश्र्विन नवरात्र सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी घटस्थापना, होऊन देवी विराजमान झाली आहे.

आता रोज देवीची पूजा करायची म्हणजे नक्की काय करायचे याचा विचार करूया. ज्याप्रमाणे आपण दैनंदिन नित्यकर्म करताना जसजसे करतो त्याचप्रमाणे या नवदुर्गांची आपण  पूजा करणार आहोत.  कालच्या लेखात आपण मानसपूजा पाहिली आजच्या लेखात आपण देवीला रोज काय काय अर्पण करायचे याची माहिती घेणार आहोत.

प्रतिपदेला म्हणजे पहिल्या दिवशी केशसंस्कारद्रव्ये दिली आहेत. द्वितीयेला केस बांण्याकरीता तेल द्यावयाचे आहे. तृतीयेला आरसा, सिंदूर अर्पण करावा म्हणजे देवीला तिचा चेहरा आरशात दाखवावा. . चतुर्थीला केसविंचरावेत नेत्रभूषण, तिलक, व पंतामृत (दुध, दही, तूप, मध, व साखर यांचे मिश्रण) पंचमीला सकाळीच शुद्ध जलाने स्नान घालावे व यथाशक्ती अलंकार व जी देता येतील ती सौंदर्यप्रसाधने द्यावीत.या दिवसाला उपांगललिताव्रत म्हणतात. षष्ठी च्या दिवशी संध्याकाळी बेलाच्या झाडाजवळ देवीची व बेलाच्या फांदीची पूजा करावी.  अशा नियम आहे पण आपण षष्ठीला बेलाची फांदी आणून त्या फांदीची व देवीची पण पूजा करतो. सप्तमीस सकाळी देवीबरोबर बेलाची फांदी( घरामधे आणून तिचे पूजन करावे.) सहित देवीला पत्रिका ( धणे, केळी,  हळद ,  दारूहळद, शेवरी, बेल , डाळींब, अशोक व बहावा या नऊ पत्रिका) वाहून  पूजन करावे.येथे आपल्याला जे शक्य आहे ते वाहतो. अष्टमी उपवास करून आपल्या ऐपतीनुसार पूजा करावी. नवमीला चंडिकेची पूजा करून जागरण करून व बलिदान करावे. (कोहळा द्यावा.) दशमीच्या दिवशी म्हणजे दसर्‍याला देवीचे विसर्जन वाजत गाजत करावे.अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरातील देवीचा पूजाविधी करता येईल.

||शुभं – भवतु ||

One thought on “आश्र्विन नवरात्र 18 आँक्टोबर 2020 लेख दुसरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *