daily horoscope

दैनिक राशीभविष्य शनिवार 17 आँक्टोबर 2020

Read In

 

शनिवार 17 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

आज दिवसरात्र चंद्र रास तूळ असून चंद्र नक्षत्र चित्रा दुपारी 11:51 पर्यंत आहे. नंतर स्वाती हे नक्षत्र सुरू होत आहे. आज आश्र्विन नवरात्रास प्रारंभ होत असून नवरात्राची पहिली माळ आहे. आज रविचा तूळ राशीत प्रवेश होत आहे. तूळ राशीच्या व चित्रा नक्षत्रातील मंडळीनी व्यवसायाचा विचार करावाच पण  ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना चांगला लाभ होणार आहे.

ज्याच्याकडे नवरात्राचे विधी नाहीत त्यांनी श्री देवतेची मानसपूजा करावी.

मेष :या सप्ताहात आजपर्यंत केलेल्या कामाचे रिझल्ट्स कळतील. कोणताही निर्णय अचानक पणे घेऊ नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण राहील. आरोग्याच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास त्रास सोसावा लागेल. छानछोकी व चैनीच्या वस्तूसाठी अचानक पैसे खर्च कराल.

 

वृषभ :–कलाकार मंडळीना आपल्या कलेमुळे प्रसिद्धी मिळत असल्याचे जाणवेल.  हाती आलेले काम नव्या उमेदीने  कराल. वैवाहिक जीवनात समाधानाचा वेगळाच अनुभव येईल. अचानक खर्चाची कलमे निघतील व हात सैल सोडावा लागेल. मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होत असल्याचे संकेत मिळतील.

 

मिथुन :–नोकरीतील कामात अचानक अडथळे निर्माण होतील. राजकीय मंडळी विरोधकांचे तोंड बंद करू शकतील. प्रेम संबंधात गैरसमज वाढणाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागेल. विद्यार्थ्याी   बुद्धीच्या जोरावर जग  जिंकण्याची जिद्द करतील. तुमच्या वागण्यातील नम्रपणा तुमचे महत्व वाढवेल.

 

कर्क :–अचानक मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. भविष्यातील योजना  निश्चित करण्यास वरिष्ठांची मदत घ्या. महिलांना डोकेदुखीचा त्रास वाढेल. दुर्लक्ष करू नका. राजकारण्यांबरोबरची ओळख  महत्वाच्या व रखडलेल्या कामांना मार्गी लावेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

 

सिंह :–सरकारी रखडलेली कामे आज मार्गी लागतील. उधार उसनवार पैसे देण्यापूर्वी विचार करा अन्यथा नुकसान संभवते. लहान मुलींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडला तरी लगेच घरी सोडणार नाहीत. व्यवसायात युक्तीचा वापर कराल.

 

कन्या :–आज तुम्हाला घरगुती वाद प्रसंगाला सामोरे जावे लागेल. मनातील भिती खरी ठरेल. विद्यार्थ्यांना आपल्या क्षमता सिद्ध करता येतील. तरूणांना रिकामा वेळ सत्कारणी लावता येणार आहे. घरगुती प्रश्र्नाकडे भावनिक रूपाने न बघता व्यवहारी दृष्टीने बघा.

 

तूळ :–कायद्याच्या बाबतीतील दुर्लक्ष किंवा बेफिकीरी त्रासदायक ठरेल. कामातील यशाने हुरळून जाल. वडीलांचे नॉलेज बघून त्यांच्याविषयी पूर्वीपेक्षा जास्त आदर निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कोशातून बाहेर येऊन त्र्ययस्थ दृष्टीने जगाकडे पाहण्याची गरज आहे

 

वृश्र्चिक :–स्वतःच्या मनाचे समाधान करण्यासाठी इतरांना वेठीला धरू नका. मुलांच्या बाबतीत योग्य वेळी विचार केलास मानसिक त्रास होणार नाही. कोणत्याही प्रकारची लाँटरी  घेऊ नका. प्रत्येक वेळी आपले मत व्यक्त न करता मौन पाळा. व्यवसायात आर्थिक लाभ संभवतो.

 

धनु :–श्री गुरूमाऊलीच्या कृपेने अवघड गोष्टीत यशस्वी व्हाल. राजकीय कारकीर्दीतील महत्च्याच्या  टप्प्यात असलेल्यांनी आपले निर्णय, आडाखे कोणासमोरही ओपन करू नका. कलाकारांकडून उत्तम कलाकृती निर्माण होऊन  चाहत्यांकडून वाहवा मिळवाल.

 

मकर :–कामातील चेंगटपणामुळे कामाचा व्याप वाढेल.  मोठे यश मिळवण्यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रमावर पाणी पडेल. महिलांना ब्लडप्रेशरचा त्रास संभवतो तरी कोणत्याही विषयाचा बाऊ करू नये. अतीववहारीपणा  नडेल.

 

कुभ :–संततीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल. बालहट्टाबरोबर स्त्रीहट्ट ही पुरवावा लागेल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सत्तेचा मोह आवरता येणार नाही व सत्तेबरोबर संकटही ओढवून घेतील. घरामध्ये एखाद्या व्यक्तीला अपघातात दुखापत होण्याचा धोका आहे.

 

मीन :–जगन्नाथाचा रथ सर्वानी वहायचा असतो त्याप्रमाणे तुम्ही हाती घेतलेल्या कामात लोक स्वतःहून सहभाग घेतील. खाजगी लघुऊद्धोगातून चांगली प्राप्ती होईल.  घरगुती पार्लरचा व्यवसाय चांगला लाभ देईल व प्रसिद्धीही देईल. आज श्री कुलदेवीच्या कृपेने मानसिक समाधान मिळेल.

||  शुभं – भवतु ||

 

 

 

 

One thought on “दैनिक राशीभविष्य शनिवार 17 आँक्टोबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *