daily horoscope

दैनिक राशीभविष्य शुक्रवार 16 आँक्टोबर 2020

Read In

 

शुक्रवार 16 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

 

daily horoscope

आज शुक्रवार 16 आँक्टोबर चंद्ररास कन्या 25:24 पर्यंत व चंद्र नक्षत्र हस्त 14:58 पर्यंत नंतर चित्रा नक्षत्र सुरू होत आहे. आज पहाटे चतुर्दशी पहाटे  04:52 ला संपत असून अमावास्या सुरू झाली आहे. ही अमावास्या अधिक आश्र्विन अमावास्या असून आज अधिक आश्र्विन महिन्याची समाप्ती होत आहे. अमावास्या उत्तररात्री 25:01 पर्यंत आहे. हस्त व चित्रा या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या  05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

मेष :–आज नोकरीत तुमच्या कुशाग्र बुद्धीने आजवर अवघड वाटत असलेले प्रश्र्न सोडवून दाखवाल. तुमची मनःशक्ती पाहून सहकारी अचंबित होतील. सरकारी कामातही आज तुम्ही यशस्वी होणार आहात. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.

 

वृषभ :–भूतकाळाचा विचार सोडून वर्तमान काळात जगण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात मोठ्या धाडसी प्रकल्पाची योजना आखाल. आत्मविश्वासपूर्ण राहून कामाची सुरूवात करा. आनंदाच्या भरात स्वतःची महत्वाची गोष्ट देउन टाकाल.

 

मिथुन :–विद्यार्थ्याी आपली क्षमता ओळखून अभ्यागत वाढ करतील. आरोग्याचा विचार करून स्वतःची शिस्त बिघडू देऊ नका. इतरांचे आग्रहसमजूतीने दूर करण्याचा प्रयत्न करा.  कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका.

 

कर्क :–आरोग्याची काळजी घेणे म्हणजे सतत शंकेत राहणे नाही हे लक्षांत ठेवा. राजकीय व्यक्तींना गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. बँकेच्या ओव्हरड्राफ्टबाबत बँकेकडून पूर्ण माहिती घ्या. दुसर्‍याच्या मध्यस्थीने अडचणीत याल.

 

सिंह :–तुमच्यावर असलेल्या जबाबदार्या  वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खुष करण्यासाठी सहकारी खोट्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवतील. वागण्यात प्रेमळपणा व पारदर्शकपणा ठेवल्यास खर्या गोष्टी आपणहून कळतील.

 

कन्या :–स्वतःचे विचार चाचपून पहा, नंतरच्या विचारांना काही किंमत राहणार नाही. तुमच्या हट्टी स्वभावामुळे स्वतःवर संकट ओढवून घ्याल. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या आधारी न जाता व्यावहारिक पातळीवरून घ्या.

 

तूळ :–महत्वाच्या कामासाठी कुटुंबात चर्चा करून ज्येष्ठांच्या विचाराने निर्णय घ्या. काम करताना वेळेचे बंधन समजून घ्या. कोर्टाची कामे मार्गी लागण्यासाठी स्वतः एकदा वकिलांना भेटा. आजारपण येण्याची शक्यता आहे.

वृश्र्चिक :–वैवाहिक जीवनात सुखद अनुभव येतील. दुसर्याच्या चुका काढल्यामुळे अचानक घरातील वातावरण बिघडून जाईल. लहान मुलांच्या डोक्याला दुखापत होण्याची शक्यता आहे, तरी मुलांना एकटे सोडू नये.

धनु :–परिस्थितीचा बाऊ केल्याने परिस्थिती हाताबाहेर जाईल. कलाकार मंडळींचे समाजाकडून कौतूक होईल. उच्चशिक्षणातील अडथळे सहजपणे दूर होणार नाहीत तरी मेहनत वाढवावी लागेल. प्रेमाचे मित्रमैत्रिणी तुमच्यापासून दुरावतील.

 

मकर :– नेहमीच्या मित्र मंडळी पासून कांही वेळ दूर रहावे लागेल. राजकीय मंडळीनी कोणताही प्रश्र्नातईगो आणू नये. विशेषतः क्रिमिनल क्षेत्रातील  वकील मान्यवरांनी  कोणत्याही ऐकिव बातमीवर विश्र्वास ठेवू नये. जागेचा ठरलेला व्यवहार अचानक बिघडणार आहे.

 

कुंभ :- रखडलेल्या कामाकडे आज लक्ष दिल्यास मनस्ताप वाचेल व कामही मार्गी लागेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्या. जनमानसात आपली प्रतिमा डागाळू देऊ नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण राहील.

 

मीन :–मावशीकडील प्रकृतीची चिंता वाढेल. महत्वाची कागदपत्रे ऐनवेळी सापडणार नाहीत. नात्यात अहंकार येऊ देऊ नका. व्यवसायातील प्रलंबित येण्या कडे जातीने लक्ष दिलेत तरच कांही प्रमाणात येणे वसूल होईल.

||  शुभं – भवतु  ||

 

 

One thought on “दैनिक राशीभविष्य शुक्रवार 16 आँक्टोबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *