daily horoscope

दैनिक राशीभविष्य गुरूवार 15 आँक्टोबर 2020

Read In

 

गुरूवार 15 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

आज गुरूवार चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 17:58 पर्यंत नंतर हस्त सुरू होत आहे. आजचे नक्षत्र रवीचे व चित्रा नक्षत्राचा स्वामी मंगळ याचा उपयोग करून घेऊया. आजचा दिवस अशुभ असल्याने महत्वाची कामे करू नयेत. वरील दोन नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

सिंह राशीच्या रवीचा चित्रा नक्षत्रातील प्रवेशा हा महत्वाचा मुद्दा आहे. दिनांक 7  व 10  च्या लेखानुसार तुम्ही सर्वजण व्यवसायाची तयारी करत आहात असे समजून पुढील राशीभविष्य देत आहे.

 

मेष :–मनात आलेले काम तुम्ही केल्याशिवाय आज राहणार नाही. आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग सापडेल. निवृत्त मंडळी आपल्या आवडीच्या छंदाला सुरूवात करतील. अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील तरूणांना आनंदाची बातमी मिळेल.

 

वृषभ :–नवनवीन प्रयोग करून बघण्याच्या दृष्टीने आखणी कराल. आई व बहिणी सोबतच्या गुजगोष्टी नव्याने आनंद साजरा होईल. व्यावसायिक खरेदी कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात कर्जाची सोय करावी लागणार आहे तरी याबाबतचा विचार करून ठेवा.

 

मिथुन :–शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्यांना मानाचे स्थान मिळेल. पाळीव प्राण्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीतील कामात झालेला बदल लाभदायक ठरेल. समाजकार्यात आज सहभाग घेऊ नये, मानसिक त्रास संभवतो.

 

कर्क :–चैनीच्या व सौंदर्यप्रसाधनाच्या उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. घरगुती पार्लरचा व्यवसाय  असलेल्यांना आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. अपचनाचा किंवा अँसिडीटीचा त्रास संभवतो. घरगुती वाद वाढवू नका. बाजी तुमच्यावरच उलटेल.

 

सिंह :–हम करे सो कायदा आज चालणार नाही. नोकरीत जरा शांततेने घ्या. मित्रपरिवाराबरोबर आनंदाचे सुखाचे क्षण अनुभवाल. आईकडील नात्याची चौकशी करा. त्यांना मदतीची गरज असणार आहे. बँकेचे व्यवहार स्वतः करावेत.

 

कन्या :–आज वडिलधार्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल. प्रेमाच्या अवास्तव कल्पना दूर करून वास्तवाचा विचार केल्यास नात्यात वितूष्ट येणार नाही याची दखल घ्या. मानसिक गोंधळ होऊ देऊ नका.

 

तूळ :–सतत एकाच कामाच्या मागे लागल्याने इतर महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येईल. सामाजिक स्तरावर तुम्हाला दुसर्‍यांच्या  कोर्टाच्या कामातून मनस्ताप होईल. मोठ्या भावंडांबरोबर वैचारिक खटके उडतील तरीही त्याला समजून घ्यावे लागेल.

 

वृश्र्चिक :–कलाकारांना अचानक बदनामीकारक अनुभवास सामोरे जावे लागेल. मनातील भावना मित्रमंडळीमधे व्यक्त कराल. लहानशा गोष्टीला अती प्राधान्य देण्यात आल्याने मनस्ताप होईल. आज एकदम शांत रहावे.

 

धनु :–वाहन तपासूनच प्रवासाला सुरूवात करा. वाहनात बिघाड संभवतो. शेअर वा इतर लाँटरी च्या भानगडीत आज अजिबात पडू नका. स्वतःच्या घराला सुशोभित करण्याचे विचार पक्के कराल. वडिलांकडून आर्थिक मदत मिळेल.

 

मकर :–उच्चशिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणार्यांनी आपल्याच देशात शिक्षण घेण्याचे नवीन पर्याय शोधावेत. तुमच्या राशीतील शनीमहाराज तुमची कोंडी लवकर फोडणार नाहीत. नोकरदारांना अचानक नवीन पर्याय समोर येतील.

 

कुंभ :–अध्यात्मिक अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल. शालेय विद्यार्थ्यांना आपल्याला ईलर्निंगचा खूप मोठा फायदा झाल्याचे जाणवेल. शिक्षक प्रोफेसर मंडळीना अचानक आपले फंडे बदलावे लागतील. पूर्वनियोजित कामात बदल होईल.

 

मीन :–आज तुमच्या स्वभावातील लहरीपणात अचानक वाढ होईल. लेखक व प्रकाशक यांना नवीनच  हाती आलेल्या कामाचे समाधान वाटेल. नवोदित गायकांना, वादकांना नवीन संधी मिळेल. बुद्धीच्या जोरावर वाद घालू नका.

||  शुभं – भवतु ||

 

 

 

 

 

One thought on “दैनिक राशीभविष्य गुरूवार 15 आँक्टोबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *