Read In
मंगळवार 13 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्र रास दिवसरात्र सिंह आहे व चंद्र नक्षत्र मघा 22:54 पर्यंत आहे व नंतर पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र सुरू होत आहे. या दोन नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
सिंह राशीच्या रवीचा चित्रा नक्षत्रातील प्रवेशा हा महत्वाचा मुद्दा आहे. दिनांक 7 व 10 च्या लेखानुसार तुम्ही सर्वजण व्यवसायाची तयारी करत आहात असे समजून पुढील राशीभविष्य देत आहे.
मेष :–अध्यात्मिक गुरूवर्यांकडून अपेक्षित सल्ला मिळेल. न्यायालयातील कामास प्राधान्य देउन वकीलबुवांची भेट घ्या. बँकेचे परतफेडीच्या प्रकरणाची चौकशी स्वतःहून बँकेत जाऊन करा. पूर्वीच्या शेअर्सच्या गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल.
वृषभ :–व्यवसायातील मागील येणे सहजासहजी मिळणार आहे तरी त्यांना आठवण करावी. मोठ्या आकांक्षा पूर्ण होण्याची स्वप्ने प्रत्यक्षात अवतरतील. पतीपत्नीमधील व्यवहारातील पारदर्शकपणाचा अनुभव येईल. उष्णतेचा त्रास संभवतो.
मिथुन :–बोलणार्याची माती विकली जाते हे ज्ञात ठेवून तुमचा व्यवसायाची माहिती द्या. पैसे ठेवण्याची जागा नेहमीची असूनही कांहीतरी घोळ होईल. पँनिक होऊ नका. बागबगिच्याची हौस वाढून फुलझाडांची खरेदी कराल.
कर्क :–कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या कामातील प्रगती उल्लेखनीय राहील. राजकीयदृष्टय़ा आज तुमच्या अधिकारात असलेल्या कामावर आक्षेप घेतले जातील. वडिलांचे सौख्य मिळून कुटुंबात आनंद निर्माण होईल.
सिंह :–सुखाचा भला मोठा डोंगरच हाती आल्याचे समाधान मिळेल. प्रथम संततीकडून प्रतिष्ठा वाढवणारे कार्य होईल. लहान भावंडांबरोबर वैचारिक चर्चा होऊन मनासारखा सर्वांच्या हिताचा निर्णय घ्याल. वरिष्ठांकडून योग्य सल्ला मिळेल.
कन्या :–भागिदारीच्या व्यवसायात पैशाची चणचण जाणवेल. कोणाकडेही उधार मागू नका. अचानक वडिल किंवा सासुरवाडीकडून आवश्यक ती मदत मिळेल. महिलांना प्रकृतीचा त्रास संभवतो. सासुबाईंची काळजी घ्यावी लागेल.
तूळ :–तुमच्या बोलण्यातील वकीली भाषा तुम्हाला अडचणीत आणेल. तुमच्या प्राप्ती मधील मोठा हिस्सा सामाजिक कार्यासाठी करण्याची इच्छा होईल. दुसर्यांच्या सांगण्यावरून आपले मत कलुषित करू नका.
वृश्र्चिक :–पूर्वी बुक केलेले घर ताब्यात येण्यास आता फार वेळ वाट बघावी लागणार नाही. पगारातील पैशासाठी अचानक खर्चाच्या बाबी उभ्या राहतील. गावाकडील मंडळींसाठी किंवा दूरच्या नातेवाईकांसाठी मोठ्या खर्चाची तयारी करावी लागेल.
धनु :–आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक बाबतीतील रेंगाळलेल्या प्रश्र्नांना अजूनही वेळ दिलात तर शीतयुद्ध संपेल. व्यावहारिक बोलण्यामुळे कार्यभाग साधेल. गुढशास्त्राच्या अभ्यासकांना योग्य मार्गदर्शन मिळेल.
मकर :–अती श्रमाने मनाला प्रसन्नता राहणार नाही. आज तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टीना वेळ द्या. भाड्याने घर घेण्याची ईच्छूकांनी आज मनपसंत घराचा अनुभव मिळेल. सांधेदुखी, पायदुखीचा त्रास वाढेल तरी दुर्लक्ष करू नका.
कुंभ :–अडचणीतील मित्राला सांभाळण्याकरीता इतरांचा रोष ओढवून घ्याल. नोकरीत आज आनंदी आनंद साजरा कराल. वरिष्ठ खूष राहणार आहेत. कामातून वेळ काढून समाजकार्यास वेळ द्याल. कौतुकाचे शब्द मिळवाल.
मीन :–व्यावसायिक अधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करतील. स्वतःच्या अनुभवांवर दुसर्याचा प्रश्र्न सोडवून दाखवाल. विरोधकांना न दुखावता सत्य पटवून द्या. बहिणीकडील कटु प्रसंगाला सामोरे जावे लागेल. मनातील कोंडलेल्या प्रश्र्नांना मोकळे कराल.
|| शुभं – भवतु ||
Aabhari Aahe Tai
धन्यवाद ताई