Read In
सोमवार 12 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज सोमवार 12 आँक्टोबर, चंद्र कर्केला असून चंद्र नक्षत्र आश्लेषा 24 :14 पर्यंत आहे व नंतर मघा नक्षत्र सुरू होत आहे. रवी, मंगळ व गुरू हे चंद्राचे नैसर्गिक मित्र असल्याने आपणा सर्वानाच या रवी मंगळाचा व सोबतचगुरूचाही फायदा करून घेता येणार आहे. धनु राशीतला गुरू 24 अंश 35 कलावर आहे. कन्येचा रवी 23 अंश 59 कला आहे. व मंगळ 27 अंश 34 कला आहे. कन्येचा रवी व कन्येच्या चित्रा नक्षत्रातील मंगळ या सर्वांचा विचार करून व आजची पहाटेच्या 05:30 च्या कुंडलीचा विचार करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. ( वरील सर्व ग्रहस्थिती व्यवसायास पूरक असल्याने तुम्ही व्यवसायाचा विचार करावा म्हणून दिली आहे. )
बुधवार दि. 7 च्या व शनिवार दि. 10 च्या लेखात दिल्याप्रमाणे व्यवसायाचे प्रयत्न करावेत.
मेष :–हातात धेतलेले काम चिकाटीने पूर्ण करण्याचा मार्ग सोडू नका. नोकरीत बदलाची अपेक्षा करणार्यांनी अचानक घुमजाव करू नका. पँरँलिसीसच्या त्रासातून उतार पडत असल्याचे जाणवेल. पायाची सूज कमी येईल.
वृषभ :–अतिकामामूळे थकवा जाणवेल. पर्समधील पैशांचा हिशोब लागणार नाही. व्यवसायाचे फंडे अचूक लागू पडतील. नोकरीमध्ये तुम्हाला वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करता येणार आहेत. जूना कानाचा झालेला त्रास पुनः उद्भवेल तरी दुर्लक्ष करू नका.
मिथुन :–रवी तुमच्या मदतीला असल्याने तुमचे नियोजन योग्य ठरेल. प्रभावशाली कार्यशैलीमुळे तुमचे कौतुक होईल. विवाहेच्छु मंडळीना मनासारख्या घटनांचा अनुभव योईल. मन दोलायमान होऊ देऊ नका. त्यामुळे कार्यशक्ती र परिणाम होईल.
कर्क :–महत्वाच्या व्यक्तींबरोबर चर्चा करताना त्यांच्याविषयीचा राग बाजूला ठेवा. खर्चाचे योग्य नियोजन न केल्यामुळे पैसे अनाठायी खर्च होतील. आपल्या क्षमतेचा विचार करून मगच निर्णय घ्या पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.
सिंह :–आपणच सर्वेसर्वा हा विचार सोडून दोन पायर्या खाली येऊन विचार केल्यास तुम्ही हाती घेतलेल्या कामात अभूतपूर्व यशाला सुरूवात होत आहे. उत्तम नियोजनाच्या मदतीने कामाला सुरूवात करा. राजकीय क्षेत्रातील मंडळीना सरकारी अभय मिळेल.
कन्या :–तुम्हाला काय करायचे आहे हे तुम्हालाच माहित आहे तरी त्यानुसार कामाची व नियोजनाची आखणी करा. पती पत्नीच्या व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येणार आहेत तरी त्याबाबतच्या तुमच्या योजना तयार पाहिजेत.
तूळ :–बोलण्यातील स्पष्टपणामुळे आज सहकारी दुखावण्याचा धोका आहे. नाटक सिनेमातील मंडळीना आरोग्याच्या त्रासाला सामोरे जावे लागेल. घरातील पाळीव प्राण्याच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नवीन भाडेकरूचा त्रास होईल.
वृश्र्चिक :–मालमत्तेसंबंधी कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्यता मोठी आहे. राजकारण्यांच्या वागण्यावर आक्षेपाचे प्रसंग येथील. लहान मुलांच्या डाव्या डोळ्याची काळजी घ्यावी लागेल. संततीच्या आरोग्याची चिंता वाढेल.
धनु :–आपल्या कार्य शैलीने सर्वाना आपलेसे कराल. त्यागाचा अर्थ तुमच्या कृतीमधून दिसेल. प्रवासाचा प्रसंग येणार आहे. वार्ताहर व लेखकांना त्याच्या कार्यासाठी समाजाकडून शाबासकी मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याची पोच समाजाकडून मिळेल.
मकर :–मागील अनुभवावरून ताकही फुंकून पिण्याचा अनुभव घ्याल. तुमच्या सडेतोड विचारांच्या वृत्तीमुळे नोकरीत वरिष्ठ महत्वाच्या कामात तुमचीच मदत घेतील. खाजगी व गोपनिय माहितीसाठी तुमच्यावर भरवसा ठेवला जाईल.
कुंभ :–न्यायालयातील कर्मचार्यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन करू नये. वकील मंडळींना आपल्या कामातून स्वत:ला सिद्ध करता येईल. मशीनवर काम करणार्यांनी विशेष काळजी घ्यावी. अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन :–विचार करण्याच्या पद्धतीत बदल केल्यास हातातील काम सोपे वाटेल. सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले काम चोख करावे. व्यवसायासाठी कर्जाचा विचार करत असाल तर आज तरी नको. कौटुंबिक प्रश्न सोडवताना अतिव्यवहारीपणा नको.
|| शुभं -भवतु. ||
Dhanyawad Tai