Read In
साप्ताहिक भविष्य
साप्ताहीक भविष्य रविवार 11 आँक्टोबर ते शनिवार 17 आँक्टोबर 2020
साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.
या सप्ताहात चंद्र कर्क, सिंह, कन्या, तूळ या राशी मधून भ्रमण करणार आहे. रविवार 11 दिवसरात्र कर्क, पुष्य नक्षत्र 25:17 पर्यंत. सोमवार 12 कर्क 24:28, व नक्षत्र आश्लेषा 24:28 पर्यंत. मंगळवार 13 रास सिंह दिवसरात्र, नक्षत्र मघा 22:54 पर्यंत, बुधवार 14 सिंह 26:02 पर्यंत, नक्षत्र पूर्वा फाल्गुनी 20:40 पर्यंत. गुरूवार 15 रास कन्या दिवसरात्र, नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 17:58 पर्यंत. शुक्रवार 16 रास कन्या 25:24 पर्यंत. नक्षत्र हस्त 14:58 पर्यंत. शनिवार 17 रास तूळ दिवसरात्र, नक्षत्र चित्रा 11:51 पर्यंत व नंतर स्वाती सुरू.
या सप्ताहात शुक्रवारी16 रोजी अमावास्या आसून अधिकमास समाप्त होत आहे. ही अमावास्या कन्या राशीला असून हस्त नक्षत्री आहे. शनिवार 10 आँक्टोबर पासून कन्या राशीच्या रवीने चित्रा नक्षत्रात प्रवेश केला आहे व 17 ला रवी तूळ राशीत प्रवेश करत असून रवी 23 आँक्टोबर पर्यंत चित्रा नक्षत्रातच असणार आहे. त्यामुळे 17 ते 23 आँक्टोबर पर्यंत तूळ राशीच्याव्यक्तींना सरकारी कामकाजातून विशेष लाभ घेता येणार आहे.
सप्ताहाच्या शेवटी शनिवारपासून आश्र्विन नवरात्रास प्रारंभ होत आहे.
मेष :– तुमच्या मनातील योजनांना मूर्त रूप तदेण्याचा कालावधी असल्याने पूर्ण विचाराने योजना पक्क्या कराल. तुमच्या महत्वाकांक्षेत वाढ झाल्याचे जाणवेल. 12 व 13 ला कांहीही शंका न घघेता मोठ्या उमेदीने कामाला सुरूवात करा. तुमचा रवी व मंगळ तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. अती उत्साहाने कामात गडबड करू नका. एखादे कागदपत्र हरवण्याची शक्यता आहे. मनातील इच्छेप्रमाणे नोकरीतही आर्थिक लाभ होईल. शनिवार 17 व्यवसायातील योजनांची केलेली आखमी यशस्वी होईल. बर्याच दिवसापासून प्रतिक्षेतील पेन्शन, प्राँ. फंड यांचा लाभ होईल.
वृषभ :–9 व 10 रोजी बर्याच दिवसापासून रखडलेले जूने येणे वसूल होईल. गुरूवार 15 रोजी सरकार दरबारी अडकलेल्या कामासाठी प्रयत्न करा. नोकरीतील महत्वाच्या कामासाठी शासकिय तज्ञांचा सल्ला आवश्यक राहील. राजकीयदृष्टय़ा शनिवार 17 रोजी तुम्ही बाजी माराल. पण 16 ची अमावास्या मानसिक क्लेश देईल. 12 व 13 रोची वेळेचा सदुपयोग कराल व त्यातून सामाजिक पातळीवर उपयोग होईल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. वयस्कर मंडळीनी आरोग्याची काळजी घ्यावी व प्रवास करू नये.
मिथुन :–शेतकरी मंडळीना सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. दुध दुभती जनावरे व शेतीसाठीचे मोठ्या मदतीची सोय होईल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक लाभ देणार्या घटना घडतील. जमिनीबाबतचे वाद कोर्टात असतील तर तिकडे विशेष लक्ष द्यावे. तुमच्याकडून हिरावून घेतलेली गोष्ट परत मिळण्यासाठी 12, 13 ला प्रयत्न करा. पूर्वी शेअर बाजारात गुंतवलेल्या पैशातून लाभ होईल. 12 व 13 रोजी तज्ञांच्या सल्ल्याने मार्केटमधे गुंतवणूक करा. या सप्ताहात कोणाशीही स्पर्धा करू नका. संततीच्या उच्च शिक्षणाची सोय होत असल्याचे कळेल.
कर्क :–नोकरीतील अपेक्षित बदलाची बातमी कळेल. रेल्वे, टेलिफोन खात्यातील मंडळीना अचानक लाभ होईल. पासपोर्ट व्हिसासाठी आता फार त्रास घ्यावा लागणार नाही. 12 व 13 रोजी शेती, जमिन जुमला यांच्या कराराची बोणी तसेच कागदपत्र करण्यास हरकत नाही. नोकरी नसलेल्यांनी नोकरीसाठी जोमाने प्रयत्न केल्यास काम होईल पण वाजवीपेक्षा अपेक्षा ठेवू नयेत. या सप्ताहात विवाहाची बोलणी करू नका, शुक्रवार 16 रोजी कोणत्याहि कामाला भावनेपेक्षा व्यवहाराला महत्व द्या. शनिवार 17 रोजी वारसाहक्काने आजोळ कडून कांहीतरी लाभ संभवतो. कुटुंबातील कर्तृत्ववान महिलेचा आदर्श नजरेसमोर ठेवून कामाची दिशा ठरवाल.
सिंह :–या सप्ताहात सासुरवाडीकडून भला भक्कम लाभ संभवतो. सरकारी खात्यातून कांही येणे असल्यास आजपासूनच प्रयत्न करावेत. सरकारी कामातून फायदा होईल. 12 व 13 रोजी आपल्या अधिकाराचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्या. व्यावहारिक पातळीवर कामात पारदर्शकता ठेवा. व्यवसायात नवनवीन योजनांची सुरूवात या सप्ताहात करू नका. नोकरीतील तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक करून सन्मान केला जाईल. प्राँ. फंड, पेन्शन चे मार्ग पुढे सरकतील. हार्टच्या पेशंट्सना तब्बेतीत सुधारणा झाल्याचे जाणवेल.
कन्या :–हा सप्ताह तुम्हाला मनातील अपेक्षा, महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारा ठरेल. सरकारी तुटलेल्या कामांना प्राधान्य द्या. बेरोजगारांनी एखाद्या लहानश्या उद्धोगासाठी प्रयत्न करावेत. हा सप्ताह तुम्हाला सरकारी परवानग्या काढणे, कागदपत्र पूर्ण करणे यासाठी लाभदायक आहे. कोणतीही शंका कुशंका मनात न आणता कामाला लागा. कोणाशीही वादाचा प्रसंग वाढवू नका. मान अपमान बाजूला ठेवून योग्य व्यक्तीची मदत घ्या. नोकरदार मंडळीना नोकरीतही मान मिळेल व वरिष्ठांकडून कामाची दाद मिळेल.
तूळ :–10 तारखेपासून रवीने चित्रा नक्षत्रात प्रवेश केलाय चित्रा नक्षत्राचे शेवटचे दोन चरण तुळ राशीत येतात. त्यामुळे मागील लेखात दिल्या प्रमाणे सध्या फक्त व्यवसायाचा विचार करा. तुमचा आवाका आर्थिक क्षमता यांचा सारासार विचार करून व तज्ञांच्या मताने निर्णय घ्या. ही संधी सढू नका. गुरूवार 15 रोजी रवीच्या उत्तरा फाल्गुनी या नक्षत्रावर निर्णय पक्का करून लहानसा का होईना उद्धोग सुरू करा. 17 ला तूळ राशीत प्रवेश करणारा रवी तुमचे काम सुलभ करेल.
वृश्र्चिक :– तुम्ही काही हालचाल केली नाहीत तर मनातील मनसुबे या सप्ताहात मनातच राहणार आहेत. 13 ला मनातील योजनांना पेपरवर आणण्याची संधी मिळेल. 15 ला सरकारी योजनांच्या माहितीनुसार कामाची आखणी करून कामाला वेग द्या. चित्रा नक्षत्राचे शेवटचे दोन चरण तुमच्याच राशीत असल्याने आगीला लेखात तुम्हाला जे व्यवसाय सुचवले आहेत त्यांचाच फक्त विचार करा. वर्षातून येणारी ही संधी घालवू नका. मंगळाची धडाडी तुम्हाला इथे उपयोगी पडणार आहे.
धनु:– आवडीच्या गोष्टींची मनसोक्त खरेदी कराल. 14 व 15 रोजी महिलांना आपल्या सासरकडून मौल्यवान चीजवस्तू मिळतील. कुटुंबात वारसा हक्काची बोलणी सुरू होतील. वयस्कर व वृद्ध मंडळी स्वतःहून सर्व नियोजन करतील. दूर परगावी असलेल्या संपत्तीची काळजी वाढेल. विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठण्यासाठी अभ्यासातील मेहनत कमी पडत असल्याचे निदर्शनास येईल. निद्रानाशाचा त्रास असलेल्यांनी डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. तरूणांनी जागरणे टाळावी. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
मकर :–इच्छा असो वा नसो दुसर्यांच्या व्यवहारात सहभाग घ्यावा लागेल. कोणत्याही कामाची घाई करू नका. 12 रोजी बोलताना संयम पाळावा लागेल. बोलण्यामुळे गैरसमज वाढून संबंध बिघडण्याचा धोका आहे. वयस्कर मंडळींना मित्रमंडळींमुळे सुखाचे क्षण अनुभवास येथील. ताप व सांधेदुखीतचा त्रास संभवतो तरी काळजी घ्यावी. शेअर बाजारातून धनलाभ होईल. वकील, इंजिनिअर यांना समाजाकडून सुखकारक अनुभव येईल. राजकीयदृष्टय़ा हा सप्ताह संमिश्र जाईल.
कुंभ :–धनिष्ठा नक्षत्राचे चतिसरे व चौथे चरण कुंभेत येत असल्याने कांही वेळा क्रोधाचे प्रसंग येणार आहेत तरी रागावर संयम आवश्यक आहे. नवनवीन फँशनच्या दागिन्यांची खरेदी कराल. पतीपत्नीच्या व्यवसायातील परिस्थिती आता बदलणार आहे. व्यवसायात हाताखालील मंडळींकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. राजकीय क्षेत्रात विरोधक तुमच्या बाबतीत समाजात गैरसमज निर्माण करतील. हसतमुखाने त्यांच्यावर मात करा.
मीन :–11 व 12 रोजी मनासारख्या गोष्टी घडल्यामुळे मानसिक आनंद मिळेल. प्रवासात महत्वाच्या वस्तूची काळजी घ्या. व्यवसायात नवीनच फंडा लागू पडेल व अपूर्ण राहिलेली कामे मार्गी लागतील. 14 रोजी कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ते वाचून समजून घ्या. आर्थिक नियोजनाची गरज भासेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल तसेच जी संधी हातातून गेली होती ती परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. 16 रोजी महत्वाच्या व्यक्तींबरोबर चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरावे लागतील. कौटुंबिक चर्चा महत्वाची ठरेल.
|| शुभं.- भवतु ||
Thank you Tai