Read In
शुक्रवार 09 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज शुक्रवार 09 आँक्टोबर दिवस रात्र चंद्ररास मिथुन असून चंद्रनक्षत्र आर्द्रा, 24:25 पर्यंत आहे. नंतर पुनर्वसु नक्षत्र सुरू होत आहे. या दोन्ही नक्षत्रांच्या गुणधर्मांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–बरेच दिवसापासून रेंगाळलेली कामे करण्याची तयारी ठेवा. सरकारी महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी लागेल. महिलांना आज आपले नावडते कामसुद्धा आवडीने करावे लागेल व तेही वेळेतच पूर्ण करावे लागेल.
वृषभ :–पूर्वीपासून आजचे आखलेले बेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा रहावी लागेल. लहान भावंडांची काळजी वाढेल. गर्भवती महिलांनी आज शक्यतो आराम करावा. धावपळ करू नये. पोटाची अपचनाची तक्रार वाढेल.
मिथुन :–खाण्या पिण्याचे पदार्थ काळजीपूर्वक तपासून खावेत. फुड पाँयझनसारख्या त्रासाची शक्यता आहे. वयस्कर मंडळीनी आपले पथ्य काटेकोरपणे पाळावे. तरूणांनी आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे का हे तपासून बघावे व मगच फायनल करावे.
कर्क :–त्वचारोगासंबंधी जागरूक रहा. मित्रपरिवाराबरोबर महत्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल व त्यातून तुमच्या मनावरचे दडपण कमी होईल. सरकारी कामातून फायदाच फायदा होणार आहे. वडिलांकडील नात्याची चौकशी करून त्याना योग्य वेळेत मदत. द्या.
सिंह :–भविष्यातील गुंतवणूकीला प्राधान्य द्यावे लागेल. घरातील स्वच्छता करताना हरवलेला दागिना सापडेल. पुरूषांनी महत्वाचा कोणताच निर्णय सल्ल्याशिवाय एकट्याने घेऊ नये. विशेषतः क्रिमिनल केस सुरू असलेल्य़ानी तज्ञांचा वा वकिलांचा सल्ला घ्यावा.
कन्या :–प्रेमाच्या व्यवहारात प्रमाणिक रहा अन्यथा आयुष्यभराचे नुकसानीस सामोरे जावे लागेल. मनातील, शंका, संशय व्यक्त करून मन मोकळे करा. सरकारी कामात अडथळा निर्माण होण्याचे संकेत मिळतील.
तूळ :–मुलांच्या अभ्यासातील प्रगतीवर खूष व्हाल. नोकरीत पूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद उठतील नातेवाईक मंडळींच्या विचारांना महत्व द्यावे लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्र्चिक :–बँकेतील कर्मचार्यांनी आज सौजन्यदिन पाळल्यास कोणताही त्रास होणार नाही. खातेदारांना केलेली कोणत्याही प्रकारची लहानशी मदतही मोठी ठरेल. व वातावरण आनंदाचे राहील. ज्येष्ठांना दिलेला शब्द पाळल्याचा आनंद होईल व त्याबद्दल कौतुकही होईल.
धनु :–आज तुम्ही आरामाचा दिवस आहे हे समजून घ्या. शरिराच्या व मनाच्या कोणत्याच तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबात वादग्रस्त विषयाना सुरूवात होऊ देऊ नका. व्यवसायातील चर्चाना आज सुट्टी द्या.
मकर :–वेळेचा सदुपयोग करून जूने त्रासदायक काम मार्गी लावाल. रागाच्या भरात सांभाळून बोलणे महत्वाचे ठरेल. बोलण्यातील स्पष्टपणामुळे. सर्व गैरसमज दूर होतील. लहान उद्धोगातून झालेल्या ओळखी टिकवण्यासाठी गोड बोलावे लागेल.
कुंभ :–नोकरीत वरिष्ठांबरोबरचे संबंध वृद्धींगत होतील व महत्वाच्या प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी मिळेल. बुद्धीच्या जोरावर वाद घालण्याची इच्छा निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कोशातून बाहेर येण्याची गरज आहे हे लक्षांत घ्या.
मीन :–सार्वजनिक कामातून स्वतःच्या कामाला वेळ मिळणार नाही. कौटुंबिक स्वास्थ बिघडणार्या बाबींना मनापासून टाळण्याचा प्रयत्न करा. आपल्या वरिष्ठांना गृहीत धरून कामे करू नका. प्रवासात आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागरूक रहा.
|| शुभं – भवतु ||
Dhanyawad Tai