daily horoscope

दैनिक राशीभविष्य गुरूवार 08 आँक्टोबर 2020

Read In

 

गुरूवार 08 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

आज 8 आँक्टोबर गुरूवार चंद्र रास सकाळी 09:46 पर्यंत वृषभ व नंतर मिथुन आहे. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 22:48 पर्यंत आहे. या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–मनासारख्या जोडीदाराची निवड करता येईल व त्याच्याकडूनही होकार येईल. शिक्षक मंडळीना विद्यार्थ्यांच्या यशासाठी आपण किती मेहनत करावी याचे कोडे पडेल. घर विकण्याचे विचार सध्यातरी ला, ब ठेवा.

 

वृषभ :–घराच्या वा जमिनीच्या व्यवहारात अतिशय काळजीपूर्वक रहा. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. व्यवसायातील अडचणींवर तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. जून्या हरवलेल्या वस्तूचा अचानक शोध लागेल.

 

मिथुन :–राजकीय मंडळीनी आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करावा. अंधविश्वासाने कोणतेच व्यवहार करू नका. जून्या मैत्रीला उजाळा मिळेल. पण जूने विचार सोडून दिले तर आनंद निर्माण होईल. शंका घेऊन मैत्रीचा अपमान करू नका.

 

कर्क :–जून्या अनुभवावर आधारित आजचे विचार महत्वाचे ठरतील. बहिण भावंडांची गाठ भेठ होईल. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. शेजारील मंडळींच्या गरजेला मदत करावी लागेल. बालहट्टाबरोबर स्त्रीहट्ट ही पुरावावा लागेल.

 

सिंह :–मनात सतत स्पर्धेचा विचार ठेवू नका. कामातील एकाग्रता वाढविल्यास नक्की यश मिळेल. महिलांना मायग्रेनचा त्रास संभवतो. सासुबाईंची काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक बाबतीतील रेंगाळलेल्या प्रश्र्नांना अजूनही वेळ दिला तर प्रश्न वाढणार नाहीत.

 

कन्या :–आईवडिलांच्या काळजीने त्रस्त व्हाल. शक्य असेल तर प्रत्यक्ष भेट घेणे महत्वाचे ठरेल. लहान उद्धोगातून अपेक्षित कमाई होईल. लहान भावंडांबरोबर वैचारिक खटके उडतील तरीही त्याला समजून घ्यावे लागेल.

 

तूळ :–नोकरीत मानाच्या पदावर नेमणूक होईल व वरिष्ठांकडून कौतुक व शुभेच्छा मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी गुरूगृही जाण्याची संधी मिळेल. व्यवसायातील कमांजा बोजा वाढेल.

 

वृश्र्चिक :–राजकीय क्षेत्रातील घटनांचा राग कुटुंबातील सदस्यांवर निघेल. सामाजिक पातळीवर मानहानीचा प्रसंग येईल. आज फार महत्वाची कामे करूच नका. शांत व संयमित रहा. अध्यात्मिक. मनःशांतीसाठी आवडत्या व  मनाला आनंद देणार्‍या  गोष्टी करा.

 

धनु :–विद्यार्थ्यानी  अभ्यासला महत्व देउन मग इतर बाबींकडे लक्ष द्यावे. सध्या तुमची मेहनत दीडशे टक्के होणे महत्वाचे आहे. आजचा दिवस रेंगाळलेल्या कामाना प्राधान्य दिल्यास मोठे महत्वाचे काम होईलच पण पुढील संकट टळेल.

 

मकर :–तुमच्या अडचणीचा दुसरे फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्या. सामाजिक कार्यकर्त्यांनी  व्यवहार जपून करावेत. दुसर्यांना मदत करताना  उत्साहाच्या भरात एखाद्या नियमाचे उल्लंघन होऊ देऊ नका.  आज कष्ट वाढणार आहेत.

 

कुंभ :–अतीआत्मविश्वास हा धोक्याचा असतो हे लक्षात ठेवून आजची कामे करा. बाहेर जाताना खिशात मोजकेच पैसे ठेवा.व्यवहार पूर्ण करण्यासाठी  क्रेडिट कार्ड इतरांच्या हातात देऊ नका. महत्वाच्या कागदपत्रांवर आंधळेपणाने सही करू नका.

 

मीन:–हातातून गेलेली संधी परत मिळत नसते हे लक्षांत असू द्या. कामातील हलगर्जीपणामुळे कांही कामे दिलेल्या वेळेत पूर्ण होणार नाहीत. . व्यवसायात क्लायंटची डिमांड पूर्ण करण्याला प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. नोकरीतील दुर्लक्षित कामे अंगावर येथील.

 

||   शुभं- भवतु ||

 

 

 

 

 

 

One thought on “दैनिक राशीभविष्य गुरूवार 08 आँक्टोबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *