Read In
चला, काय करायचे याचा विचार करूया
शनिवार 10 तारखेला रवी 13 वाजून 33 मिनीटांनी चित्रा नक्षत्रात प्रवेश करतोय. या चित्रा नक्षत्राचा आणि रवीचा एकमेकांच्या गुणधर्माची आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रात उपयोग करून येईल याची आज आपण माहिती घेऊया. .
रवी म्हणजेच सूर्य. सर्व ग्रहांचा पिता. नभोमंडळाचा मालक. ज्याच्यामुळे ह्या सृष्टीचे चैतन्य अबाधित राहत आहे. असा हा चैतन्याचा गोळा. सतत आपल्याला देत राहणारा दाही दिशांना उजळून टाकणारा हा आपल्या कुंडलीमध्ये सर्व ग्रहांच्या पित्याचे काम करतो. त्याचे मित्र चंद्र, मंगळ, बुध आणि गुरू यांच्याशी संबंधित असता त्यांच्या गुणधर्मात वाढ तर करतोच त्याचबरोबर स्वतःचेही गुणधर्म त्यांना देतो. आणि हाच रवी चित्रा नक्षत्रात प्रवेश करतोय ज्याचा स्वामी मंगळ आहे. मंगळ म्हणजे रणांगणातला सेनानी. धडाडीचा आणि मनात येईल ते करून दाखवणारा असा. म्हणूनच येत्या ह्या 13-14 दिवसात रवी आणि मंगळाकडून आपल्याला जी मदत हबी आहे ती आपण करून घेणार आहोत.
रवीच्या मालकीची एकच रास आहे ती म्हणजे सिंह व नक्षत्रे तीन आहेत, ती म्हणजे कृत्तिका, उत्तरा फाल्गुनी आणि उत्तराषाढा. मंगळाच्या राशी दोन आहेत त्या म्हणजे मेष आणि वृश्चिक. मंगळाची नक्षत्रे तीन मृगशीर्ष, चित्रा व धनिष्ठा.
रवी कोणकोणत्या क्षेत्रातील काय काय कामे आपली करू शकतो ते बघूया :- सरकारी नोकरी, पोलीस खाते, संरक्षण खाते, तुरुंग अधिकारी, टपाल खाते, स्टॉक एक्सचेंज, आयकर, न्यायालय, वकील, पत्रकार, नौदल, युद्ध साहित्य, ऑडिट, बँक ही सर्व खाती रवीच्या अंतर्गत येतात.
त्याच बरोबर सरकारी नसलेलीही काही खाती बघूया :- सिनेमा, डॉक्टरी खाते, जाहिरात, हॉस्पिटल्स, औषधे व रसायने, क्ष किरण, महिलांचे ट्रेंनींग सेंटर, पॅथॉलॉजी इत्यादी.
वाहतूक विभाग, शिक्षक, तांबे लोखंडाचे व्यवसाय, संगीत, कला, अत्तरे, फोटोग्राफी, सॅनिटरी इंजिनिअर, मेकॅनिकल इंजिनिअर.
आता चित्रा नक्षत्राचा स्वामी ‘मंगळ’ याची क्षेत्रे बघूया:- पोलीस, लष्कर, फोजदारी कोर्ट, तुरुंग, न्यायालय, न्यायाधिश, रेल्वे, आयात-निर्यात, नौदल, रसायने, आयकर, गुप्तहेर, पेट्रोल पंप, सरकारी छापखाना, टॅन्कसाळ, स्टॅम्प वेंडर. डॉक्टर, प्रवासी संस्था,बँक, धार्मिक संस्था, मेकॅनिकल इंजिनिअर, खेळाडू संस्था, स्टुडिओ, विवाह कार्यालय, चित्रपट गृहे, पशु वैद्य, रसायन उत्पादक, लष्करी सामग्री, सुरुंग. मोठे उद्योग, इस्टेट एजनत, पशु शास्त्र वैद्य.
या कोरोनाच्या कालावधीत, गडबडलेली अर्थव्यवस्था व उद्योग यामुळे नोकऱ्यांवर झालेल्या परिणामामुळे आपण आता छोट्या छोट्या उद्योगाकडे वळणे महत्वाचे आहे. पण उद्योग म्हटले की आपल्याला अनेक प्रकारच्या परवानग्या आणि सरकारच्या नियमावलीची भीती वाटते. पण ह्याच सरकारी क्षेत्राचा रवी उद्योगधंदा आणि उलाढाल करणाऱ्या मंगळाबरोबर असल्याने या 13-14 दिवसात बऱ्याचश्या गोष्टी सोप्या होणार आहेत. नुसतेच करूया का ? कसे करायचे.? कसे जमणार ? या विचारांपेक्षा आता काय करायचे याचा विचार करूया. मंगळाच्या मृगशीर्ष, चित्रा व धनिष्ठा या तीन नक्षत्राच्या व्यक्तिंना हे लाभ घेता येणार आहेत. चला तर मग कामाला लागुया.
ज्या व्यक्तींना आपले नक्षत्र माहीत नसेल त्यांनी आपले जन्म दिनांक, जन्म वेळ (24 ताशी घड्याळात) व जन्म ठिकाण आपल्या मेल आयडी व फोन नंबर सोबत आम्हाला विचारावे. आम्ही तुम्हाला मेसेज करू.
|| शुभं – भवतु ||
Chaan aani upaukt mahiti