Read In
बुधवार 7 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज बुधवार 7 आँक्टोबर 2020 रोजी चंद्ररास वृषभ ( दिवसरात्र) असून चंद्र नक्षत्र रोहिणी 20:34 पर्यंत आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–. नव्याने स्विकारलेली जबाबदारी पूर्णपणे यशस्वी करणे तुमच्याच हातात आहे व त्याचे क्रेडीट ही तुम्हालाच मिळणार आहे. वाहन कायदा न पाळल्याचा दंड होण्याचे संकेत आहेत .निर्र्थक विचारानी कार्यशक्ती कमी होऊ देऊ नका.
वृषभ :– नोकरीत तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या कामात एक वेगळाच ठसा उमटवता येणार आहे. आपल्या अपेक्षा मुलांना सांगून त्यांना मनाला मुरड घालायला शिकवा. कोणत्याही परिस्थितीत विवाहाचा हट्ट करू नये सध्या विवाहासठीचे लागणारे शुभ ग्रह लाभदायक नाहीत.
मिथुन :–सरकारी अडकलेली कामे मार्गी लागतील. उधार उसनवार पैसे देण्यापूर्वी विचार करा. कोणालाही कोणत्याही प्रकारचा शब्द देऊ नका. व्यवसायातील खाचाखोचांवर इतरांसमोर चर्चा करू नका. व्यवहार जपून करा.
कर्क :–पूर्वी केलेले कामाचे नियोजन तपासा. विद्यार्थी वर्गाने आत्तापासूनच अभ्यासातील मेहनत वाढविल्यास चांगले यश मिळेल. वैवाहिक जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी समुपदेशकाची गरज आहे हे लक्षांत घ्या.
सिंह :–तुमच्या लहरी व तापट स्वभावामुळे आलेली संधी जाऊ देऊ नका. व्यवसायातील प्रलंबित येणी वसूल होऊ लागतील. बँकांचे व्यवहार, कर्ज प्रकरणे स्वतः लक्ष घालून त्यांची माहिती घ्या इतरांवर सोपवल्यास नुकसान संभवते.
कन्या :–प्रथम आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत वरीष्ठांकडून कामाचे नियोजन तपासून घ्या, किंवा मंजुर करून घ्या. बहिणीकडील काळजी वाढवणारी घटना मनाला त्रास देईल. मानसोपचार तज्ञांना विचित्र प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करावा लागेल.
तूळ :–सतत आजारपण येणार्या व्यक्तिने डाँक्टरांचा सल्ल्याने आवश्यक त्या तपासण्या करून घ्याव्यात. अनावश्यक असेल तर प्रवास टाळा. आजचा दिवस घरी शांतपणाने राहण्याचा आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक आहे.
वृश्र्चिक :–नोकरीत हाताखालील व्यक्तिंना किंवा बरोबरच्या सहकार्याना त्यांचे विचार व्यक्त करण्याची, बोलण्याची संधी द्यावी लागेल. घाईगर्दीत महत्वाच्या गोष्टी विसरल्या जातील. मोबाईल, पर्स पाकिट सांभाळा. शेअर मार्केटमधे आज गुंतवणूक नको.
धनु :–कौटुंबिक ताणतणाव निवळण्यासाठी पतीपत्नीनी एकमेकास वेळ द्यावा. व्यवसायात वरिष्ठांनी प्रेमाच्या आपुलकीच्या भावनेने वागावे. मुलींना वडिलांकडील नात्याची चौकशी करावी लागेल, व मदतही करावी लागेल.
मकर :–कर्तव्य कठोर असलेली तुमची प्रसिद्धी तुम्हाला मान मिळवून देईल. बँकेचे ओव्हरड्राफ्टच प्रकरण अंगाशी येईल. मशीनवर काम करणार्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळाव्या लागेल.
कुंभ :–कोणत्या निर्णयात किती कठोर व्हावे याचा लोकांना आदर्श धडा दाखवाल. मित्रमंडळीमधे कौतुकाचा विषय होईल. व्यवसायात मात्र या तत्त्वाला थोडी मुरड घालावी लागेल. हातातील काम पूर्ण करण्याला प्रथम प्राधान्य द्यावे लागेल.
मीन :–नात्यांमधे अहंकार व मी पणा येऊ देऊ नका. राजकारणात विरोधकांच्या कृतीला विरोध करण्यापूर्वी विचार करा. कोणालाही कोणत्याही प्रकारचा शब्द देऊ नका. व्यवहारातील गुपिते लोकांसमोर उघड करू नका. कुटुंबात वादग्रस्त विषय प्रेमाने व समजुतदारपणे सोडवा.
|| शुभं – भवतु ||
Thank you Tai