daily horoscope

दैनिक राशीभविष्य मंगळवार 06 आँक्टोबर 2020

Read In

 

मंगळवार 06 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

दिनांक 10 ऑक्टोबर रोजी राविचा चित्र नक्षत्रातील प्रवेश हा 23 ऑक्टोबर पर्यंतचा आहे. या कालावधीत अडकलेली सरकारी कामे, सरकारी योजना याबाबतचा लेख दिनांक 07 ऑक्टोबर रोजी देत आहे. या रवी मंगळाचा फायदा घेण्यासाठी ज्यांची रास मेष, वृश्चिक, वृषभ, तूळ, कन्या, मकर त्यांनी 07 ऑक्टोबर चा लेख वाचवा.

आज मंगळवार रोजी दिवसरात्र चंद्र राशी वृषभ, दिवस रात्र असून चंद्र नक्षत्र कृतिका 17 :52  पर्यंत आहे व नंतर रोहिणी नक्षत्र आहे. या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 वेळेच्या कुंडली नुसार विचार करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–आज तुम्हाला एखादे नवीन आव्हान स्विकारावे लागेल. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसायाची वृद्धी कराल. कुटुंबातील विवाहयोग्य तरूण तरूणींनी अचानक विवाहाबाबतची सकारात्मक दृष्टी निर्माण होईल. इतरांच्या गोष्टीत डोकावू नका.

 

वृषभ :-सरकारी  व कायदेशीर कामातील अडचणी दूर होऊन कामे मार्गी लागतील. उधार पैसे देताना  चार वेळा विचार करूनच द्या. विद्यार्थ्यांना नवीन मित्र मैत्रिणी मिळतील. महत्वाच्या कामात घेतलेल्या परिश्रमाची  किंमत इतरांना जाणवेल  व त्यांचेकडून कौतुक होईल.

 

मिथुन :–कुटुंबात आनंदी आनंद साजरा होईल. आत्तापर्यंत बिघडलेली नाती सुधारण्याची जबाबदारी स्विकारा. तुमच्या शब्दाने मोठे काम होईल. नोकरीत नवीन जबाबदारी सांभाळताना दमछाक होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल.

 

कर्क :–व्यवसायात वृद्धी होऊन मनासारखे काम सुरू राहील. आईकडील नात्यातून आनंदाची बातमी कळेल. प्रेमाचे परिवर्तन विवाहात करण्याचे विचार येऊ लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रम रद्ध करून महत्वाच्या बाबीना अग्रक्रम द्या.

 

सिंह :–आवडत्या मित्रमैत्रिणींची भेट झाल्याने दिवस आनंदात जाणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांनी  घाई करू नये. सर्व लूपहोल्सचा विचार करून निर्णय घ्यावा. पतीपत्नीमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी तुम्ही  पुढाकार घेतल्यास  वातावरण आनंदी बनेल.

 

कन्या :–तुमच्या इलेक्ट्रानीक्सच्या व्यवसायात अचानक तेजी येईल. व्यवसायिक नवीन नाते संबंध तयार होतील. व्यवसायाकरता लहानशसा प्रवास करावा लागेल. कलाकार मंडळीनी आपले व्यवहार जपून करावेत. वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल.

 

तूळ:–नोकरीच्या ठिकाणी तेथील तत्वे पटत नसली तरी कोणत्याही गटबाजीत पडू नका. स्वतःच्या घराला सुशोभित करण्याचे विचार पक्के कराल. व्यवसायात मोठी वसुली होईल व त्यातून गरजवंताला  मदत कराल  नातेवाईकात प्रतिमा उजळून निघेल. विचार न करता कोणालाही शब्द देऊ नका.

 

वृश्र्चिक :–व्यवसायानिनीत्ताने लहानशा प्रवास घडेल. मित्राच्या व्यवहारात साक्षिदार रहावे लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. वाहन चालवताना  वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. . महत्वाची कागदपत्रे सापडणार नाहीत.

 

धनु :–आजचा दिवस अतिशय आनंदात व उत्साहात जाणार आहे. नोकरीतील जून्या सहकार्‍यांची भेट होईल. लहान भावंडाना आर्थिक मदतीची गरज लागेल. गायकांना नवीन संधी मिळेल. आजच्या सूचक स्वप्नांचा विचारपूर्वक अर्थ लावल्यास घडणार्‍या घटनांबाबत पूर्व सूचना मिळेल.

 

मकर :–लहान कामासाठी जास्त कष्ट होतील  व आज कामातून  समाधान मिळणार नाही. टेक्निकलच्या तरूणांना नवीन काम शिकण्यास वाव मिळेल.  नोकरीत वरिष्ठांबाबत  आदर वाढवणारे प्रसंग घडतील व त्याचे साक्षिदार तुम्ही असाल . अचानक ख र्च वाढेल.

 

कुंभ :–गरज नसताना नवीन खर्च होईल. मन आवरू शकणार नाही. शेअर मार्केटमधे आज उलाढाल करू नका. राजकारणी व्यक्तींना एखाद्या कामाचे क्रेडीट मिळेल. सहकारयांसाठी अचानक मोठा खर्च करावा लागेल. प्रकृतीची काळजी वाढेल तरी लक्ष द्या.

 

मीन :–मित्रमंडळींच्या वर्तूळात तुमचे महत्व वाढेल. व्यवसायात नवीन फंडे वापरल्यामुळे आर्थिक व्यवहार वाढतील. जामीन राहताना दहा वेळा विचार करावा. आज तुमच्या आत्मविश्वासाला बळकटी  आणणार्‍या घटना घडतील. कुटुंबात मंगलकार्याच्या चर्चांना उधाण येईल.

 

||  शुभं – भवतु ||

 

 

 

 

 

One thought on “दैनिक राशीभविष्य मंगळवार 06 आँक्टोबर 2020

  1. Predictions are very short, must be deeply predicted with favorite numbers and daily dress code colors. If possible weekly and monthly predictions are expected, it’s your choice, if not doesn’t matter.

    1. Hi. We already have weekly horoscope predictions on each Sunday.Please have a look at them. Will think of incorporating Lucky Colors & Numbers, Also please note, Lucky Numbers and Lucky Dress Colors can vary depending on an individual’s date & time of birth.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *