daily horoscope

दैनिक राशीभविष्य सोमवार 05 आँक्टोबर 2020

Read In

 

सोमवार  05 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

आज सोमवार 05 आँक्टोबर

आँक्टोबर चंद्र रास मेष 21:40 पर्यंत, नंतर वृषभ रास आहे. चंद्र नक्षत्र भरणी 14:55 पर्यंत आहे व नंतर कृत्तिका सुरू होत आहे. आजच्या नक्षत्रांचा कालावधी व पहाटे 05:30  च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. आज  संकष्ट चतुर्थी असून मुंबईचा चंद्रोदय 20:41 आहे. प्रत्येक ठिकाणचा चंद्रोदय  1,  2.मिनीटांनी पुढेमागे असतो तरी पंचांग किंवा कॅलेंडरमध्ये पहावे. पहावे

मेष:- आजचा दिवस काहीसा नाराजीचा जाणार आहे. रेंगाळलेल्या सरकारी कामे पूर्ण करावीत. कन्या संतातीकडून आनंदाचे क्षण अनुभवयास मिळतील. नोकरीत काहीसे शांतता व तप्त अश्या समिश्र वातावरणाचा अनुभव येईल. जोडीदाराबरोबर सलगीचा वार्तालाप होईल.

वृषभ:- राहू भ्रह्मणाच्या या कालावधीत करावयाच्या कामांची यादी करा. गुरुजनांचा ऑनलाईन शिकवण्याचा पध्दतीतुन लाभ होईल. बहीण भावंडांच्या गोतावळ्यात स्वतःला हरवून जाल. आजोळकडून एकाच वेळी आनंदाची व मानसिक त्रास देणारी घटना कळेल. नुकतीच नोकरी बदलली असल्यास नवीन नोकरीच्या अपेक्षेने प्रयत्न करू नका. आहे तिथेच स्थिर राहावे लागेल.

मिथुन:- वडिलांकडे नात्यांसाठी औषध पाण्याचा खर्च करावा लागेल. विध्यार्थ्यांना दिलेले काम वेळेवर ना केल्यामुळे शिक्षकांच्या शिक्षेला सामोरे जावे लागेल. आई वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. जुळ्या मुलांकडून त्रास संभवतो.

कर्क:- बऱ्याच दिवसांपासून व्यावसायिकांचे अडकलेले पैसे येणायचे मार्ग खुले होतील. जोड धंद्याची परिस्थिती डळमळीत राहिल्याचे संकेत मिळतील. पाळीव पशु पक्ष्यांच्या खाद्य पदार्थांची विशेष काळजी घ्या. मुलांच्या मनात काय दडलंय हे युक्तीने जाणून घ्या.

सिंह:-  घरात नोकरीत आज सर्वेसर्वा तुमचेच राज्य आहे. आज खर्चही वारेमाप होणार आहे तरी खिशात जास्त पैसे ठेऊ नका. आईच्या आध्यत्मिक कार्याला हातभार लावाल.संततीच्या अभ्यासातील प्रगती पाहून नाराज व्हाल.

कन्या:- परगावी असलेल्या आई वडिलांशी संवाद घडेल. आज पाठोपाठ दोन प्रकारचे लाभ होणार आहेत. त्याचा शोध तुम्हीच घ्यायचा आहे. महत्वाची कागदपत्रे ऐनवेळी सापडणार नाहीत. वडिलांकडील नात्यांचा रोष ओढवून घ्यावा लागेल.

तुळ:- व्यवहारात बोलण्याचा प्रभाव पडून बाजी माराल. व्यवसायातिल आर्थिक गुपिते उघड करू नका. आईला हाडांचा व संधीवताचा त्रास असेल तर दूर्लक्ष करू नका. संतीतीच्या वागणे गूढ वाटेल. पोटाची तक्रार निर्माण होईल. अपचन पित्ताचा त्रास होईल.

वृश्चिक:- मनातील दबलेल्या विचारांना मोकळी वाट द्या. शिक्षक, पुरोहित, भटजी ज्योतिषी यांना मिळणारे खात्रीपूर्वक पैसेही आज मिळणार नाही. नोकरीतील पत्रव्यवहार वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय करू नका. अध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने कामे सुलभ होतील. सहारे मार्केट मदगये उलाढाल करू नका. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.

धनु:- अति चर्चेमुळे मेंदूवर ताण पडेल. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या मंडळींना तूर्तास डिस्चार्ज मिळणार नाही. खिशातील पैसे खर्च न होता तसेच राहतील. पोलीस मंडळींना एखाद्या गूढ कामाच्या तपासाची जबाबदारी येईल. आईबरोबर वैचारिक मतभेद होतील. विषारी किडा चावल्यामुळे ऍलर्जी होईल दुर्लक्ष करू नका.

मकर:- आजचा दिवस काहीसा आळसावलेला जाणार आहे. जुने त्रासदायक विचार मनातून काढून टाकावे लागतील. पैशाचा हिशोब चोख ठेवा (इन्कम टॅक्स च्या दृष्टीने). लहान भावंडास वाहनापासून दुखापत होण्याचा धोखा आहे. हातातील प्रत्येक कामाकडे भाग्योदयाची पहिली पायरी आहे असे समजून पहा. मित्र- मैत्रिणींची गुपिते कळतील.

कुंभ:- पडलेल्या सूचक स्वप्नांचा अर्थ सद्य परिस्थितीशी जुळवून पहा. कुटुंबात पतिपत्नी मधील वाद संपण्याची चिन्हे दिसतील. उष्णतेचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्यावी. लहान मुलांच्या तापाकडे विशेष लक्ष द्या. नोकरी व्यवसायत बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मीन:- गैरसमजुतीने रंगाचा पारा चढेल. हॉस्पिटलमधील व्यक्तींच्या आरोग्यात अचानक सुधारणा होईल. व्यावहारिक पातळीवर मित्र मैत्रिणीबरोबर चोख राहा.  वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. पैसे हरवण्याचा संभव आहे.

।।शुभं भवतु।।

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *