Read In
साप्ताहिक भविष्य
साप्ताहीक भविष्य रविवार 04 आँक्टोबर ते शनिवार 10 आँक्टोबर 2020
साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.
या सप्ताहात चंद्र मेष, वृषभ मिथुन, कर्क या राशीतून. भ्रमण करणार आहे. 4 र रविवार मेष संपूर्ण दिवस नक्षत्र अश्र्विनी तुपारी 11:51 पर्यंत, सोमवार 5 रोजी रात्री 9:40 पर्यंत मेष रास व नंतर वृषभ सुरू होते. नक्षत्र भरणी 14:55 पर्यंत, मंगळवार 6 रोजी वृषभ दिव रात्र व नक्षत्र कृत्तिका 17:52 पर्यंत, बुधवार वृषभ व नक्षत्र रोहिणी 20:34 पर्यंत , गुरूवार 8 रोजी 09:46 पर्यंत वृषभ व 09:46 नंतर मिथुन, मृगशीर्ष 09:46 ते 22:48 पर्यंत, शुक्रवार 9 रोजी मिथुन दिवसरात्र व रात्री 12:00 (24:00)पर्यंत आर्द्रा, शनिवार 10 रोजी 19:08 पर्यंत मिथुन व नंतर कर्क पुनर्वसु नक्षत्र 25:16 पर्यंत.
सोमवारी 05 रोजी संकष्ट चतुर्थी आहे व चंद्रोदय 08:42 चा आहे.
वरीलप्रमाणे प्रत्येक दिवसांच्या राशी नक्षत्र आवरून व प्रत्येक दिवसाच्या पहाटेच्या 05:30 च्या निसर्ग कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– कोणतीही गोष्ट मनात आली व केली असे केल्याने एक तर ती गोष्ट पूर्ण होत नाही किंवा यशस्वाी होत नाही. तरी नवीन कामाला सुरूवात करताना पूर्ण विचार करा, तज्ञांचा, ज्येष्ठांचा सल्ला घ्या व मगच करा. तुम्ही पोलादी मनाचे असूनही या सप्ताहात मन काही प्रमाणात हळवे होणार आहे. वडिलांकडील कुटुंबातून काळजी लावणारा निरोप येईल. उच्चशिक्षणासाठी जाणार्यंचा बेत अजूनही पुढे ढकलला जाईल. मानसिक आजार असलेल्यांना 6 व 7 रोजी जास्त जपावे लागेल. 8 रोजी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. समोरील व्यक्ती दुखावली जाणार नाही याची दखल घ्या. नोकरीत तात्पुरती झालेल्या बदलीत सुधारणा होऊन पुनः पूर्वपदावर आणले जाईल. संततीच्या आळसावर बोलताना योग्य उदाहरणांचा वापर करा तरच त्याचा उपयोग होईल. रविवार 4 ची संकष्ट चतुर्थी महिला व पुरूषांना सासूरवाडीकडून उपदेश करणारी ठरेल.
वृषभ :–मानसिक त्रासामुळे दुखणे आल्यासारखे वाटेल. ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्यांनी मन शांत ठेवून परिस्थिती मान्य करण्याचे धोरण स्विकारा. नोकरीत वरिष्ठांबरोबरील संबंध त्याच्याबरोबर संवादाने वाढतील तरी संवाद टाळू नका. चूक मान्य करण्याचे धाडस दाखवा. स्वतःचा व्यवसाय असलेल्यांनी जाहिराती ऐवजी ओळखीच्या लोकांशी संपर्क साधल्याल चांगला उपयोग होईल. वयस्कर मंडळीना अध्यात्मिक मार्गदर्शन मिळेल. मार्गदर्शनाने वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल. नात्यातील मानसिक किंवा शारिरीक अपंग व्यक्तीस मानसिक आधार द्यावा लागेल. वास्तुविषयक अभ्यासकांनी नियमांपेक्षा वस्तुस्थितीवर भर द्यावा. हाँस्पिटलाईज असलेल्यांच्या आरोग्यात अजून सुधारणा आवश्यक असल्याने लगेच डिस्चार्ज मिळणार नाही.
मिथुन :– संतती बरोबर संवादाची गरज निर्माण झाल्याचे जाणवेल. टिन एजर्ससाठी समुपदेशनाची सोय करावी लागेल. प्रेमाच्या अवास्तव कल्पनांना तडा जाऊन मन ताळ्यावर राहणार नाही. 7 व 8 रोजी चा आई बरोबरचा संवाद महत्वाचा राहील. ज्येष्ठांना दिलेला शब्द स्वतः झीज सोसून पाळाल त्यामुळे आनंद होईल. नोकरीच्या शोधातील व्यक्तींना मनासारखी नोकरीची दिशा मिळेल. पण स्वतःचे क्षेत्र सोडून बाहेर जावे लागेल. गावी असलेल्या जून्या पुराण्या घराचे नुतनीकरण करण्याचा विचार पक्का होईल व्यवसायात आर्थिक बाजू चांगली राहिल.विवाहेच्छुनी कोणत्याही भ्रामक कल्पनेच्या आहारी जाऊ नये. सोमवारची संकष्ट चतुर्थी मनातील ईच्छा पूर्ण करणारी ठरेल.
कर्क:–नोकरीत तात्पुरत्या वेळेकरीता दुसर्या आँफीसमधे बदली होईल. मनाचा खंबीरपणा वाढवावा लागेल. नोकरीतून लाभदायक घटना घडतील. कुटुंबात मंगलकार्याचे नाद उमटतील. कामात तुम्ही तयार केलेल्या पद्धतीमुळे तुमची प्रशंसा होईल. विवाहेच्छुनी कोणत्याही परिस्थितीत विवाहाचा हट्ट करू नये. अपेक्षित बाबींची पूर्तता होत असेल तरच विचार करावा अन्यथा विवाह लवकरच वादग्रस्त बनेल. व्यवसायात दिलेल्या वेळेत काम पूर्ण करून दाखवाल. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक अडचणीतून सुटका होईल.5 व 6 रोजी लहान भावंडाच्या तब्बेतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक बाबतीतील रेंगाळलेल्या प्रश्र्नांना अजूनही वेळ द्या, घाई करू नका.
सिंह :–विवाहेच्छुकांनी आपल्या अवाजवी अपेक्षांचे ओझे कमी केल्यास येत्या दोन महिन्याच्या कालावधीत विवाहाचे वारे वाहू लागतील. नोकरदार वर्ग अचानक चैन मजेचा विचार करू लागेल व 4 व 5 रोजी चैनीवर पैसे खर्च होतील. व्यावसायिकांना आत्ताच्या परिस्थितीवर आधारीत वेगळा जोडधंदा करण्याची ईच्छा निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचा विचार घ्या. सोशल मिडीयाचा वापर कराल तर चारही दिशेकडून विचारणा होईल. आई वडिलांची फार पूर्वीपासूनच असलेली ईच्छा पूर्ण करण्याचे भाग्य लाभेल. लाँक डाऊनमधे घरामधे बंद असलेल्यांना ऊधळावेसे वाटेल. मन आवरणार नाही.
कन्या :–विलासी वृत्तीत अचानक वाढ होईल. महिला वर्ग सण समारंभ कसा साजरा करायचा याचे नियोजन करू लागेल. खरेदीला जोर येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या वागण्याची चेष्टामस्करी होईल तरी तुम्हाला भावनाना आवर घालावी लागेल. उच्चशिक्षणासाठी जाणार्यानी आता विचार करायला हरकत नाही पण तज्ञांचा व तिकडे गेलेल्यांचा सल्ला घ्यावा. गूढकथा लेखकांचे समाजाकडून कौतुक होईल. महत्वाची कामे 6 व 7 तारखेना करायचे ठरवा. नवीन वस्त्रांची खरेदी कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येणार आहेत तरी काय काय करावे याचे नियोजन आवश्यक आहे.
तूळ :– भावकडील अडचणीची बातमी कळेल व त्यांच्यासाठी धावपळ करावी लागेल. राजरीय क्षेत्रातील परिस्थिती अचानक बदलेल काहीही अंदाज करता येणार नाही. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. तुमची गरज दुसर्या आँफीसला निर्माण झाल्यामुळे तुम्हाला बदली मिळेल. ही बदली आँक्टोबर च्या २१ तारखेपर्यंत राहील. नवीन कार्यक्षेत्राशी संबंध येऊन महत्वाची कामे 6 व 7 रोजी करा. प्रतिष्ठेत वाढ होईल. रेंगाळलेल्या प्रश्र्नांना आता वेळ दिल्यास कामे मार्गी लागतील.
वृश्र्चिक :–आजोळ कडून तुमच्या कामाचे कौतुक होईल व नातेवाईक प्रशंसा करतील. मेहनत सार्थकी लागेल व इतरांकडून पण शाबासकी मिळवाल. 7 व 8 रोज क्रोधावर नियंत्रण ठेवावे. पूर्वीच्या चुका दुरूस्त करण्याची संधी मिळेल पण त्याचा मोठ्या मनाने स्वीकार करा. नवीन ओळखीचा चांगला उपयोग करून घ्याल. या सप्ताहात व्यवसायातून चांगली अर्थप्राप्ती होईल. लधु उद्धोजक नव्याने गुंतवणूक करण्याचा विचार करतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
धनु:–किर्तनकार, प्रवचनकार यांचेकडून समाजहिताचे काम होईल. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल. समाजाकडून ही चांगला प्रतिसाद मिळेल. वैवाहिक जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी समुपदेशकाची गरज जाणवेल. तुमच्या आवडत्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती कराल. उच्चशिक्षणातील अडथळे दूर होतील व प्रोसेस सुरू होईल. 5 व 6 रोजी सरकारी अडकलेली कामे स्वतःच्या हिमतीवर करून दाखवाल. नोकरीत प्रगतीसाठीची नवीन संधी प्राप्त होईल. अर्थप्राप्ती चांगली होऊन मनासारखा खर्च करता येणार आहे.
मकर :–नोकरी व्यवसायात छान प्रगती झाल्याचा रिमार्क वरिष्ठांकडून मिळेल. जबाबदारी वाढ होईल. सद्यपरिस्थितीत पगारात होणारी वाढ बघून आश्चर्य वाटेल. नवीन कामाची संधी मिळेल व ती स्विकारली तर संधीचे सोने कराल. भाऊ बहिणीच्या भागीदारीच्या व्यवसायात चांगली वृद्धी होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. 8 व 9 रोजी मित्र व आप्तेष्टांच्या भेटी होणार असल्याने कोरोनाच्या बाबतीत काळजी घ्यावी बेफिकीर राहू नये. हा सप्ताह संमिश्र अनुभवाचा राहिल.
कुंभ :–पूर्ण विचार करून मगच काम करण्याची वृत्ती असूनही नवीन कामाची घाई कराल. समोरील व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज येणार नाही. अचानक खाण्यापिण्यावर खर्च करावा वाटेल, चैन करावी वाटेल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींकडून तुमच्या कार्याची प्रशंसा होईल. विवाहेच्छुनी महत्वाचे विषयांवर सविस्तर बोलून शंकांचे निरसन करून मगच निर्णय घ्यावा. 6 व 7 रोजी नोकरीत नव्याने घेतलेली जबाबदारी यशस्वीरीत्या करत असल्यामुळे वरिष्ठ खूष होतील. प्रवासात एखादी वस्तू विसराल व ती कोठे विसरलात हे आठवणार नाही.
मीन :–सरकारी व कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील. अनावश्यक प्रवास टाळावा लागेल. आरोग्यावर ताण पडू नये याची काळजी घ्या. राजकारणात विरोधकांना वरचढ व्हाल. त्यांचे कोणतेच डावपेच चालणार नाहीत. नोकरीतील कामाचा बोजा वाढेल तरी कामाचे नियोजन आवश्यक आहे. 4 व 5 रोजी कलावंतांकडून एखादी वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती सादर होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मुलांकडून समाधानाची बातमी कळेल. आजी आजोबांकडून महत्वाच्या बाबतीत सल्ला मिळेल.
|| शुभं – भवतु ||