Read In
शनिवार 3 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज सकाळी 08:51 पर्यंत मीन रास असून नंतर मेष आहे. तसेच सकाळी 8:51 पर्यंत रेवती नक्षत्र असून नंतर अश्र्विनी नक्षत्र आहे. मेषेचा स्वामी मंगळ व अश्र्विनी नक्षत्राचा स्वामी केतू आहे. दोन्ही नक्षत्रांच्या गुणधर्मांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. आजचा दिवस सामान्य आहे.
मेष:–मनामध्ये कांहीतरी भव्यदिव्य करण्याचे विचार येतील. आमली क्षमता व आवाका बघून कामाची निवड करा. आनंदाच्या भरात स्वतःची गोष्ट देउन टाकाल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना स्वतःच्या कार्यक्षेत्राप्रमाणे संधी चालून येईल. पण पूर्ण विचारानेच बदल स्विकारा.
वृषभ :–अतिकामामूळे थकवा जाणवेल. वयस्कर मंडळीना तरूणांनी सहकार्य करावे. व्यवसायासाठी कर्जाचा विचार योग्य आहे याची जाणीव होईल. कोणतेही काम करताना घाई करू नये. कामाच्या मोबदल्याची अपेक्षा पूर्ण होईल.
मिथुन :–वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. निवडलेल्या जोडीदाराला स्वतःविषयी माहिती व्यवस्थित द्या. भाड्याने घर घेऊ इच्छिणार्यांना मनपसंत घराची माहिती मिळेल. डाव्या डोळ्याची काळजी घ्या. फेरीवाल्यांना नुकसान सोसावे लागेल.
कर्क :–व्यवसायात नव्याने गुंतवणूक करण्याची गरज निर्माण होईल. तरूण व प्रौढ महिलांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. नोकरीत तुमचे अंदाज खरे ठरतील. वकील मंडळीनी आपल्या अभ्यासाशिवाय बोलू नये.
सिंह :–समाजातील दुर्लक्षित व्यक्तींची दखल घेतली जाईल. लहान घरगुती व्यावसायिकांना अर्थप्राप्तीचा नवा मार्ग सापडेल. मैत्रीच्या संबंधातून मानसिक त्रास निर्माण होईल. कलावंताना मानसन्मान मिळेल पण आर्थिक प्राप्ती होणार नाही.
कन्या :–नोकरीत व कुटुंबातही बिघडलेली परिस्थिती पूर्व पदावर येऊ लागेल. आज महत्वाच्या कामाला सुरूवात करू नका. इतरांना दिलेला शब्द पाल्याने तुमचे कौतुक होईल. नातेवाईकांबरोबर वादाचे प्रसंग येथील.
तूळ :–खर्चावर नियंत्रण ठेवून कुटुंबाला त्याचे महत्व पटवून सांगाल. कौटुंबिक प्रश्र्न कौशल्याने व चतुरपणे सोडवाल. लहान मुलींना रागावर नियंत्रण करण्यासाठी उदाहरणाने पटवून द्याल. अपेक्षित व्यक्तींकडून फैसे परत मिळतील.
वृश्र्चिक :–सावधानता व सहनशीलता वाढवावी लागेल. आपण म्हणतो तेच खरे ही वृत्ती सोडल्यास मित्रांचे व इतरांचेही सहकार्य मिळेल. नोकरीतील अडचणींच्या प्रसंगावर मात कराल. आर्थिक पेच सुटेल. प्रवासात आरोग्याची काळजी घ्या
धनु :–कुटुंबात स्थावर इस्टेटीबाबत चर्चा होईल. सामंजस्य दाखवाल. मित्रमंडळीमधे एखादी पैज लावली असेल तर नक्की तुम्हीच जिंकणार आहात. सामाजिक स्तरावर तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. मनामध्ये असलेल्या विचारांबाबत सूचकता मिळेल.
मकर :–कामातील केलेल्या दिरंगाई साठी पेनल्टी भरावी लागेल. व्यवसायात मोठी वसुली होईल व आत्ताच्या गरजेला तेवढ्याने ही मदत होईल. नातेवाईकांत अंतर्गत वादाला तोंड फुटेल तरी सावध रहावे. लहानशा प्रवास घडेल.
कुंभ :–मनातील संकल्पना मूर्त रूप येत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्या. वयस्कर मंडळीना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल. प्रेमाच्या अवास्तव कल्पना दूर करून वास्तवाचा विचार करावा लागेल.
मीन :–अडचणींच्या प्रसंगी मनोबल वाढविल्यास योग्य मार्ग सुचतो, सापडतो याची प्रचिती येईल. पूर्वी केलेल्या चुकीच्या कामाबाबत दंडाची वसूली न भरल्याने पुनः नोटीस येईल, दुर्लक्ष महागात पडेल. कामाचे मानसिक समाधान मिळेल.
|| शुभं – भवतु ||
मार्गदर्शन चांगले मिळते
Thank you Tai
Tai, aabhari aahe