daily horoscope

दैनिक राशीभविष्य शुक्रवार 2 आँक्टोबर २०२०

Read In

 

शुक्रवार 2 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

आज चंद्र रास मीन आहे  व नक्षत्र रेवती आहे. मीन राशीचा स्वामी गुरू असून रेवती नक्षत्राचा स्वामी बुध आहे. गुरू आणि बुध हे मित्र ग्रह नाहीत. या दोन्ही नक्षत्रांच्या गुणधर्मांचा विचार करून व आजच्या सकाळच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष:–आज तुमच्या स्वभावातील लहरीपणात अचानक वाढ होईल. कोणत्याही गोष्टीत पक्का निर्णय घेता येणार नाही. बोलताना संदर्भ लागणार नाहीत तरी आँन लाईन काम, ओरीएंटेशन, असे बोलण्याचे काम काळजीपूर्वक करावे लागेल नाहीतर समाजात चुकीचे मेसेज जातील.

 

वृषभ :–तुमचा राशी स्वामी व आजचा नक्षत्र स्वामी मित्र असल्याने तुमच्या विचारांत मोकळेपणा येणार आहे. बोलणे व सहवास दोन्ही आनंददायी राहील. आईबरोबरील गप्पांमध्ये रंगून जाल. वडीलांचे नॉलेज बघून त्यांच्याविषयी पूर्वीपेक्षा जास्त आदर निर्माण होईल.

 

मिथुन:– प्रवासी संस्थेतील कर्मचार्‍यांना आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबातील कर्तृत्ववान महिलेचा आदर्श नजरेसमोर ठेवून कामाची दिशा ठरेल. नोकरीत अचानक विरोधक वरचढ होतील किंवा जवळच्याच ठिकाणी बदली होईल.

 

कर्क:–आवडत्या वस्तूंची खरेदी कराल. नात्यातील गुप्त गोष्टींची बातमी कळेल. आईचा लिव्हरचा प्राँब्लेम असेल तर विशेष काळजी घ्या. मुलांबरोबर आजकाल का संवाद होत नाही याचा विचार करा व त्यांना बोलते करा.

 

सिंह :–मनातल्या अती अपेक्षांना मुरड घालावीलागेल.,  तरीही उत्साह मावळणार नाही. आरोग्याच्या दृष्टीकोनातून आज विशेष काळजी घ्या व डोळेझाक करू नका. कुटुंबात पत्नीबरोबर मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. नवीन नोकरीचे मार्ग खुले होतील.

 

कन्या :–राहत्या घराच्या सुखसुविधासाठी खर्च उद्भवेल. स्वतःच्या मालकीच्या जागेतील व्यवसाय जोरात चालेल. कोणत्याही कामासाठी दुसर्यांवर अवलंबून राहू नका. विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे  मार्ग ओपन होतील. कौटुंबिक नात्यात मिश्र फळे मिळतील.

 

तूळ :–व्यवसायासंबंधित लांबच्या व्यक्तीबरोबर अंधविश्वासाने काम करू नका. कोर्ट कचेरीची प्रकरणे पुढे ढकलणे हिताचे ठरेल. नोकरीत वरिष्ठांबरोबरील संबंध वृद्धींगत होण्याचे संकेत मिळतील. लहान भावाची काळजी घ्यावी लागेल.

 

वृश्र्चिक :–आर्थिक बाबतीत नियोजनाची गरज भासेल. गुंतवणूकीचा आज विचारही करू नका. पण जुन्या गुंतवणूकीतून फायदा होईल. व्यवसायात व नोकरीतही अचानक मानाचे पान मिळेल. मनातील ईगोला धक्का लागेल..

 

धनु :–इलेक्ट्रानीक क्षेत्रातील कर्मचार्‍यांना वेगळ्याच नकारात्मक अडचणीला सहन करावे लागेल. कामाचा बोजा वाढल्याने उगाचच चिडचीड होईल. खाण्यापिण्यावर नियंत्रण न ठेवल्यास आजारपणाला आमंत्रण मिळेल. उधार उसनवार पैसे देण्यापूर्वी विचार करा.

 

मकर :–शेअर्समधील पूर्वीची गुंतवणूक भरपूर फायदा मिळवून देईल. नवीन घराचा विचार सहजपणे सुटेल. राजकारणातील डावपेच यशस्वी होत नसल्याचे कळेल तरी आज गप्प रहावे. तब्बेतीच्या तक्रारी घूमजाव करतील.

 

कुंभ :–आजवर केलेल्या कामाला घवघवीत यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे व उत्साहाचे राहील. ज्येष्ठांना दिलेला शब्द पाळल्याचा आनंद होईल. नोकरीत व बाहेरही चांगले सहकार्य मिळेल. मित्रांची अडचण बुद्धीचातुर्याने सोडवाल.

 

मिन:–नोकरी नवीन असूनही चांगला जम बसेल. कामात कार्यक्षमता वाढेल. प्रवासात मौल्यवान वस्तूस जपावे. विवाहेच्छुकांना मनपसंत जोडीदार मिळेल उगाच नकारात्मकता दाखवू नका. अनाठायी खर्चाला आवर घालावा लागेल.

 

||   शुभं – भवतु ||

 

 

 

 

One thought on “दैनिक राशीभविष्य शुक्रवार 2 आँक्टोबर २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *