Read In
गुरूवार 1 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज दिवसरात्र चंद्र रास मीन असून दिवसरात्र उत्तरा भाद्रपदा हे नक्षत्र आहे. उत्तराभाद्रपदा हे मनुष्य गणी नक्षत्र असून त्याचा स्वामी शनी आहे. आजचा दिवस दुपारी 01: 28 नंतर शुभ असून सर्व शुभकार्यांना चांगला आहे दुपारी नंतर मौल्यवान वस्त्र धारण करण्यास, औषधी वृक्ष लावण्यास विद्धारंभ करण्यास अतिशय शुभ आहे.
मेष :–आज तुमच्या मनाला, शरिराला आलेला आळस तुम्हाला जाणुन बुजून झटकावा लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणीही कामात संथपणा येईल. मशीनवर काम करणार्यांनी विशेष काळजी घ्यावी. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
वृषभ :- आज एखादे धाडसाचे काम करण्याची इच्छा होईल. दुसर्यांच्या सांगण्यावरून कोणालाही जाउन भिडू नका. तरूणांना अती उत्साहात धावपळीत एखादी लहानशी दुखापत होण्याचा धोका आहे. वयस्कर मंडळींना शालेय जीवनातील मैत्रीचे क्षण आठवतील तरी मित्रमैत्रीणींचा शोध घ्या.
मिथुन :–आज तुमचेच मित्र नक्षत्र आहे. तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या कामात एकदम चोखपणाने मदत करणार आहे. कोणत्याही न्यायनिवाडा प्रक्रियेत असाल तर अतिशय प्रामाणिकपणे न्याय कराल. कितीही दबाव आला तरी शनीमहाराज तुम्हाला सत्याच्या बाजूलाच नेणार.
कर्क :–तुमच्या विचारांना, भाव भावनाना एकदम रूळावर आणण्याचे काम शनीमहाराज करणार आहेत. मनाचे कोणतेच खेळ आज चालणार नाहीत. सत्य वस्तुस्थितीवर कामकाज चालेल. कोणाच्याही आर्थिक व्यवहारात पडू नका.
सिंह :–तुमच्या जिद्दी पणावर लोक आज संशय घेतील.तुमच्या स्वयंघोषित राजेपणाचे लोकांना गूढ वाटेल. महत्वाची कामे बोलून, चर्चेने निकालात लावली तरी त्याचे नोटींग केले नाहीतर पुढे तुम्ही अडचणीत याल. आज खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक आहे.
कन्या :–कोणत्या कामात एकदम टोकाची भूमिका घेउ नका. मुलांकडून आज मनस्ताप होणार्या घटना घडतील तरीही विचाराने वागावे लागेल. वाहन दंड किंवा तत्सम कांही पेनल्टी भरावी लागेल. व्यवसायात मोठी वसुली होईल.
तूळ :–बोलण्यात कडवटपणा येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या वरच्या प्रेमाला, आधाराला तडा जाईल असे वागू नका. तोंडात मध ठेवूनच बोला. राजकीय क्षेत्रातील सहकारी आपला शब्द पाळणार नाहीत. तरूण वर्गास नोकरीत नवीन संधी सापडतील.
वृश्र्चिक :–राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याची पोच समाजाकडून मिळेल. घशाच्या त्रासातून मुक्तता वाटत असली तरी बेफिकीर राहू नका. न्यायालयातील कर्मचार्यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन करू नये.
धनु :–व्यावसायिकांची एखाद्या दंडातून मुक्तता होईल. राजकीय कारकिर्द असलेल्यांनी लोकांसमोर व्यक्त होताना सौम्यपणाने बोलावे. तरूणांना परदेश गमनाची ओढ लागेल. नवीन नोकरीतील निगेटिव्ह बाजूचा विचार करून मगच निर्णय घ्या.
मकर:–सरकारी प्रलंबित कामापासून त्रास उद्भवेल. महिलांना युरीन इन्फेक्शनचा त्रास संभवतो. वयस्कर मंडळीनी कोणतेही पथ्य मोडू नये. लहान मुलांच्या पायांची काळजी घ्यावी लागेल. मिष्टान्नाचा बेत जमेल.
कुंभ :–कौटुंबिक स्तरावर कोणत्याही चर्चेतून वादाचे प्रसंगापर्यंत जाऊ देउ नका. शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केल्यास करिअरची वाटचाल सोपी जाईल.
मीन :सर्वच स्तरावर आनंद निर्माण होईल. बौद्धीक क्षेत्रातील मंडळीना विशेष मानसन्मान मिळेल. तसेच त्यांना एखाद्या कमिटीचे प्रमूख म्हणून नेमले जाईल. सरकारी क्षेत्रातील अधिकारी वर्गास विशेष अधिकार दिले जातील. नोकरीतील कामाचा आवाका आवरणार नाही.
|| शुभं – भवतु ||
Bhavishya nehmi accurate aste Tai, thank you
Dhanyawad Tai