Read In
बुधवार 30 सप्टेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज संपूर्ण दिवस रात्रीचे 08:35 पर्यंत चंद्र रास कुंभ असून नंतर मीन आहे. मंगळवारच्या 24:47 पर्यंत शततारका असून नंतर बुधवारी संपूर्ण दिवस पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र आहे. हे नक्षत्र मनुष्यगणी असल्याने धनु, मीन, या राशीना विशेष लाभदायक आहे. आजचा दिवस हा शुभ दिवस आहे. वरील दोन नक्षत्रांचा, राशीचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
मेष :–धनु वा मीन राशींच्या मीत्र मैत्रिणींकडून महत्वाची मदत होईल. घरांत मुलांबरोबर आनंद साजरा कराल. नोकरीत ज्युनिअर मंडळींना एखादे प्रशिक्षण देण्याचे काम अचानक ठरेल व ते तुम्ही अतिशय चोखपणे फार पाडाल.
वृषभ :–दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना चांगल्यापैकी आराम पडेल. मनाची चलबिचल वाढेल. प्रयत्नांती परमेश्वर हे सिद्ध करून दाखवाल. स्त्रीरोगतज्ज्ञांना आपले कौशल्य पणास लावून एखाद्या केसवर उपचार करावे लागतील.
मिथुन:–श्री गुरूकृपेने अवघड काम मार्गी लावून दाखवाल. व्यावसायिकांना आपल्या कर्जाची सोय होत असल्याचा बँकेचा निरोप येईल. कोर्टाच्या कामातून मुक्त करण्यासाठी विनंती केल्यास ते काम दुसर्यांकडे सोपवणे वरिष्ठ मान्य करतील.
कर्क :–आज करणार्या गुंतवणूकीतून भविष्यात चांगले लाभ होतील. बहिण भावंडानी आपले मतभेद चव्हाट्यावर आणू नयेत त्याचा परिणाम दिर्घकाळ सोसावा लागेल. छानछोकी व चैनीच्या वस्तूसाठी अचानक पैसे खर्च कराल.
सिंह :–व्यवसायाच्या नवीन दिशा समजतील तरी त्याचा विचार करायला हरकत नाही. आवडत्या छंदासाठी वेळ काढता येणार आहे. नोकरीत पगार व अधिकार यापेक्षा मोठ्या जबाबदारीचे काम सोपवले जाईल. कौटुंबिक नात्यात उगीचच हळवेपणा जाणवेल.
कन्या :–व्यवसायात आलेल्या अडचणी मूळे लगेच खचून जाऊ नका. पुढील आठवड्यात त यांवर मार्ग निघणार आहे. भावंडांबरोबरचे मौन किंवा नाराजी संपवण्याचा आजचा दिवस आहे. तरी तुम्ही पुढाकार घ्या. प्रिय नात्याची काळजी घ्या.
तूळ :–आज बोलून बोलून तोंड दुखायला लागेल. व्यक्तिगत पातळीवर नात्यातील वागण्याचा अर्थ लावत बसू नका. स्वतःच्या चुकीने नातेसंबंध बिघडण्यास कारणीभूत ठराल. व्यावसायिकांनी बाजारातील नवा कल बघून योजना आखाव्यात.
वृश्र्चिक :–समोरील व्यक्तिच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायलाच पाहिजे असे नाही तरी मौन बाळगणे हिताचे ठरेल. भावंडांबरोबर सलोखा निर्माण करा. आनंदाच्या भरात स्वतःची गोष्ट देउन टाकाल. बहिणीकडील खुशाली समजून घ्या.
धनु :–मनाचा दानशूर पणा आज ऊफाळून येईल. देवभक्त मंडळीना अचानक गुरूतुल्य व्यक्तीची भेट होईल. साहित्याची आवड असणार्यांना व्यासपीठ उपलब्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मकर :-अपेक्षित पत्र, निरोप वेळेवर येईल आता वाट बघावी लागणार नाही. नोकरदारांना कर्तबगारी दाखवता येणार आहे. कुटुंबात आनंदोत्सव साजरा करण्यात येईल. मुलांच्या मनावरील दडपण दूर होईल. वयस्कर मंडळीआनंदात रमून जातील.
कुंभ :–अध्यात्मिक अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल. श्री गुरूकृपेच्या सहवासात त्यांच्या वागण्याविषयी गूढ निर्माण होईल. कुटुंबात ताणतणावावर मात करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्या. व्यावसायिकांना प्रयोगावर भर द्यावयाचा असेल तर तज्ञांच्या सल्ल्याने करावे.
मीन :– मनातील विचारांचा गोंधळ वाढेल. तरी मन शांत ठेवावे. नोकरीत महिला बाँसचा त्रास संभवतो. पुरूष वर्गाने अदबीने वागावे. आजची शेअर्स मधील गुंतवणूक फक्त काँसमेटीक्स किंवा हेल्थ प्राँडक्टवर करावी भविष्यात त्यातून चांगला लाभ होईल.
|| शुभं – भवतु ||
Dhanyawad Tai
Thank you Tai