Read In
मंगळवार 29 सप्टेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज उजाडता कुंभ रास असून ती अहोरात्र आहे. तसेच धनिष्ठा नक्षत्र 28 सप्टेंबर रात्री 10.37 ला श्रवण संपले असून उद्या पहाटे 02.47 पर्यंत शततारका नक्षत्र आहे. या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 वेळेच्या कुंडली नुसार विचार करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आजचे नक्षत्र शततारका नक्षत्राचे मुख्य गुण अप्रतिम बुद्धिमत्ता, विद्याव्यासंगी, घमेंडकखोर, स्वार्थी, लोभी हे आहेत या नक्षत्राचा स्वामी राहू आहे. राहूचा मुख्य गुण म्हणजे संमोहीत करणे.
मेष :- आज आपली आवड जोपासण्यासाठी प्रवास घडतील. नातेसंबंधात आनंदाची वृद्धी होईल. संतातीकडून आनंदाची वार्ता कळेल. बरेच दIवास न्यायालयात रेंगाळत असलेली काम मार्गी लागतील. सरकारी नोकरदारांना आजचा दिवस कष्टदायक आहे. दुसऱ्या संततीच्या विचार करणाऱ्यांना आनंदवार्ता समजेल. मानसिक त्रास संभवतो.
वृषभ:- आपल्या कलेला आज वाव मिळणार आहे. संततीबरोबर झालेल्या मतभेदांमुळे मनस्ताप होईल. महिलांनी व्यवसायात केलेली गुंतवणूक लाभदायक ठरणार आहे. नोकरदार मंडळींना आज जरा जास्त मेहनत घ्यावी लागेल. जोडीदाराशी वैचारिक मतभेद होतील. कानाशी संबंधित आजार संभवतात.
मिथुन:- मिथुनच्या लोकांसाठी आजाच दिवस लाभदायी ठरणार आहे. श्री गुरुमाऊलींकडून अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग सापडेल. विध्यार्थी वर्गाला अवघड विषयासाठी जास्त कष्ट लागतील. नोकरदार मंडळींनी सहकाऱ्यांशी सांभाळून वागावे. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. आजारातून आराम पडेल.
कर्क:- आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी कराल. संततीशी शांतपणे बोला नाहीतर मतभेद होतील. व्यवसायातील गुंतवणीकीतून लाभ संभवतो. श्रीगुरुमाऊलींकडून अध्यात्मिक यशाचे संकेत मिळतील. नोकरीच्या ठिकाणी सांभाळून वागावे. जोडीदारासोबत प्रवासाचे योग्य आहेत. महिला वर्गाला सासुरवाडीकडून अचानक भेटवस्तू मिळेल.
सिंह:- महिला वर्गाला आजचा दिवस आनंददायी आणि लाभदायी आहे. वडिलधाऱ्या मंडळींकडून अचानक धनलाभ होईल. व्यावसायिकांनी भविष्यातील लाभासाठी आजच गुंतवणूक करावी. वैवाहिक जीवनात अचानक वाद होतील. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी.
कन्या:- मित्रांबरोबर प्रवासासाठी खर्च होईल. पाळीव प्राण्यांची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी. बौद्धिक क्षमतेच्या जोरावर अचानक लाभ होईल. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या कुरबुरी होतील. सर्दी खोकल्याशी संबंधित आजार होतील.
तूळ:- स्वतःसाठी वेळ काढाल. संतातीबरोबर वादविवाद टाळा. महिलांनी व्यवसायात आजच गुंतवणूक करा. विध्यार्थ्यांना आज मेहनतीचा दिवस आहे. नोकरदार मंडळींना आज दिलासादायक बातमी समजेल. नाकाशी संबंधित आजार संभवतात.
धनु :- प्रवास लाभदायक ठरतील. वडील भावंडांशी मतभेद होतील. नोकरदार मंडळींना लाभदायक दिवस आहे. जोडीदाराशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. पोटाशी संबंधित आजार संभवतात.
मकर:- संततीशी आज वैचारिक मतभेद होतील. मातृतुल्य व्यक्तींशी आदरानं वागा. आज वरिष्ठांकडूनचनाक जास्त कामाची शक्यता आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. जोडीदारच्या आनंदासाठी खर्च होईल. सासुरवाडीकडून अचानक धनलाभ होईल.
कुंभ:- मनात योजलेले काम अचानक मार्गी लागेल. श्रीगुरुमाऊलींचे कृपाशीर्वाद लाभतील. गुंतवणीकीतून अचानक लाभ होईल. आईकडून धनलाभ होईल. नोकरदार मंडळींना आजचा दिवस आल्हाददायी ठरणार आहे. जुन्या आजारातून आराम पडेल.
मीन :- बरेच दिवस रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील.नातेसंबंधात मतभेदांची शक्यता आहे. मित्रपरिवारासाठी खर्च होईल. सरकारी नोकरांनी सांभाळून बोलावे. वैवाहिक जीवनात वादविवाद होण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता राखावी.
|| शुभं – भवतु ||