Read In
सोमवार 28 सप्टेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
अती धाडस नको, नाती सांभाळा, नावडते विषय टाळा, प्रेमाचा अतिरेक नको, प्रवासात धोका, टेलीपथीचा अनुभव घ्या.
आज उजाडता मकर रास असून सकाळी 09:40 नंतर कुंभ रास आहे. तसेच रविवार 27 सप्टेंबर रात्री 08:48 ला श्रवण नक्षत्र संपले असून आज रात्री 10:37 पर्यंत धनिष्ठा नक्षत्र आहे. या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 वेळेच्या कुंडली नुसार विचार करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आजचे नक्षत्र धनिष्ठा हे साहसी, अविचारी, मोठमोठ्या उलाढाली करणारे , पराक्रमी, कर्तबगार, कर्तृत्ववान आहे. याचा स्वामी मंगळ असून दुसरी दोन मंगळाची नक्षत्रे एक वृषभेत मृगशीर्ष व दुसरे तूळेत चित्रा असे आहे.तरी आजचे भविष्य लिहीता ना या दोन्ही राशी चा विचार करू लिहीले आहे तरी योग्य ती काळजी घ्यावी.
मेष:–आजचे नक्षत्र धनिष्ठा व त्याचा स्वामी मंगळ आहे. जो तुमचा राशीस्वामी पण मंगळ आहे. मोठ्या धाडसाने बेधडक कामाला सुरूवात कराल. तुम्हाला आज उगीचच अधिकार गाजवावा असे वाटेल. अती धाडसाची इच्छा होइल. तरी मनाला आवर घाला. संधीवाताच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी.
वृषभ :–वृषभ मृगशीर्ष नक्षत्रांच्या व्यक्तीना आज आपली सत्ता गाजवायला रान मोकळे आहे. कुटुंबात आज तुमचाच शब्द चालेल. टीन एजर्स आज तुमचे ऐकणार नाहीत मनमानी करतील तरी गप्प बसणे हेच शहाणपणाचे ठरेल. विरोधासाठी विरोध करतील.
मिथुन :–आज या नक्षत्राचा संबंध तुमच्या सासरकडील नात्याशी आहे. सासुरवाडीबरोबरील नाते संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना सांभाळून करावेत. वडिलांच्या तब्बेतीची चौकशी करावी.आज बोलताना तोल जाण्याचा संभव आहे तरी बोलताना अतिशय सावधपणाने बोलावे.
कर्क :–कुटुंबात एकमेकांबरोबरचे वातावरण आनंदी राखण्याचा प्रयत्न करा. वादाला सुरूवात होउ देउऊ नका. मुलीना सासरकडून व पुरूष मंडळीना सासुरवाडीकडून छानशी कांहीतरी गिफ्ट मिळेल. भाज्या कापण्यापासून ते भाजण्यापर्यंत काळजी घ्या. आवडीच्या वस्तूची खरेदी कराल.
सिंह :–व्यवसायात भागीदाराच्या विचारांना महत्व देऊन समजून घ्या. पती पत्नीमधील प्रेमाचा अतिरेक होईल. कुटुंबात नावडते व वादाचे विषय टाळा. लहान मुलांना पडण्या लागण्यापासून सांभाळा. नोकरीत ही आज समंजसपणाने वागावे लागेल.
कन्या :–आज तुमच्यावर श्री गणेशाचा वरदहस्त लाभेल. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्या वरील विश्वास व्यक्त करतील. तुमच्या वागण्यातील पारदर्शकपणा तुमची प्रतिष्ठा वाढवेल. आजोळ कडील नात्याची चौकशी करावी. गर्भवती महिलांनी आज विशेष काळजी घ्यावी.
तूळ :–आईबरोबरील संबंध ताणले जातील. वृद्ध आईला आपल्यामुळे त्रास होत नसल्याची खात्री करून घ्यावी. शेअर्समधील गुंतवणूक विलक्षण फायदा करेल. तरी या दिवसाचा फायदा घ्यावा. प्रेमाच्या व्यवहारात अचानक एकमेकांच्या मनात राग निर्माण होइल.
वृश्र्चिक :–कोणत्याही परिस्थितीत प्रवास करू नये. जवळच्या व्यक्तीविषयीची मनाला त्रास देणारी बातमी कळेल. माय लेकांमधील प्रेमाच्या ओढीत टेलीपथीचा अनुभव येईल. गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. पाळीव प्राण्याची काळजी घ्या.
धनु :–आज बाहेर जाताना, नोकरीला जाताना जास्त पैसे पाकीटात ठेवू नका. अचानक विचार न करता खर्च केले जातील. लहान भावंडाची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल नाहीतर गैरसमजाचे वातावरण निर्माण होईल.
मकर :–आज आपण अजिबात चिडायचे नाही अशी खूणगाठ मनाशी बांधा. ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता आहे. वडिलांकडून अचानक कांही लाभ होईल. व्यावसायिकांना एक जोडधंदा मिळेल.
कुंभ:–आजारी वा वृद्धांनी शांत रहावे. हाँस्पिटलमधील अँडमिट असलेल्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. तरू ण वयातील मुलींनी आज वेळेवर घरी जावे. अंधार पडल्यावर बाहेर जाउ नये. तुमचा शांत सोशिक स्वभावाचा अचानक उद्रेक होईल.
मीन :–आज कोणत्याही परिस्थितीत दुसर्याला जामीन राहू नका. व शेअर्स खरेदीचा व्यवहार करू नका. नुकसान संभवते. काका व आत्या यांचेबरोबरील गूढ प्रेमाचा, वात्सल्याचा अनुभव येईल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांच्या नातेवाईकांनी डाँक्टराचा सल्ला मानावा.
|| शुभं – भवतु ||
Thank you Tai
Tai, Aabhari Aahe