Read In
साप्ताहिक भविष्य
साप्ताहीक भविष्य रविवार 27 सप्टेंबर ते शनिवार 03 आँक्टोबर 2020
साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.
या सप्ताहात चंद्र, मकर, कुंभ, मीन, व मेष या राशीतून भ्रमण करणार आहे. रविवार मकर श्रवण. 20:05 प., सोमवार धनिष्ठा 22:38 पर्यंत , मंगळवार शततारका 24:48 पर्यंत, बुधवार पूर्वा भाद्रपदा 27:15 पर्यंत गुरूवार उत्तरा भाद्रपदा 29:57 पर्यंत, शुक्रवार रेवती अहोरात्र, शनिवार रे ती 08:51 पर्यंत व नंतर अश्र्विनी.
या सर्व नक्षत्रांच्या कालावधीचा अभ्यास करून व प्रत्येक दिवसाची पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
*** शनिवारच्या उत्तररात्री 00:28 मिनीटांनी सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करत आहे. हस्त नक्षत्र हे देवगणी असून ते शुभगुणांनी युक्त आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र, दैवत सूर्य व राशी स्वामी बुध आहे. हे नक्षत्र देवनक्षत्र असून लक्ष्मीदायक आहे. 10 आँक्टोबर च्या शनिवारी दुपारी 1:34 मिनीटापर्यंत आहे. या नक्षत्राचे पांचही तारे मोहक अतिशय सुरेख व पावसाच्या टपोऱ्या थेंबासारखे दिसतात. या नक्षत्रावर गजगौरीव्रतास प्रारंभ होत असून हादगा – भोंडल्याची सुरूवात होत आहे.
मेष :–27 रविवारी रोजी मनात विचारांचे काहूर माजून कोणत्याही बाबतीत निर्णयापर्यंत येणार नाही. तरी आज अती विचार करूच नका. 28, 29 हे दोन दिवस फारसे सकारात्मक नसल्याने सध्या कोणतीही चर्चा सुद्धा करू नये. चर्चेतून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मधुमेहीनी पोटभर आहार करावा चक्कर, भोवळ येण्याचा धोका आहे. 30 व 1 आँक्टोबरला मनुष्यगणी नक्षत्र असल्याने सारासार बुद्धीने विचार कराल व मनही शांत राहील.2 व 3 आँक्टोबरला बुद्धीचातुर्याची कामे कराल व आठवड्यातील कमी पडलेली कसर भरून काढाल.
वृषभ :–27 ला तुमच्या व्यवसायात वडिलांचा हस्तक्षेप राहील. त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगा. विद्यार्थ्यानी अभ्यासाव्यतिरिक्त इतर वाचनात लक्ष घालावे. 29, 30 ला अवघड विषयही सहजपणे समजेल. शिक्षक मंडळीना आँलाईन चर्चा, परिसंवाद यांत भाग घेता येणार आहे.. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचा हट्ट पुरवावा लागेल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सत्तेचा मोह आवरावा लागेल. कौटुंबिक वाद 1 व 2 रोजी व्यावहारिक चातुर्याने सोडवाल. नोकरीतील कामाचे नियोजन कराल तरच या सप्ताहातील कामांचा उरक होणार आहे.
मिथुन :–26 व 27 हे दोन दिवस एकमेकावर अवलंबून असतील. तरी 26 ला अशीच कामे करा किं जी 27 ला पूर्ण होतील किंवा मार्गी लागतील. 28 ला अचानक शिलकीत पडलेल्या कामाची आठवण होउन त्या कामाला लागाल. विवाहेच्छूंना आपल्याला अपेक्षित अशा जोडीदाराशी संपर्क होईल. 30 व 01 रोजी राहत्या घराचा प्रश्र्न सहजपणे सुटेल. लहान 10 वर्षाच्या आतील मुलांना 28 रोजी पडण्या लागण्यापासून सांभाळावे. सरकारी खात्यातील अधिकारी वर्ग कामाबाबत अचानक घुमजाव करेल. 1 व 2 कौटुंबिक आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे.
कर्क :–27 व 28 रोजी मनातील धाडसी वृत्तीच्या सुप्त भावना जागृत होतील. बँकींग क्षेत्रातील मंडळीना एखादे प्रशिक्षण करण्याची संधी मिळेल. लहान दुकानदारंना हा सप्ताह चांगला प्राप्तीचा जाईल. त्यांनी नवीन गुंतव़णूक करण्यास हरकत नाही. प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. महत्वाच्या सर्व कामांना सप्ताहाच्या शेवटी सुरूवात करा. 2 व 3 रोजी महत्वाच्या व उच्चपदावर असलेल्या व्यक्तीबरोबर संपर्क होऊन बोलण्याची संधी मिळेल. आजारी व वृद्ध मंडळींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होईल.
सिंह :–27 व 28 रोजी तुम्हाला तुमच्या महत्वाकांक्षेत वाढ झाल्याचे जाणवेल. 28 च्या रात्री 08:42 पर्यंत मोठ्या कामाची सुरूवात करा. डोंगराएवढे कामही या सप्ताहात पूर्ण कराल. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागण्यासाठी प्रथम वकीलांशी संपर्क साधा. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. नोकरी, व्यवसायातील स्वप्ने साकार होत असल्याची जाणीव होईल. अर्थप्राप्ती चांगली होऊन मनासारखा खर्च कराल. पतीपत्नीच्या नात्यात आनंदाला उधाण येईल. कलाकार, संगीतकार व गायक यांना कलेच्या नवीन प्रकाराचे सादरीकरण करता येणार आहे.
कन्या :–तुमच्या शांत व सहनशील स्वभावामुळे या सप्ताहात तुम्ही बाजी मारणार आहात. होम सायन्स शिकणार्या मुलीना त्यांची विषयाची निवड योग्य असल्याचे जाणवेल. हाँटेलींगचे शिक्षण घेतलेल्यांनी स्वतःचा उद्धोगधंदा करण्यास योग्य कालावधी आहे. वेळ वाया न घालवता त्याची आखणी करून प्रथम घरगुती पातळीवर सुरू करायला हरकत नाही. आवडत्या छंदासाठी वेळ काढता येणार आहे. नोकरीत बदल करू इच्छिणार्यांनी प्रथम आपली दिशा ठरवून मग प्रयत्न करावेत. 2 व 3 रोजी महत्वाची कामे स्वतः करा इतरांवर अवलंबून राहू नका.
तूळ :–26, 27 रोजी, सप्ताहाच्या सुरूवातीलाच तुम्हाला परोपकाराची संधी मिळणार आहे. तुमचे मनोबल वाढवणार्या घटना घडतील. 28 व 29 रोजी अनपोक्षित गाठीभेटी होउन पूर्वी कधीकाळी दिलेला शब्द पाळला जाइल. कलावंताना मानसन्मान मिळेल. प्रकृती स्वास्थ्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागेल. नोकरी व्यवसायात नवीन संधींची शक्यता वाढेल. व्यवसायाच्या प्रगतीसाठी कार्यतत्परता दाखवाल. मित्रमंडळीमधे एखादी पैज जिंकाल. घरगुती वातावरण आनंदी व प्रसन्न राहील. पत्नीकरीता चैनीची वस्तू खरेदी कराल.
वृश्र्चिक :–26 व 27 या दोन दिवसात तुम्हाला सर्वच व्यवहारात सावधानता बाळगावी लागेल. कुटुंबात मित्रमंडळींच्या बरोबरील व्यवहारात गैरसमज होणार नाहीत याची दखल घ्यावी लागेल. वडिलोपार्जित संपत्तीविषयी कांही चर्चा सुरू असल्यास उदार मनाने इतरांच्या मताला मान द्या. पती पत्नीमधे मतभेदाचे वारे वाहतील. 30 रोजी तुमच्या कार्याची व बुद्धीची प्रशंसा होउन कौतुक होईल.
धनु :–सप्ताहाच्या सुरूवातीलाच 27 व 28 रोजी लाभाच्या बडा धमाका चा अनुभव घ्याल. धनिष्ठा नक्षत्र जरी राक्षस गणी असले तरी तुम्ही तुमच्या बुद्धी चातुर्याने लोकांवर, समाजावर जबरदस्त छाप पाडाल. ज्या क्षेत्रातील कामे अपूर्ण आहेत त्यांना फक्त फोनवरून व शक्य तर सुरक्षित असल्यास संपर्क साधा. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. या सप्ताहात उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. तरी सावध रहा. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल.
मकर :–1 व 2 आँक्टोबर च्या तारखा म्हणजे या दिवशी तुम्ही तुमच्या कामातील अडथळा शर्यत पार कराल. नोकरी व्यवसायातील नवीन आव्हाने स्विकारून यशाकडे वाटचाल कराल. परदेशी असलेल्या कामाशी संबंध येईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशिर्वाद कामी येथील. नवीन काँन्ट्रक्टस् मिळण्याचे संकेत मिळतील. घसा व डोळे यांची तक्रार उद्भवेल. 28 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत रागावर, स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. पती पत्नीमधील वातावरण कांही प्रमाणात तणावपूर्वक राहील.
कुंभ :– राजकीय वर्तुळात वावरणार्यांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. 27 व & 28 रोजी आपल्या अधिकाराचा वापर करू नये. कोणत्याही कारणासाठी व कोणत्याही परिस्थीतीत पोलीस स्टेशनची पायरी चढू नका. नोकरीसंबंधीतील समस्या सुटत असल्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. जून्या , पडलेल्या घराच्या जवळपास या सप्ताहात जाऊ नका. घरातील सुख सुविधेसाठी मोठ्या खर्चाचा बोजा वाटेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास निष्फळ होईल.
मीन :–तुमच्या कामाच्या नियोजनातील बुद्धी चातुर्याने इतरांची मने जिंकला पण ऐनवेळी कृतीशील कामात गडबड होईल. कामाचा बोजा वाढल्याने स्वभावात चिडखोरपणा वाढेल. नवीन वाहन खरेदी कराल प ण या सप्ताहात घरी आणू नका. विद्यार्थी वर्गाने अभ्याचे नियोजन 27 व 28 रोजी करावे. नातेवाईकांकडून एखादी अप्रिय घटना कानावर येईल. जून्या गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देतील.
|| शुभं—भवतु ||