Read In
शनिवार 26 सप्टेंबर 2020 दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज अहोरात्र चंद्र रास मकर आहे. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र संध्याकाळी 19.24 पर्यंत व नंतर श्रवण आहे. या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व मकर राशीचा विचार करून, तसेच आजच्या सकाळच्या 5:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज संध्याकाळी 19.24 पर्यंत उत्तराषाढा हे मनुष्य गणी नक्षत्र आहे. हे नक्षत्र मनुष्यगणी असल्याने त्याचे मुख्य गुण संशोधक वृत्ती, कामसू, कुटुंबावर प्रेम करणारा, प्रामाणिक असे आहेत. उत्तराषाढा नक्षत्राचा स्वामी रवि आहे.
मेष:- प्रवासातून लाभ संभवतो. संतातीसाठी वेळ काढावा लागेल. शैक्षणिक क्षेत्रात यशाचे नवीन मार्ग सापडतील. स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाल आजच सुरवात करा भविष्यात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी आज आल्हाददायक वातवरण असेल. आध्यात्मिक क्षेत्रात श्रीगुरुमाऊलींचा आशीर्वाद लाभेल. मातृतुल्य व्यक्तींची काळजी घ्यावी.
वृषभ:- आज आपण आपल्या आवडीच्या गोष्टींचा आनंद घेऊ शकाल. गुंतवणूकीतून लाभ संभवतो. प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींनी आज काळजी घ्यावी. सरकारी अधिकाऱ्यांन आज सहकाऱ्यांशी संभाळून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात वादविवाद होतील. आज कोणाचेही एकाचेच बरोबर असा पावित्रा असेल. वडिलांकडील नातेवाईकांची चौकशी करावी.
मिथुन:- आज मनातील इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आहे. आजचा दिवस व्यवसायातील गुंतवणीकीसाठी लाभदायक आहे. विद्यार्थी वर्गाला आज अभ्यासात जास्त मेहनत घ्यावी लागेल. मित्रांबरोबर आजचा दिवस आनंदात घालवाल. आज जोडीदाराला वेळ द्याल. नोकरदार मंडळींना आज सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. ज्वराशी संबंधीत आजार उद्भवतील. प्रकृती जपा.
कर्क:- आज आपला दिवस सर्व दृष्टीने उत्तम आहे. आज आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील. महिला वर्गाने आज व्यवसायब संबंधीत आपल्या योजना प्रत्यक्षात आणाव्यात. विद्यार्थी वर्गाला आजचा दिवस उत्तम आहे. आज नोकरदार मंडळींना आनंदाचा दिवस आहे. आज जोडीदारासोबत वेळ घालवाल. जुने आजार पुनः डोके वर काढतील.
सिंह:- आज आपल्याला प्रवासाचा योग आहे. आज विध्यार्थी वर्गासाठी थोडा मेहनतीचा दिवस आहे. वडील भावंडाशी मतभेदांमुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस अचानक धनालाभाचा आहे. संततीचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस आनंददायक बातमी घेऊन येईल. जुन्या आजारांपासून आज आराम पडेल.
कन्या:- आज आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी मेहनत घ्यावी लागेल. भविष्यात लाभ मिळण्यासाठी आज गुंतवणूक करावी. आज सासूबाईंकडून अचानक धनलाभाची शक्यता आहे. आज बँकेचे व्यवहार मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी सांभाळून वागावे. जुने आजार पुन्हा उद्भवतील. तब्येतीची काळजी घ्या.
तूळ:- वडील भावंडाशी वैचारिक मतभेदांची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला आजचा दिवस आल्हाददायक असणार आहे. पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. विद्यार्थी वर्गाला आजचा दिवस मेहनतीचा असेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी मतभेद होतील. जुने शत्रू डोके वर काढण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.
वृश्चिक:- प्रवासाची शक्यता आहे. आज आपल्याला गुरुजनांकडून उपदेशाचे बोल ऐकावे लागतील. व्यवसायात लाभ होईल. महिलांनी व्यवसायाच्या अनेक संधींचा विचार करावा. जोडीदाराबरोबर मतभेद होतील.उष्णतेचे त्रास संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
धनु.:- आज भागीदारीतील गुंतवणीकीतून लाभ होणार आहे. आज आपल्या हातून अध्यात्मिक कामात हातभार लागेल. अधिकारी वर्गाने आपल्या अधिकारांचा वापर जपून करावा. वैवाहिक जीवनात अडचणी संभवतात. घशाचे विकार संभवतात. प्रकृती जपावी.
मकर:- वडिलधाऱ्या मंडळींकडून मार्गदर्शन मिळेल. गुंतवणीकीतून लाभ होईल. अध्यात्मिक प्रगतीचा मार्ग आईमुळे सापडेल. जुन्या मित्रा मंडळींशी संवाद साधला जाईल. आजचा दिवस आपल्या जोडीदाराबरोबर आनंदात घालवणार आहात. सरकारी कर्मचाऱ्यांना आजचा दिवस आल्हाददायक आहे. सासरच्या मंडळींशी संपर्क होईल.
कुंभ:- आज आपल्याला प्रवासाचा योग आहेत. व्यवसायासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. अध्यात्मिक क्षेत्रात गुरुमाऊलींकडून संकेत मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीचे नवीन मार्ग सापडतील. अचानक उधार दिलेले पैसे परत मिळतील. घशाचे व छातीचे आजार संभवतात काळजी घ्यावी.
मीन:- आज घरातल्या व्यक्तींसाठी वस्त्र खरेदी कराल. मैत्रीत आपल्यालाच खर्चासाठी पुढाकार घ्यावा लागेल. आज महिलांना व्यवसायात केलेल्या गुंतवणीकीतून भविष्यात लाभ होईल. मोठ्या भावंडाशी वैचारिक मतभेद होतील. आज जोडीदाराला वेळ द्याल.श्र्वसनाचे विकार संभवतात. काळजी घ्यावी.
|| शुभं भवतु ||
Dhanyawad Tai
Aabhari aahe Tai