Read In
शुक्रवार 25 सप्टेंबर 2020 चे राशी भविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
आज संपूर्ण दिवस चंद्र रास धनु दुपारी 24.40 पर्यंत नंतर मकर आहे. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र संध्याकाळी 18.30 पर्यंत व नंतर उत्तराषाढा आहे. या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व मकर राशीचा विचार करून, तसेच आजच्या सकाळच्या 5:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज संध्याकाळी 18.30 पर्यंत पूर्वाषाढा हे मनुष्य गणी नक्षत्र आहे. हे नक्षत्र मनुष्यगणी असल्याने त्याचे मुख्य गुण अतिशय सात्त्विक, उदार, सुसंस्कृत, प्रमाणिक व दयाळू पूर्वा शाढा नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे.
मेष:- प्रवासाचे योग्य संभवतात. संततीशी मतभेदांची शक्यता आहे. आजचा दिवस गुरुवर्यांकडून खडे बोल ऐकवणारा आहे. व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. महिलांनी व्यवसायचा विचार करावा. जोडीदाराबरोबर वादविवाद होतील. उष्णतेचे विकार होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.
वृषभ:- वडील भावंडांशी वैचारिक मतभेद होतील. नोकरदार मंडळींना आजचा दिवस चांगला आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. गुरुमाऊलींची कृपा लाभेल. मातृसुखात न्हाऊन निघाल.पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. जुने शत्रू डोके वर काढतील.
मिथुन:- वैवाहिक जीवनात मतभेद होतील. अभ्यासात बौद्धीक क्षमतेच्या जोरावर यश मिळवाल. नोकरदार माणसांनी आज सहकाऱ्यांशी बोलताना काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनात जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी.
कर्क:- मनात योजलेले कार्य मार्गी लावण्यास मेहनत घ्यावी लागेल. आज केलेल्या गुंतवणीकीतून भविष्यात लाभ होतील. सासुरवाडीकडून अचानक धनलाभाची शक्यता आहे. बरेच दिवस रेंगाळत असलेले बँकेचे व्यवहार आज मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात वाडविवादाचे शक्यता आहे. जुन्या दुखण्याचा त्रास संभवतो.
सिंह:- आज तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मनात योजलेल्या कामांना गती प्राप्त होईल. वाडीलधाऱ्यांशी मतभेद होतील. संतातीसाठी खर्च होईल. सहकाऱ्यांकडून सहकार्य लाभेल. जुन्या दुखण्यातून आराम पडेल.
कन्या:- आज मनात योजलेल्या कामांना गती मिळेल. गुंतवणूकीतून लाभ होणार आहे. शिक्षणात अवघड वाटणाऱ्या विषयात जास्त मेहनत घ्यावी लागेल. मित्रांबरोबर वेळ घालवाल. जोडीदाराला वेळ द्याल.आज नोकरदार मंडळींना दिवस चांगला. तापाशी संबंधित आजार उद्भवतील.
तूळ:- आपल्या आवडीसाठी आपला खर्च होईल. व्यवसायात केलेल्या गुंतवणीकीतून लाभ संभवतो. सरकारी अधिकाऱ्यांना आजचा दिवस त्रासदायक ठरेल. अडमिनिस्ट्रेशन क्षेत्रातील व्यक्तींना जुन्या शत्रूंचा त्रास संभवतो. वैवाहिक जीवनात मतभेद होतील. एकाचेच म्हणणे खरे ठरेल. वडिलांकडे नातेवाईकांशी संपर्क साधावा.
वृश्चिक:- प्रवास लाभदायक ठरेल. आज संतातीकडून आनंदाची बातमी समजेल. उच्च शिक्षणात यःसाचे मार्ग सापडतील. नोकरीसाठी परीक्षेचा विचार करत असाल तर आजच अभ्यासाला सुरवात करा. नोकरदार व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक आहे. अध्यात्मिक क्षेत्रात गुरुमाऊलींकडून संकेत मिळतील. आईची काळजी घ्यावी.
धनु:- वस्त्र खरेदी करण्याची संभावना आहे. मैत्रीत पैसे खर्च होतील. आज महिलांना व्यवसायात केलेल्या गुंतवणीकीतून लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. वडीलभावंडांशी वैचारिक मतभेद होतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर वेळ घालवाल. घशाचे आजार संभवतात काळजी घ्यावी.
मकर:- प्रवास करावा लागेल. व्यवसायात केलेल्या गुंतवणीकीतून लाभ होईल. संतातीसौख्य लाभेल. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीचे नवीन मार्ग सापडतील. उसने दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात थोड्याशा कुरबुरी होतील. पत्ताशयाशी संबधित आजार संभवतात. काळजी घ्यावी.
कुंभ:- जुन्या मित्रांशी संपर्क होईल शैक्षणिक प्रगतीत आईचा हातभार लागेल. वडिलधाऱ्या व्यक्तींकडून उपदेश मिळतील.गुंतवणीकीतून लाभ होईल. जोडीदारासोबत वेळ आनंदात घालवाल. सरकारी कर्मचाऱ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. सासुरवाडीकडील वडिलधाऱ्या नातेवाईकांशी संपर्क होईल.
मीन:- आज भागीदारकडून केलेल्या गुंतवणीकीतून लाभ संभवतो. अध्यात्मिक कार्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर सांभाळून करावा. वैवाहिक जीवनात मतभेदांची शक्यता आहे. श्वासनसंस्थेचे आजार संभवतात. काळजी घ्यावी.
|| शुभं भवतु ||