Read In
गुरूवार 24 सप्टेंबर 2020 दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्र रास धनु असून चंद्र नक्षत्र मूळ 18:18 पर्यंत आहे. नंतर पूर्वाषाढा आहे. मूळ नक्षत्र हे राक्षसगणी आहे. पण हे नक्षत्र अत्यंत सत्वगुणी, महापराक्रमी व अतिशय कर्तृत्ववान आहे. शुभकार्याला अनुकूल आहे.
मेष:–आज धर्म, परंपरा या विषयीच्या विचारांच्या। आलेल्या उधाणाला उत्तर देण्यातच बिझी रहाल. लोकांसमोर आदर्श निर्माण कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येणार आहेत तरी काय काय करावे याचे नियोजन आवश्यक आहे.
वृषभ :–तुमच्याच राशीत प्रवेश केलेला केतु तुम्हाला अंतर्बाह्य बदलवणार आहे. व्यवसायाच्या निमित्ताने एखाद्या सच्च्या दिलाच्या व्यक्तीबरोबर संपर्क होऊन बोलण्याची संधी मिळेल. उच्च विचाराने भारावून जाल.
मिथुन :–तब्बेतीची कांही प्रमाणात कुरबूर होईल. लहानसा प्रवास घडेल पण त्यातही आनंदाचे व सुखाचे क्षण मिळतील. विवाहित मुलींना माहेरच्या घराला आधार द्यावा लागेल. बदलत्या जीवनशैलीला जुळवून घ्या नाहीतर मानसिक त्रास होईल.
कर्क :–नवीन घरासाठी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. राजकीय मंडळी आपल्या अपेक्षे प्रमाणे सामाजाकडू. दाद मिळवण्यात यशस्वी होतील. आज शेअर्समधील गुंतवणूक विशेष लाभ देणार नाही. झोपेच्या आहारी जाल.
सिंह :–सुख व समाधान यात न्हाऊन निघाल. आज तुम्ही म्हणाल तेच होणार आहे तरी मनातील इच्छा व्यक्त करा. आज प्रवास करू नये. लहान मुलांना आगीपासून सांभाळा. दुसर्यांवर अधिकार गाजवल्याचे परिणामांची जाणीव होईल.
कन्या :–हुषारीने वागल्यावर अडचणींतून कसे बाहेर पडता येथे याचे चालते बोलते उदाहरण घालून द्याल. बँकेच्या कामात दिरंगाई करू नका. सामाजिकदृष्टय़ा तुम्ही व्यक्त केलेले विचार वेगळ्याच अर्थावर वादळ उठवतील.
तूळ :– ज्यांना पित्ताशयाचे कोणतेही दुखणे आहे त्यांनी काळजी घ्यावी.तुमच्याकडून दुसर्याच्या प्रामाणिक प्रयत्नांची खिल्ली उडवली जाईल ज्योतिषी, पुरोहित, पुजारी, भिक्षुक यांना अचंबित करणारा सुखदायक अनुभव येईल.
वृश्र्चिक :–“मौनम् सर्वार्थ साधनम्” हे प्रत्येक क्षणी लक्षात ठेवा. राजकीय मंडळीनी, विशेषतः महिलांनी कोणत्याच विषयात आज व्यक्त होऊ नये. पैशांचा अपव्यय होत नाही ना याकडे लक्ष द्या.
धनु :–सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सत्तेचा मोह आवरता येणार. पतसंस्थेच्या व्यवहारात गुंतून पडाल. आज अंगात आळस संचारणार आहे. आज तुम्हाला अगदी मोलाचे मार्गदर्शन करणारी गुरूतुल्य व्यक्तीची भेट होईल.
मकर :–नियमांचा काटेकोर उपयोग करू नका. आज महत्वाच्या गाठीभेटी वर भर द्या.बँकेकडून कर्ज प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावण्यात येईल. कोर्टाच्या कामात वेळ वाया जाईल . नोकरीतील कामाचा आवाका आवरणार नाही.
कुंभ :–अतिशय सदाचारी व सन्माननीय अशी तुमची इमेज लोकांकडून गौरवली जाईल. कलाकार मंडळींचे समाजाकडून कौतूक होईल. गणिताच्या अभ्यासकांना वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
मीन :–कुटुंबातील व्यक्तीला एखादी शस्त्रक्रिया करण्यासाठी मदतीचा हात द्यावा लागेल. कमरेचे व पायाचे दुखण्यात वाढ होत असल्याचे जाणवेल. पक्षप्रमुख, पुढारी यांनी लगेच रिअँक्ट होण्याचे टाळावे. विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी कळेल.
|| शुभं– भवतु ||
Chhan margadarshan
Dhanyawad Tai