Read In
बुधवार 23 सप्टेंबरचे दैनिक राशी भविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
आज संपूर्ण दिवस चंद्र रास वृश्र्चिक 18:24 पर्यंत असून नंतर धनु रास आहे. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा संध्याकाळी 18:24 पर्यंत व नंतर मूळ आहे. या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व वृश्र्चिक राशीचा विचार करून, तसेच आजच्या सकाळच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–कुटुंबात आनंदी आनंद साजरा होईल. व्यावसायिक खरेदी कराल. आर्थिक बाबतीत नियोजनाची गरज भासेल. गुंतवणूकीचा आज विचारही करू नका. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. व्यावसायिक जुने येणे मिळण्याचे मार्ग सुकर होतील.
वृषभ :–स्वकर्तृत्वाने अडचणीमधून योग्य मार्ग काढाल. आज कोणासही जामीन राहू नये किंवा कोणाची जबाबदारी घेऊ नये. नातेवाईकांना तुमच्याकडून मदतीची अपेक्षा वाढेल तरी मनाची तयारी ठेवावी. विवाह विषयीचे बोलणे आज पक्के करू नका, कोणताच निर्णय घेऊ नका.
मिथुन :–आज तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सरकारी नोकरदारांना बदली काम, बदलीचे ठीकाण याबाबतची चिंता वाढेल. तुमच्या बुद्धी कौशल्याने अवघड प्रश्र्नातून सुटाल. आत्मविश्वासात वाढ होईल.
कर्क :–जे विद्यार्थी परदेशी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न कर आहेत त्यांनी संपूर्ण अँकँडेमिक वर्ष कसे आहे हे तज्ञ ज्योतिषांकडून जाणून घ्यावे. कुटुंबात पत्नीबरोबर मतभेद होण्याच्या दाट शक्यता आहेत. सध्याची नोकरी सोडून नवी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
सिंह :–व्यवसायात नवीन ओळखी होतील. वडिलोपार्जित संपत्तीबाबत कांही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठण्यासाठी कामात अडथळा निर्माण होण्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल.
कन्या :–नोकरीत वरिष्ठांबरोबरचे संबंध वृद्धींगत होतील. बुद्धी चातुर्याने इतरांची मने जिंकाल . संशोधन क्षेत्रातील मान्यवरांची मानसिक गोंधळलेली परिस्थिती निर्माण होईल. कुटुंबातही कांही प्रमाणात एकवाक्यता राहणार नाही.
तुळ :–व्यवसायात किंवा मार्केटमध्ये कोठेही गुंतवणूक करू नका. आज खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक आहे. हाँटेल, खाण्याच्या पदार्थांचे उद्धोग चांगले चालतील. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. लांबच्या नातेवाईकांची चौकशी करा.
वृश्र्चिक :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना विरोधक त्रास देतील. व्यवसायिक नवीन संधी उपलब्ध होतील. नात्यातील वाद मिटण्याचे व मिटविण्याचे संकेत मिळतील. नोकरीतील बदल त्रासदायक राहील. शिक्षक मंडळीना आजचा दिवस त्रासदायक राहणारा आहे.
धनु :–शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या जबाबदारी वाढ होईल. सरकारी अधिकार्यां बरोबर जुळवून घ्यावे लागेल. कुटुंबातील तरूण वर्गाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडेल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. घाई करू नका.
मकर:–कुटुंबातील व्यक्तींच्या इच्छा अपेक्षांना प्राधान्य द्या. इलेक्ट्राँनिक्सच्या क्षेत्रातील मंडळीना कामाचा बोजा वाढेल. मित्रमंडळींचे चांगले सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नवीन नोकरीच्या मागे लागू नका.
कुंभ:–आज सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय वा नोकरी असो अचानक एखाद्याचा विरोध सहन करावा लागेल. व्यवसायात पूर्वी केलेले बदल आज उपयुक्त ठरतील. खोट्या आत्मविश्वासात राहू नका. कुटुंबातील मतभेद मिटतील.
मीन :–नोकरी वा व्यवसायात एकापाठोपाठ एक शुभ घटना घडू लागतील. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात घाई करू नका व वशिल्याचा विचार सोडून द्या. कुटुंबात एखादा धार्मिक सण समारंभ होईल. पती पत्नी पैकी कोणा एकास जुन्या दुखण्याचा त्रास होईल.
|| शुभं – भवतु ||
Aabhari aahe Tai,bhavishya accurate aste
Thank you Tai