Read In
मंगळवार २२ सप्टेंबर २०२० चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्र नक्षत्र अनुराधा १९:१७ पर्यत व नंतर ज्येष्ठा. चंद्र रास वृश्र्चिक आहे. नक्षत्र अनुराधा, ज्येष्ठा व रास वृश्र्चिक यांचा अभ्यास करून, आजच्या पहाटेच्या ५:३० च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष:– लहान मुलांची चंचलता वाढेल. प्रयत्नांती परमेश्वर हे सिद्ध करून दाखवाल. आर्थिक ओघ वाढणार आहे. तरूण वर्गास नोकरीत नवीन दिशा सापडेल. मैत्रीच्या संबंधातून मानसिक त्रास निर्माण होईल. प्रगतीचा वेग आज चांगलाच वाढणार आहे.
वृषभ :–आजची सकाळ काही प्रमाणात मरगळ, आळस घेऊन येईल. आई व बहिणींची महत्वाच्या कामात चांगली साथ मिळण्याचे आश्वासन मिळेल. तरूणाना आपला भाग्योदयाचे मार्ग सापडतील. कलाकारांना अचानक चांगली संधी मिळेल.
मिथुन :–आज आईवडिलांच्या चिंता वाढणार आहेत. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होईल. किंवा अचानक बदली संभवते. आज भविष्यासाठी गुंतवणूकीचा विचार करा. वाहनावर अचानक खर्च निघेल. महिलांशी जुळवून घ्यावे लागेल.
कर्क :–नोकरीत कामात उत्साह वाढेल आणि नेमके दुसर्याच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल. आँफीसमधील कामासाठी कोर्टात जावे लागेल. सरकारी गुंतागुंतीचे काम सहजगत्या पूर्ण होईल.
सिंह :–महत्वाच्या कामात सहकार्यांची चांगली साथ मिळेल. विवाह, नोकरी हे प्रश्न जराही वेग घेणार नाहीत तरी चिडचीड करू नये. व्यवसायात भागीदाराच्या मताचा आदर करावा लागेल. पटले नाही तरी सध्या व्यक्त होऊ नका.
कन्या :–विद्यार्थी वर्ग आपल्या बुद्धीची चुणूक दाखवतील. आज अवघड विषय ही सोपा वाटेल. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी नवीन संकल्प केल्यास यशाकडे वाटचाल होईल. इतरांचा सल्ला घ्या पण मनाचा कौल घ्या.
तूळ :–वृद्धांना उष्णतेचा त्रास जाणवेल. तरूणांची व लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आज तुम्ही जिथे झाल तिथे तुमचा प्रभाव पडणार आहे. अनपेक्षितपणे चैनीवर पैसे खर्च केले जातील.
वृश्र्चिक :–अचानक मनात खूप काही साठले आहे याची जाणीव होईल. एखादी मिटींग होईल व त्यातील प्रश्र्न तुम्ही लावून धराल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आईवडिलांची चिंता वाढवणारा दिवस आहे. तरी विशेष लक्ष द्या.
धनु:–व्यावसायिक मोठे करार करण्यात बिझी राहतील. जून्या लोखंडाच्या गुंतवणूकीतून चांगला लाभ संभवतो. आज आर्थिक व्यवहार करू नका. बँकेकडून कर्ज पास होत असल्याचे संकेत मिळतील .
मकर:–स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यानी अभ्यासाचे योग्य नियोजन करावे. कोणतीही कामे रेंगाळत ठेवू नयेत. अध्यात्मिक अभ्यासा विषयी उत्सुकता वाढेल. मित्र मैत्रिणीकडून महत्वाच्या विषयावर टीप्स मिळतील.
कुंभ :–इतरांना आज तुमचे वागणे गूढ वाटेल. जूना दुरावा, जूने वाद संपवण्यास योग्य वेळ आलेली आहे तरी स्वतःहून पुढे सरका . वडिलांकडील नात्यास मदतीची गरज लागेल. गायकांना नवीन संधी मिळेल.
मीन :–एखादे आर्थिक संकट गेल्याचे जाणवेल. कुटुंबात मंगलकार्याची बोलणी होतील. व्यवसायात भागिदारीचे प्रश्र्न सहजपणे सुटतील. व्यवसायिक वसुलीसाठी प्रयत्न करावे लागतील तेव्हा दहा टक्के वसुली होईल.
|| शुभं-भवतु ||