Read In
सोमवार 21 सप्टेंबर 2020 चे राशी भविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
आज संपूर्ण दिवस चंद्र रास तूळ दुपारी 15.16 पर्यंत नंतर वृश्चिक आहे. चंद्र नक्षत्र विशाखा संध्याकाळी 20:48 पर्यंत व नंतर अनुराधा आहे. या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व वृश्र्चिक राशीचा विचार करून, तसेच आजच्या सकाळच्या 5:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज संध्याकाळी 20.48 पर्यंत विशाखा हे राक्षसगणी नक्षत्र आहे. हे नक्षत्र राक्षसगणी असल्याने त्याचा मुख्य गुण माझे ते माझे आणि तुझे तेही माझे असल्याने कोणालाही मदत करताना विचार करावा. विशाखा नक्षत्राचा स्वामी गुरू आहे. गुरू हा बुद्धीचा, आदर्शवादाचा ग्रह आहे.
मेष – जोडीदाराबरोबर वादविवादाची शक्यता आहे. बरेच दिवस रेंगाळलेली न्यायालयात अडकलेली जमिनीची कामे मार्गी लागतील. सरकारी नोकरीत स्वतःचे अधिकार सांभाळून वापरावे.वडील भावंडास डोकेदुखीचा त्रास सांभावतो.
वृषभ – संततीला आज बुद्धी च्या जोरावर शिक्षणात यश मिळेल. स्पर्धात्मक परीक्षेच्या जोरावर नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. महिलांनी व्यवसायाचा विचार करण्यास दिवस चांगला आहे. दुसऱ्या संततीच्या विचारात असाल तर आनंदाची बातमी मिळेल. पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे.
मिथुन– आज गुंतवणुकीतून धनलाभ होईल. धार्मिक विधींसाठी पैसा खर्च करावा लागेल. उचचपदावर बदली होण्याचे संकेत मिळत आहेत. जोडीदाबरोबरचे वाडविवादाचे प्रसंग टाळा. जुने कंबरेचे दुखणे पुन्हा त्रास देण्याचे शक्यता आहे. काळजी घ्यावी.
कर्क– वैवाहीक जीवनात वाद होतील. वाहनसौख्य लाभेल. अचानक वडील, आजोबा यांकडुन धनलाभ होईल. संतती बरोबर मतभेदांची शक्यता आहे. वडिलांकडील नातेवाइकांबरोबर संवाद साधावा.
कन्या– आज आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आहे. आजची गुंतवणूक भविष्यकाळात लाभदायक ठरेल.आज वैवाहिक जीवनात आनंदाचा दिवस आहे. आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवल.वडिलांना घशाचा त्रास संभवतो. गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी.
सिंह– आज तुमच्या बुद्धीला चालना मिळणाऱ्या घटना घडतील. गुंतवणूकीतून फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अवघड वाटणाऱ्या विषयासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. विवाह इच्छित असणाऱ्यांनी प्रयत्न करावा. सासुरवाडीकडील वडिलधाऱ्या मानसंकडून काळजी करणारी बातमी समजेल.
तूळ– नातेसंबंधात जोडीदाराची समजूत काढावी लागेल. आज गुंतवणूक करण्याच्या आधी विचार करा. कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत. इंजिनिअरिंग, बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज जोडीदारासोबत मतभेदांची शक्यता आहे. वात प्रकृतीचे विकार डोके वर काढतील.
वृश्चिक– आज गुंतवणीकीतून लाभ संभवतो. उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. आज नोकरीत आपल्याला अनुकूल परिस्थिती असेल. वडीलधाऱ्यांकडून खडे बोल ऐकण्याची वेळ येईल. आईकडील नातेवाइकांची काळजी घ्यावी लागेल.
धनु– आज आपण मनात योजलेले काम पूर्णत्वास नेण्यास हरकत नाही. वडील भावाशी मतभेदाची शक्यता आहे. आज संतती कडून मानसिक त्रास संभवतो. वाहन चालवताना काळजी घ्यावी. व्यवसायात नवीन गुंतवणुकीतून लाभ होईल. वैवाहिक जीवनात मतभेद होतील. पचनसंस्थेशी संबंधित आजार उद्भवतील. काळजी घ्या.
मकर– जुन्या आजरपणासाठी अडकलेली डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळेल. आज व्यवसायात किंवा कोठेही गुंतवणूक करू नका. आज संततीशी शिक्षणाशी संबंध8त वादविवाद होतील. नोकरदार व्यक्तींना आज सहकार्यांकडून मदत मिळेल. तापाशी संबधित आजरपण उद्भवेल.
कुंभ– जी कामे रेंगाळली आहेत त्यांना मार्गी करण्याकरता पुन्हा सुरुवात कराल. संततीकडून अपेक्षापूर्ती होईल. धार्मिक कार्यांसाठी खर्च होईल.मानसिक शांतता लाभेल. स्वरयंत्राचा वक्फ असलेल्यांना आज आराम पडेल. वैवाहिक जीवनात आज एकाचेच म्हणाने ऐकावे लागेल. जुने आजारपण डोके वर काढेल.
मीन– आज आपल्यावर गुरुकृपेचा वर्षाव होणार आहे. संतती आभासाच्या जोरावर प्रगती करेल. कौंटूंबिक सुखासाठी पैसे खर्च होतील. खूप दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घ्यावी लागेल. जोडीदारकरता वेळ काढावा लागेल.
|| शुभं – भवतु ||
Thank you Tai
Aabhari aahe Tai
Thank you…