weekly-horoscope-2020

साप्ताहीक भविष्य रविवार 20 सप्टेंबर 2020 ते शनिवार 26 सप्टेंबर 2020

Read In

 

साप्ताहिक भविष्य

साप्ताहीक भविष्य रविवार 20 सप्टेंबर 2020 ते शनिवार 26 सप्टेंबर 2020

साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.

weekly-horoscope-2020

या सप्ताहात तूळ वृश्र्चिक, धनु व मकर या राशीतून  चंद्र भ्रमण करणार आहे. 20 सप्टें. स्वाती 22:52 पर्यंत, 21 सप्टें विशाखा 2020:49 पर्यंत, 22 अनुराधा 19:18 पर्यंत, 23 जेष्ठा1818:25 पर्यंत, 24 मूळ 18:08 पर्यंत, 25 पूर्वाषाढा 1818:31 पर्यंत, 26 उत्तराषाढा 19:24 पर्यंत.

या सर्व नक्षत्रांच्या रोजच्या कालावधीचा अभ्यास करून व रोजच्या सकाळच्या 5:30 च्या कुंडलीच्या मदतीने कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

दैवी  शक्तीचा अनुभव,  कष्टाचा भरघोस मोबदला, शत्रूंच्या छुप्या कारवायांचा सुगावा , हरवलेल्या वस्तूचा लाभ, स्त्रीहट्ट व बालहट्ट

मेष:–नोकरीच्या प्रतिक्षेतील मंडळीना आता फार वेळ वाट बघावी लागणार नाही. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. २० व २१ लाअध्यात्मिक क्षेत्रात चांगली प्रगती झाल्याचे जाणवेल.  घर घेण्याचे विचार सध्या पुढे ढकला. नातेवाईकांसाठी २२ ला धावपळ करावी लागेल. २३ ला आँफीसमधील घटनांवर प्रतिक्रीया देऊ नयेत २४, २५ ला श्री दत्तसंप्रदायाच्या  ऊपासकांना त्यांच्या शक्तीचा अनुभव येईल. १९ चा रवीचा उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील प्रवेश सरकारी क्षेत्रातून मंजूरी , मानसन्मान व चांगली प्रसिद्धी यांसाठी लाभदायक राहील. १९ ते २६ हा कालावधी तुम्हाला अविस्मरणीय राहील.

 

वृषभ:–उच्चशिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणार्यांनी आपल्याच देशात शिक्षण घेण्याचे नवीन पर्याय शोधावेत. तुमच्याच राशीत कालपासून राहूने प्रवेश केल्यामुळे आगामी दीड वर्षात काय काय करायचे, कसे लाभ मिळवून घ्यायचे याचे तज्ञ ज्योतिषांकडून मार्गदर्शन घ्या. २०, २१ क्रिमिनल साईडच्या वकील मंडळीना लाभदायक राहील.२२, २३ ला समोरील पार्टीच्या छुप्या कारवायांची जाणीव होईल. २४, २५ ला करत असलेले कामात प्रगती होऊनही ते  पुनः पुनः बँक फुटवर येत असल्याचे जाणवेल. २६ ला संतती कडून आनंद, सुख समाधान देणार्‍या घटना घडतील.

 

मिथुन:– सप्ताहाची सुरूवात एखाद्या अनोख्या धाडसाने होणार आहे. 20, 21  ला राजकीय क्षेत्रातील मंडळीनी नको  ते धाडस करायचा प्रयत्न करू नये. अपत्यप्राप्तीच्या जोडप्यांना22, 23 मध्ये गोड बातमी कळेल. ज्यांचे प्रयत्न असफल झाले आहेत त्यांनी आय. व्ही. एफ साठी हा महिना थांबावे. घाई करू नका. 24 ला अतिशय प्रतिष्ठेचे मानले गेलेले काम तुमच्या नावांवर जमा होईल. शिक्षकांना  त्यांच्या अडचणींवर 25 रोजी उपाय सापडल्यामूळे काम करणे सोपे जाईल.

 

कर्क :–हा सप्ताह महिला व्यावसायिकांसाठी अतिशय लाभदायक आहे. फँशनेबल कपडे, दागिने व चैनीच्या गोष्टींची मागणी वाढेल. हे दीड वर्ष राहू तुमच्या लाभ स्थानात राहणार आहे. त्यामूळे तुमच्या प्रत्येक कष्टाचा मोबदला मिळणार आहे. 20, 21  या दोन दिवसात तुमचे योग्य नियोजन झाल्यास लगेचच 22,, 23 ला काय घडते याचा अंदाज येईल. 24, 25 ला मार्केटमधील पत वाढल्याचे जाणवेल. 26 ला हस्त नक्षत्रात प्रवेश करणारा रवी , बुध रवी चंद्राचा चांगला परिणाम  देईल.

 

सिंह :– आज विलासी व, चैनी वृत्तीत वाढ होईल. सर्वच कामे वेळेवर होणार नाहीत  तरीही कामाचे  महत्व कमी होणार नाही. 21 च्या दुपारपर्यंत चैन कराल. 22, 23 वडिलांकडील नात्याकडून मानसिक क्लेश देणारी घटना कळेल.  धार्मिक काम करणार्यांना  24 25  रोजी कामाचे समाधान तर मिळेलच  व तसेच आपल्या स्पर्धेत कोणीही नाही याची जाणीव होईल. 25 च्या संध्याकाळी पती-पत्नीत किरकोळ गोष्टीवरून वाद होईल  वादाचे रूपांतर शेवटी कामाच्या नियोजनात होईल.

 

कन्या :–पोट दुखण्याचा किरकोळ त्रास असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. कुटुंबातल्या वडीलधार्यांबरोबरील चर्चेतून कुलवृत्तांत कळेल. 21 च्या दुपारनंतर अनपेक्षितपणे लाभ होईल. अध्यात्मिक अभ्यासाची ओढ असणार्‍यांना श्री गुरूमाऊलीकडून  आशिर्वाद मिळेल व सध्याच्या अडचणींवर उपाय सापडेल. 22,23 ला वडील बंधूंच्या प्रकृतीची काळजी वाढेल. 24 च्या संध्याकाळपर्यंत फार पूर्वीच हरवलेली वस्तू सापडेल. पती- पत्नीमधील अबोला  २५ नंतर राहणार नाही,  तरी आता ताणू नये. वडिल व मुलगा दोघांनीही शांतपणा अवलंबावा.

 

तूळ :–आज व उद्या दुपारपर्यंत  चंद्र तुमच्याच राशीत आहे व नक्षत्रही स्वाती आहे. बघा आता कसा फायदा घेता ते. २२ च्या दुपारी ३ वाजून ८ मिनीटांनी  नंतर बुधही तुमच्याच राशीत येतोय. सध्या तुम्हाला जो प्रश्न सतावतोय त्याचे उत्तर तुम्हालाच सापडेल. इतरांचा फक्त सल्ला घ्या पण जे तुम्हाला वाटतय तेच करा. 22 तारखेचा बुध प्रवेश बुद्धीची चुणूक दाखवेल. 23 तारखेला महत्वाची कामेकरू नयेत.  २४ व २५ दोन्ही दिवस शुभ आहेत तरीही २५ रोजी आर्थिक व्यवहार करू नयेत. शुक्रवारी नोकरी  निमित्ताने अचानक प्रवास करावा लागेल. २६ रोजी दुसर्यांच्या बोलण्याला फसून, भावनेत अडकू नका.

 

वृश्र्चिक :–20 तारखेऐवजी लक्ष सगळे २१  तारखेकडे ठेवा. नोकरीच्या प्रतिक्षेतील  तरूणांना मनासारखी नोकरी मिळण्याचे  संकेत आहेत. मिळत असलेल्या नोकरीतील पाँझिटीव्ह गोष्टींवर जास्त लक्ष ठेवा. राजकीय व्यक्तींना गुप्तशत्रूं दोन पावले मागे गेल्याचे जाणवेल. पण लगेच हूरळून जाऊ नका. २३ व २४ यंत्रावर काम करणार्‍यांनी  विशेष काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनात आनंदाची बरसात होईल. मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. या सप्ताहात कोणतेही नवीन अँग्रीमेंट करू नका. भाडेकरूंना राहण्याची मुदत वाढवून मिळेल. कलाकार मंडळीना आपल्या कलेचे सादरीकरण करता येणार आहे.

 

धनु :–हा सप्ताह कांहीसा मध्यम स्वरूपाचा जाणार आहे. २० व २१ रोजी. कौटुंबिक स्तरावर कोणत्याही चर्चेतून वादाचे प्रसंग निर्माण होतील. आपल्याला नक्की काय सांगायचे आहे याचा गोंधळ उडेल व गैरसमज वाढतील. महिलांना  हार्मोनल चेंजेसचा  त्रास होईल व चिडचीड वाढेल. २३, २४ रोजी लहान मुलांना एखाद्या  दुखापतीपासून जपावे लागेल. तरूणींनी आपल्या आर्थिक व्यवहारात गैरसमज निर्माण होऊ देऊ नयेत. जून्या आर्थिक विषयातून  नाममात्र लाभ होईल. २५ वडीधार्या व्यक्तीकडून कानउघाडणी होईल. राजकीय व्यक्तीनी शांत  व समाजापासून  लांब राहण्याचा प्रयत्न करावा.

 

मकर :–विवाहेच्छू मंडळींचे  विवाह परिचयातून  जुळतील. पूर्ण माहिती घेऊनच मग आपले मत पक्के करा. कुटुंबात  वडील  व भाऊ यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीच्या प्रतिक्षेतील तरूणांना नोकरीपेक्षा व्यवसायाचा मार्ग चांगला वाटेल. परंतू तुम्ही कष्टाळू व मेहनती असलात तरी  व्यवसायाचा विचार पक्का करू नका. आगामी वर्षातील  ग्रहस्थितीवरून आर्थिक परिस्थिती समजून मगच निर्णय घ्या. . मकर राशीत उत्तराषाढा रविचे नक्षत्र, श्रवण चंद्राचे नक्षत्र, व धनिष्ठा मंगळाचे ही तीन नक्षत्रे येतात. हे तीनही ग्रह आपल्याला विशेष  मदतीचा हात देणार नाहीत. व्यावसायिकांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतेही मोठे पाऊल उचलू नये.

 

कुंभ :–कुटुंबात संतती कडून आनंदाची बातमी मिळेल. व्यवसायिक पतप्रतिष्ठेत वाढ झाल्याचे जाणवेल. २२, २३ ला अचानक खर्च वाढेल व त्याचा अंदाजच येणार नाही. अचानक खाण्यापिण्यावर खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केल्यास करिअरची वाटचाल सोपी जाईल. स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्‍यांनी जराही टेन्शन न घेता सराव सुरू ठेवावा. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. सरकारी धोरणांचा परिणाम व्यवसायावर होणार आहे व अडचणी वाढतील. ओळखीतून ठरणारंया विवाहात घाई करू नका.

 

मीन :–२०, २१ ला कौटुंबिक अडचणींवर चर्चेने मात कराल.२२ रोजी नोकरीच्या ठिकाणी जागरूक रहावे लागेल. सहकारी वर्गाकडून त्रास होईल. २३, २४ , २५ ला श्री दत्तसंप्रदायाच्या ऊपासकांना महाराजांच्या कृपेचा अनुभव येईल. सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा वाढत असल्याचे जाणवेल. पित्ताचा त्रास असणार्‍यांनी दुर्लक्ष करू नये. तरूण मुलींना मानसिक अस्वस्थता वाटेल. बँकेचे व्यवहार दुसर्‍याच्या ताब्यात देऊ नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण निर्माण होईल. संततीच्या हट्टासाठी मोठी खरेदी करावी लागेल. बालहट्टाबरोबर स्त्रीहट्ट ही पुरावावा लागेल.

||     शुभं-भवतु.     ||

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *