Read In
शनिवार 19 सप्टेंबर चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
आज चंद्र रास कन्या 14:42 पर्यंत आहे वनंतर तूळ रास आहे. चंद्र नक्षत्र चित्रा आहे. राहू आज रात्री 20:18 मिनीटांनी वृषभेत प्रवेश करत आहे. राहूची नक्षत्रे असलेल्यांनी राहूच्या शुभ बाबींचा फायदा घेण्यासाठी सज्ज व्हावे.आजचा दिवस अशुभ असल्याने महत्वाचे व्यवहार करू नयेत.
मेष :– बुद्धीच्या जोरावर कामातील अडथळे दूर करालच पण त्याचबरोबर नोकरीत तुमच्या हुशारीविषयी चर्चा सुरू होईल. सरकारी कामातून फायदाच फायदा होईल, पैसे येथील. नवीन काँन्ट्रक्टस् मिळण्याचे संकेत मिळतील.
वृषभ :–आज तुमच्या राशीत येणारा राहू नवीन व्यवसायाची दिशा दाखवणार आहे. ज्यांचे मृगशीर्ष नक्षत्र आहे त्यांनी मात्र आज उड्या मारू नयेत. मुलांकडून अचानक आनंदाची बातमी मिळेल व तुमची काँलर ताठ होईल.
मिथुन :–लहान भावंडाना घेउन कुटुंबात आज आनंद साजरा होईल. पुरूष संतती कडून मानसिक त्रास होईल तरी तुम्हाला त्याची दखल घ्यावी लागेल. व्यसनी मंडळीना आजचा दिवस मानहानी करणारा ठरेल.
कर्क :–मुलाच्या नावावर असलेला व्यवसायातील सरकारी कागदपत्रांची पूर्तता वेळेवर करा. वेगवेगळ्या स्कीमस्ची माहिती करून घ्या. पुष्य नक्षत्र असलेल्यांनी व्यवसाय वृद्धीचे मार्ग शोधावेत.
सिंह :–आज त्रिवेणी लाभाचा दिवस आहे. श्री गुरूमाऊलीची कृपादृष्टी होईल, भाऊ, वडिल व स्वतःचा मुलगा याच्याकडून वेगवेगळ्या पातळीवर सुख, समाधान व आनंद मिळणार आहे.
कन्या :–महत्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागेल. पोटदुखी, जलोदरचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये. अचानक रागाचा पारा चढेल. शंकैसूर व्यक्तीनी मनमोकळेपणाने चर्चा केल्यास आदला विषयच राहणार नाही.
तूळ :–भावाच्या तब्बेतीची चौकशी करावी. काळजीचे कारण आहे. पैशांची काळजी घ्या. पैसे हरवणे, नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आज आर्थिक व्यवहार गृहमंत्र्यांकडे सोपवावेत.मानसिक अस्वस्थता वाढेल.
वृश्र्चिक :–प्रकृतीबाबत चिंता मिटेल. अडचणीच्या काळात आपले व परके यांची चांगली ओळख पटली असेल. नोकरीत सहकार्यांबरोबरील संबंध वृद्धीगत होतील. शत्रूंच्या विरोधातील तुमची ताकद चांगलीच वाढणार आहे.
धनु :–वृद्ध मंडळीनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आजारातून मूक्त होण्यासाठीच्या या प्रयत्नाना साथ द्यावी. स्वतःचा हेका चालवू नये. मुलावरील कंट्रोल सुटत नाही ना याची खात्री करून घ्यावी. स्कीन चा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये.
मकर :–राजकीय मंडळीनी मध्यस्थामार्फत आलेल्या निरोपावर विश्वास ठेवू नये. जागेचा ठरलेला व्यवहार अचानक बिघडणार आहे तरी आर्थिक व्यवहार करू नयेत. तरूण वर्गाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडेल.
कुंभ :–राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सत्ता वापरण्याचे अधिकार मिळतील. प्रकृती अस्वास्थ्यामूळे जर जबाबदारी झटकली असेल तर पुन्हा ती जबाबदारी स्विकारण्ची उत्तम संधी घालवू नका. आईच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल.
मीन:–स्वभावात उत्साह वाढेल. अध्यात्मिक मंड ळीना श्री गुरूमाउलीचा आशिर्वाद मिळेल. शेअर बाजारातील जूनी गुंतवणूक बराच लाभ करून देईल. आजपर्यंत ज्या गोष्टीचा मोह वाटत होता त्याचे आकर्षण राहणार नाही.
|| शुभं भवतु ||