Read In
शुक्रवार 18 सप्टेंबर 2020 दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
आज अधिक महिन्यास प्रारंभ होत असून, उत्तरा फाल्गुनी या रवीच्या नक्षत्रात सूर्योदय होत आहे. पितृपक्षानंतर च्या प्रतिपदेपासून अश्र्विन नवरात्रास प्रारंभ होतो, पण या वर्षी अधिक अश्र्विन असल्याने नवरात्र १ महिना पुढे गेले आहे. १७ आँक्टोबरला नवरात्र सुरू होत आहे.
आज चंद्र रास कन्या असून, चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी सकाळी 06:59 पर्यंत असूननंतर हस्त नक्षत्र सुरू होत आहे. तरी हस्त, कन्या यांच्या अभ्यास करून आजच्या 05:30 च्या कुंडली प्रमाणे कन्या, हस्त नक्षत्रानुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष:–सरकारी कामामध्ये यश मिळेल. भविष्याची तरतूद आत्ताच करायची आहे या विचाराने खर्चावर नियंत्रण आवश्यक. वैवाहिक जीवनात प्रवेश करण्यापूर्वी स्वतःच्या क्षमताांचा अंदाज घ्या. सामाजिक कार्यात इच्छा नसतानाही सहभागी व्हावे लागेल.आज उज्वल यशासाठी संकल्प केल्यास यशाची प्राप्ती होईल.
वृषभ :–क्षुल्लक कारणावरून मानसिक त्रास करून घेऊ नका. कलाकार आज पूर्ण वेळ आपल्या कलेत मग्न असतील. पुढील यशाची आखणी कराल. कांही नवीनविषयात आवड निर्माण होऊन त्याची माहिती घ्याल. लगेच प्रतिक्रीया व्यक्त करू नका.
मिथुन :-वारसा हक्काच्या मालमत्तेस, बंधी वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राजकीय मंडळींच्या खाजगी आयु. ्यावर चर्चा होईल तरी सावध रहावे. नोकरीबरोबर जोडधंदा असणार्यांना नोकरीतील पैसा व्यवसायात लावावा लागेल. सार्वजनिक कामात जाणे आज नक्की टाळा.
कर्क :–तुमच्या वागण्याच्या पद्धतीमुळे इतरांच्या मनात कामाची उर्जा निर्माण कराल. कोणताही निर्णय घेताना चौफेर विचारांची गरज भासेल. गरज नसताना फुशारकीने जास्त साहस दाखवून नुकसान करून घ्याल. आईची काळजी घ्या.
सिंह :–नेतृत्वाची संधी मिळेल पण स्तुतीपाठकांच्या घोळक्यात राहू नका. घरगुती प्रश्नावरील उपायासाठी इतरांची मदत घेऊ नका. आज सकाळपासूनच कामाची घाईगर्दी होणार आहे. नियोजित काम वेळेवर करण्याला जास्त महत्व द्यावे लागेल. उगाचच सल्ला देणार्यांपासून दूर रहा.
कन्या :–दूरदृष्टीने पुढील घटनांचा अंदाज बांधाल पण त्यावर शंभर टक्के विश्वासून राहू नका.कालचा प्रसंग पुनः पुनः आठवून दुःखी होणार नाही याची काळजी घ्या. पायाच्या दुखण्यांवर वेळीच उपाय करा दुखणे वाढणार आहे.
तूळ :–अंगावर घेतलेली जबाबदारी वेळेवर फार पाण्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासातील अडचणींवर मात करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. तुमच्या बलस्थानांचा आढावा घेऊनच सामाजिक कार्यात उतरा. कोणाच्याही बाबतीत कोणतीच प्रतिक्रीया लगेच व्यक्त करू नका.
वृश्र्चिक :–आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. आपल्या वरिष्ठांना गृहीत धरून कामे करू नका. कुटुंबातील आनंदाच्या क्षणी व्यक्त होणे टाळा. प्रत्येक व्यक्तीबरोबर सौम्यपणाने वागण्चा संकल्प करा.
धनु :–स्वकर्तृत्वावर फाजील विश्वास तुमचे व्यक्तिमत्व बिघडेल. लहान मुलांना अग्नी पासून जपावे लागेल. खाजगी क्षेत्रातील हिशोबनीसांना आर्थिक घोटाळ्याचा अंदाज येईल. कुटुंबात जोडीदाराचा विनाकारण अपमान केला जाई. निर्माण झालेल्या प्रश्नावर शांतपणे विचार करा.
मकर :–आईवडलांना गृहीत धरू नका. मधुमेहीनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे व तब्बेतीची काळजी घ्यावी. जवळच्या मित्राला भरघोस मदत करावी लागेल. आँफीसमधील घटनांवर प्रतिक्रीया देऊ नयेत. हाण मुलांच्या डोक्याला मार लागण्याची शक्यता आहे तरी काळजी घ्यावी लागेल.
कुंभ :–प्रेमसंबंध वृद्धींगत करण्याचे प्रयत्न करावे लागतील. पदाधिकार्यांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कांही प्रश्न बुद्धीच्या बळावर न सुटता वस्तुस्थितीच्या जोरावर सुटतील. बँकेचे व्यवहार जपून करावेतमहत्वाची वस्तू सांभाळून ठेवावी लागेल.
मीन :– कोर्टातील प्रकरण कोर्टाच्या बाहेरच सुटेल. प्रवासात स्वतः दक्ष असलात तरही समोरचा येऊन धडकण्याची भीती आहे. पाचामुखी परमेश्वर याचे पहत्व ओळखून निर्णय घ्या. निर्णयात अहंकार येऊ देऊ नका. संधी तुमच्या बाजूने आहे. प्रयत्नांची शिकस्त
||शुभं भवतु ||