Read In
गुरूवार 17 सप्टेंबर 2020 दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज अमावास्या 16:30 पर्यंत, चंद्र रास सिंह 15:07 पर्यंत नंतर कन्या.
चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी सकाळी 09:47, नंतरउत्तरा फाल्गुनी.
या नक्षत्रांच्या कालावधीच्या अभ्यासावरून व आजच्या पहाटे च्या 5:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज सर्वपित्री अमावास्या असल्याने ज्या पितरांचे श्राद्ध कांही कारणास्तव केलेले नाही त्यांचे श्राद्ध आज करता येणार आहे. तसेच ज्याना श्राद्ध करणे शक्य होणार नाही, त्यांनी दुपारी १२ नंतर आपल्या पितरांच्या नावाने ताट ठेवावे. जे कावळ्यांनी खाणे अपेक्षित आहे. मनोभावे त्याच्या नावाचा उच्चार करून त्यांना बोलवावे व अन्न ग्रहण करून तृप्त होण्याची विनंती करावी. व कुटुंबातील सर्व सदस्यांनी नमस्कार करावा. नंतर आपण जेवावे.
मेष:–अपत्यप्राप्तीच्या जोडप्यांना गोड बातमी कळेल तीर्थयात्रा करण्याची अतिशय इच्छा होईल. घरातील वृद्धमंडळी तुमच्या मागे ठाम उभे राहतील. दत्तक पुत्र घेण्याबाबतचा निर्णय पक्का होईल. सुना व जावई यांनी ज्येष्ठांचे अनुकरण करावे.
वृषभ :–आजपर्यंत जे लोक तुम्हाला कमी समजत होते त्यांना तुमच्या बुद्धीची चुणूक बघायला मिळेल. कठीण प्रसंगात कसा मार्ग काढावा याचे उत्तम उदाहरण द्याल. नोकरीतील कामाचा व्याप लवकर संपणार नाही. लहानसहान गोष्टी मनाला लावून घेऊ नका.
मिथुन :–विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केल्यास या कोरोना कालावधीचा वापरही चांगल्या प्रकारे करून घेता येईल. व्यवसायात तुम्ही जागरूक रहा कोणीतरी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. संघर्षाला विनाकारण संधी देउ नका.
कर्क :–यावर्षीची स्पर्धा परीक्षा तुम्ही पार करणार आहात तरी जराही बेफिकीरी न करता मेहनत वाढवा. मित्र मैत्रिणींच्या नादाने गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी कराल. कोणाच्याही वागण्यावर टीका करू नका वार तुमच्यावरच उलटेल.
सिंह:–भूतकाळाचा विचार न करता पुढे चला. नात्यामधील चर्चेत मनातील भाव लपवता येणार नाहीत. मुलामुलींचे अतिरिक्त लाड न करता त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून द्या. गुंतवणूक करताना तज्ञांच्या विचाराने करा. आनंदाच्या भरात स्वतःच्या मनातील विचार व्यक्त कराल.
कन्या :–कोणत्याही परिस्थीतीत आज व उद्या प्रवास टाळावा लागेल. मौल्यवान वस्तू व कागदपत्रे सांभाळावी लागणार आहेत. सर्दी खोकल्याकड़े दुर्लक्ष करू नका. तुम्ही आज अडचणींवर मात करणार आहात. सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी बोलावणे येईल.
तूळ :– प्रेम व्यवहारात पुढे जाण्यास हरकत नाही. मधुमेहीनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. गरज नसलेल्या कोणत्याही परिस्थितीत दुसर्याला जामीन राहू नका. ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्हाला स्वभावावर बंधने घालावी लागतील.
वृश्र्चिक :–तुमच्या वागण्यातील आक्षेपार्ह बाबींवर सहकारी, नातेवाईक चर्चा करतील. शांततेने रहा त्याकडे लक्ष देऊ नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण राहील. घरातील वातावरणात तुम्हीच बदल करू शकता.
धनु :–राजकारण्यांनी आज तोंड बंद ठेवावे. इतरांकडून तूमचा फायदा घेतला जाणार आहे. आपल्या क्षमतेचा विचार करूनच व्यक्त व्हा. स्वतःचे काम स्वत: करा. हितचिंतकांच्या सल्ल्यानीं पण स्वत: पुन: विचार करून वागा.
मकर :–अतीकाम करण्याच्या नशेने स्वत:ला आजारपण ओढवून घ्याल. ज्या क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे, त्या क्षेत्रातील खाचाखोचा समजून घ्या. पदाधिकार्यांबरोबर चर्चा करताना शब्द काळजीपूर्वक वापरा. त्यांचा मान ठेवा.
कुंभ :–संततीच्या प्रतिक्षेतील स्त्रीयांना सूचक स्वप्ने वा शुभसंकेत मिळतील. गुंतवणुकीच्या कामात तज्ञांचा सल्ला माना नुकसान संभवते. बघता बघता महत्वाची वस्तू चोरीला जाईल. गैरसमजूतीमूळे पतिपत्नीतील वाद विकोपाला जातील. कोणतीही घाई करू का.
मीन :–अचानक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. बर्याच कालावधीपासून ज्या यशाच्या प्रतिक्षेत आहात ते समोर दिसू लागेल. हातातील असलेल्या अधिकाराचा वापर अजाणतेपणाने चुकीच्या कामासाठी होईल. प्रवासात नवीन ओळख होईल.
||शुभं—भवतु||
Thank you Tai
Dhanyawad Tai