Read In
बुधवार १६ सप्टेंबर दैनिक भविष्य
कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश
आज चंद्र रास सिंह असून केतूचे मघा नक्षत्र दु. १२ वा. २० मि.पर्यंत आहे. त्यानंतर शुक्राचे पूर्वाफाल्गुनी नक्षत्र सुरू होते. या दोन्ही नक्षत्रांच्या अभ्यासाने व आजच्या सकाळच्या ५.३०च्या कुंडलीनुसार कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेषः रेंगाळलेल्या कामाला वायुवेगाने सुरूवात कराल. स्वभावातील लहरीपणा वाढेल. लहान भावंडाबरोबरील मतभेदांचा विपर्यास होऊ देऊ नका. कर्जप्रकरण निकालात निघेल.
वृषभः मनाची चलबिचल वाढेल. बुद्धीच्या जोरावर वादात विजय मिळवाल. संततीच्या आवडत्या विषयाची कुवत जाणून घ्या. नोकरीत कामाचा पसारा वाढेल. कुलदेवतेच्या उपासनेने अवघड कामे सोपी होतील.
मिथुनः मानसिक क्लेश वाढतील. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. नोकरीनिमित्त लहानसा प्रवास घडेल. घराला भाडेकरू मिळेल. महत्त्वाच्या कामासाठी लाच देण्याचा प्रसंग येईल. उसने दिलेले पैसे परत मिळतील. डोकेदुखीचे शक्यता आहे.
कर्कः सकाळ उत्साहात सुरू होईल. बर्याच दिवसानंतर आवडत्या माणसांची भेट होईल. सतत मूड बदलत राहील. सरकारी नोकरदारांनी आपल्या आकडेमोडीकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.
सिंहः सूचक स्वप्ने पडतील. धैर्य एकवटून काम करा. प्रेमाचा विषय विवाहाकडे जाईल. मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची भीती आहे.
तुम्ही सर्व ग्रहांचे राजे आहात. तुम्ही धैर्य एकवटून काम करा.
कन्याः शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सिद्ध करा. अध्यात्मिक मार्गात गुरुमाऊलीकडून महत्त्वाच्या सूचना मिळतील. गुंतवणुकीतून पैसे येतील. नोकरवर्गाचे सहकार्य लाभेल.
तूळः महत्त्वाच्या कामात निर्णय़ घेताना काही सूचणार नाही. सरकारी कागदपत्रांची पूर्तता वेळेवर करावी. पैसे मिळवण्यासाठी इतर मार्ग शोधू नये. पत्नीच्या भावाकडील कुटुंबास मदत करा.
वृश्चिकः छोट्या छोट्या गोष्टींचा राग येऊ देऊ नका. कुटुंबातील वादविवाद शांततेत सोडवण्याचा विचार करा. महत्त्वाचे पत्र तुमच्यापर्यंत पोहचण्यास वेळ लागेल. मुलांच्या डाव्या डोळ्याची काळजी घ्या.
धनुः उच्चशिक्षणाचे वेळापत्रक कोलमडून पडण्याचे संकेत आहेत तरी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. गूढशास्त्राच्या अभ्यासाची आवड निर्माण होईल. मातृसुखात न्हाऊन निघाल. शेतीउद्योगात यावर्षी नवी प्रयोग करता येणार आहेत.
मकरः कामात कष्ट वाढतील. स्वभावात चिडचिडेपणा वाढेल. अचानक सांपत्तिक स्थिती उंचावण्यासाठी संकेत मिळतील. तरुणवर्गाच्या आवडत्या विषयातील रुचीत बदल आहे.
कुंभः आज तुमच्या वागण्याविषयी गुढता निर्माण होईल. अचानक गरज नसताना पैसे खर्च होतील. गायक लोकांना घशाचा त्रास उद्भवण्याचा संभव आहे. आजारी आईच्या तब्येतीची काळजी वाटणारे प्रसंग निर्माण होतील.
मीनः वडिलांकडून कठोर शब्दांत समज मिळेल. अचानक धनलाभ आहे. पाळीव प्राण्याची काळजी घ्या. प्रेमाच्या व्यवहारात एकमेकांचा रुसवा काढावा लागेल.
IIशुभं भवतूII