daily horoscope

दैनिक राशीभविष्य मंगळवार १५ सप्टेंबर २०२०

Read In

 

दैनिक  राशीभविष्य  मंगळवार  १५  सप्टेंबर  २०२०

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscopeआज त्रयोदशी २३.०० / चंद्र रास कर्क १४.२४ पर्यंत   नंतर सिंह रास  /  चंद्र नक्षत्र आश्लेषा  १४.२४ पर्यंत   नंतर मघा.

कर्केचा स्वामी चंद्र /  चंद्राचा नक्षत्र स्वामी बुध आहे उपनक्षत्रस्वामी राहू व उप उपनक्षत्रस्वामी शनी आहे.

आज  पहाटे  ५.३० ला सिंह लग्न १४ अंशावर असून लग्नाचा नक्षत्र स्वामी शुक्र, उपनक्षत्रस्वामी शुक्र व उप उपनक्षत्रस्वामी गुरू आहे.

या सर्व बाबींच्या अभ्यासाने आजचे राशीभविष्य कृष्णमूर्ती पद्धतीने देत आहे.

 

मेष:– बर्‍याच दिवसापासून मनात रखडलेल्या विचारांना गुरूवर्यांकडून मान्यता मिळेल. सुखाच्या कल्पनांना तडा जाईल.तुमच्या व्यक्तीमत्वाचा इतरांवर प्रभावतील पडेल. अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा विचार पक्का ठरेल. जवळचे नातेवाईकांच्या आजारपणाची बातमी कळेल.

 

वृषभ. :– अतिआदर्शवादाच्या विचारांनी  मनाचा कोंडमारा होईल. आवडत्या गोष्टींची खरेदी कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येथील. मुलांकडून वादाचे विषय निर्माण केले जातील. नोकरीतील कामाचा आवाका आवरणार नाही. व्यवसायी दृष्टीकोन वाढेल.

 

मिथुन :–दूरच्या नातेवाईकांची चौकशी करा. आनंदाच्या भरात स्वतःची गोष्ट देउन टाकाल. बहिणीकडील खुशाली कळेल. पूजेमूळे उत्साह वाढेल. मन दोलायमान होईल तरी वस्तूस्थिती ओळखून वागा. मित्र मैत्रिणी सह  प्रवास घडेल. स्कीन आ खाज येईल.

 

कर्क :–नोकरीत कामात उत्साह वाढेल पतीपत्नीमधील वाद मिटण्याची मार्ग सापडतील.  हातातून पैसै सुटणार नाहीत. ज्येष्ठांकडून मोलाचा सल्ला मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात चकीत करणार्या गोष्टी घडतील. जास्त वजन असणार्‍यांनी विचार करावा.

 

सिंह :–मनाचा  होय नाही असा गोंधळ होईल. लेखकांना लेखनासाठी नवीन विषय मि ळेल. नोकरीत पदभ्ष्टतेचा प्रसंग सतावेल. आईकडील घराण्याकडून वाईट बातमी ऐकू येईल. मनात स्वतंत्र व्यवसाय करण्याचे स्वप्न फलद्रूप होण्याचे मार्ग सापडतील.

 

कन्या :–बोलण्याच्या चातुर्याने अवघड काम साधून घ्याल. दूर गावी असलेल्या वडलांची तातडीने चौकशी करा. डाव्या कानाची तक्रार उद्भवेल.पती पत्नीना  अतीव प्रेमाचा अनुभव येईल. दुसर्‍यांसाठी पैसे खर्च करावे लागतील. पूर्वनियोजित परदेशी जाण्याचे बेत रद्ध होतील.

 

तूळ :- लहान भावंडाच्या बुद्धी कौशल्याने चकीत व्हाल. पूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद उठतील. निर्णयाचा मानसिक धक्का बसेल. जूने येणे वसूल होईल. नव्याने खरेदी केलेल्या वस्तूत खोट निघेल. महिलांशी संबंधित व्यवहारांमूळे अडचणीत याल.

 

वृश्र्चिक :–वडिलार्जित धनांकडे वळूनही बघू नका. गरजू भावंडाना व शैक्षणिक संस्थेस देण्याचे एकमताने ठरवा. द ळणवळण संस्थेतील कर्मचार्‍यांवर महत्वाची कामगिरी सोपवली जाईल. कलाकार मंडळींचे समाजाकडून कौतूक होईल. सुग्रास भोजनाचा लाभ होईल.

 

धनु:– ठेवणीतल्या वस्तूचा वापर करण्याची संधी मिळेल. बुद्धीच्या जोरावर वाद घालण्याची इच्छा निर्माण होईल. गोरगरिब लोकांसाठी मदतीचा मोठा हात पुढे कराल. संततीच्या प्रतिक्षेत असणार्‍यांनी डाँक्टरांचाच सल्ला मानावा. विवाहेच्छूंनी आपल्या अटी शिथील केल्यास सर्वच सोपे होणार आहे.

 

मकर :–बोलण्यात मार्दवता ठेवावी लागेल. एखादे वेबिनार घेण्याच्या तारखा निश्चित होतील. दुसर्यांवर अवलंबल्याचा परिणाम मानसिक क्लेश वाढवेल. पुरूष व स्त्रियांना सासरकडील मंडळीना अनपेक्षित मोठी मदत करावी लागेल. सरकारी बँकेत अडकलेले पै से मिळतील.

 

कुंभ:–आज कामे अतिशय संथ गतीने होणार आहेत. तुमचे विरोधक गोंधळ माजविण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या वागण्यातील पारदर्शकपणा तुमची प्रतिष्ठा वाढवेल. पण लपवून ठेवलेल्या बाबींविषयी शंका वाढेल.

 

मीन:–स्वभावात उत्साह वाढेल. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. वारसा हक्काने भूमीला संभवतो. आरोग्यात मानसिक अस्वस्थता वाढेल. सरकारी कागदपत्रांच्या पूर्तता करण्यासाठी सहकारी वर्ग मदत करेल. अधिकार्यांच्या प्रश्नांना मोठ्या ताकदीने सामोरे जाल

||  शुभं भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *