daily horoscope

दैनिक राशीफल. सोमवार १४ सप्टेंबर २०२० चे दैनिक राशीभविष्य

Read In

 

दैनिक राशीफल. सोमवार १४ सप्टेंबर २०२० चे दैनिक राशीभविष्य.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscopeसोमवार द्वादशी २५:२९ पर्यंत / लग्न सिंह १३ अंश २६ कला /व पूर्वा फाल्गुनी  नक्षत्र आहे. नक्षत्र स्वामी रवी असून उपनक्षत्रस्वामी चंद्र आहे.

चंद्र रास कर्क स्वामी चंद्र  / चंद्रनक्षत्र पुष्य १५.५१ पर्यंत स्वामी  शनी  / नंतर आश्लेषा. चंद्राचा उपनक्षत्रस्वामी रवी आहे.

वरील नक्षत्रांच्या अभ्यासाने व आजच्या पहाटेच्या ५.३० वाजताच्या नैसर्गिक कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

 

मेष :– अपत्य प्राप्तीच्या जोडप्यांना गोड बातमी कळेल.   आजी आजोबांकडून सल्ला मिळेल. व्यवसायासाठी कर्जप्रकरणे मार्गी लागतील. . तरूणांना मायग्रेनचा त्रास होईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

 

वृषभ :–शिक्षकांची कामामूळे दगदग वाढेल. . फार्मासिस्टनी प्रिस्क्रीप्शन काळजीपूर्वक वाचून औषधे द्यावीत. अन्यथा अनर्थ होईल. कुटुंबात ताणतणाव वाढेल. आईच्या तब्बेतीची काळजी घ्या. शेजार्यांबराबरचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे.

 

मिथुन :– मनातील विचार व्यक्त न झाल्याने धुसफुस वाढेल. जोडीदाराबरोबर प्रीतीषडाष्टक व्यवहार  राहील. नोकरी निमित्ताने लहानसा प्रवास  घडेल.  ओबीस मंडळीनी आरोग्याची काळजी घ्यावी. व्यवसाय वृद्धीचे संकेत मिळतील.

 

कर्क :–  महिलांना खरेदीचा मूड येईल. सामाजिक कार्यकर्त्याना अतिशय कष्ट होतील. जाहिरात क्षेत्रात काम करणार्‍यांना बुद्धी कौशल्य दाखवता येईल. वकील मंडळी मोठ्या चातुर्याने आपली केस मांडतील. विद्यार्थ्यानी दुसर्यांबरोबर स्पर्धा करू नये.

 

सिंह :– भूतकाळाचा विचार न करता पुढे चला. कोणताही कागद वाचल्याशिवाय त्यावर सही करू नका. स्वानुभवावर झालेले तुमचे मत जाहीर करू नका. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून  चांगला फायदा होईल. सध्या नवीन गुंतवणूक करू नका.

 

कन्या :–बोलण्याच्या चातुर्याने अवघड काम साधून घघ्याल.तरूण मंडळीना अचानक  झोप न लागण्याचा त्रास होईल. पुरूष मंडळीनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. व्यवसायात भागीदाराच्या मताचा आदर करावा लागेल. सरकारी बँकेच्या कर्जाबाबतीत बेफिकीर राहू नका.

 

तुळ :–  नोकरीतील वाद व मतभेदामूळे तडकाफडकी नोकरी सोडण्याचा विचार कराल. सौंदर्यप्रसाधनाच्या उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. घरगुती पार्लरचा व्यवसाय चांगला लाभ देईल. मानसोपचार तज्ञांकडे रूग्णांचा भार वाढेल.

 

वृश्र्चिक :– घर, व्यवसाय कर्ज प्रकरण पुढे पुढे ढकलले जाईल. पत्रकारांनी अफवांवर विश्र्वास ठेवू नये. तरूणांना ब्लडप्रेशरचा त्रास होईल तरी काळजी घ्यावी. पाळीव प्राण्याची काळजी घ्या. तरूण, वृद्ध सर्वानीच व्यसनावर नियंत्रण ठेवावे.

 

धनु:– श्रीसद्गुरू, मठाधीपती तसेच धर्मोपदेशक यांचे समाजाला उद्धेशून प्रबोधन होईल.. घशामधे  इन्फेक्शनचा त्रास झाल्यास डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. नवीन नोकरीची संधी मिळेल.  सल्ला घेऊनच निर्णय घ्या. अधिकारी मंडळीनी प्रतिष्ठेस जपावे.

 

मकर :–द्वितीय संततीच्या  लाभाची बातमी कळेल. तरूण, वृद्ध सर्वानीच सध्या डोळ्याचे आँपरेशन पुढे ढकलावे. विवाहासाठीच्या जोडीदारात वयाचे अंतर जास्त असेल. शिक्षक, प्राध्यापकांना  अचानक मानहानीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल.

 

कुंभ :–अध्यात्मिक अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल. कोर्टाच्या कामातून मुक्त करण्यासाठी विनंती केल्यास सुटका होईल. द्रवपदार्थाच्या सेवनाने वीषबाधेचा त्रास होईल. तरी द्रवपदार्थ तपासून मगच घ्या. घशाला त्रास होऊन आवाजात खरखर वाढेल.

 

मीन :– स्वभावात उत्साह वाढेल. मन दोलायमान झाल्याामूळे कोणताच निर्णय घेता येणार नाही. कुटुंबात जोडीदाराचा व व्यवसायात  सहकारी,  मित्र यांचा सल्ला घ्यावा. गूढविद्ध्या शिकण्याची इच्छा निर्माण होईल.

||  शुभं भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *