Read In
साप्ताहिक भविष्य
रविवार १३ सप्टेंबर ते शनिवार १९ सप्टेंबर २०२०.
साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश
या सप्ताहात मिथुन, कर्क, सिंह, कन्या या राशीतून चंद्र भ्रमण करणार आहे. १३ सप्टे. कर्क पुनर्वसु १६:३२ पर्यंत / १४ सप्टें. कर्क पुष्य १५:५१ पर्यंत /१५ सप्टें. कर्क १४ : २४ व आश्लेषा १४:२४ पर्यंत (प्रदोष) /१६ सप्टें. सिंह मघा १२:२० पर्यंत / १७ सिंह १५: ०७ पर्यंत व पूर्वा फाल्गुनी ०९.४७ ( अमावास्या १६ : ३० पर्यंत) /१८ कन्या उत्तरा फाल्गुनी ०६:४९ / १९ सप्टें. कन्या १४ :४२.चित्रा २५: २०.उत्तर रात्री १:२०.( राहुचा वृषभ राशीत प्रवेश २०:१८ )
प्रतिष्ठेत वाढ, संतती कडून आनंद, शेअर्समधील फायदा, अध्यात्मिक शक्तीची मदत, यातील काय आहे तुमच्या राशीत बघा एका क्लीकवर.
मेष :–१३ च्या दुपारी ४ :३२ पर्यंत तुमच्या अधिकारात असलेल्या महत्वाच्या कामात तुम्ही निर्णय घेऊ शकाल. राजकीय मंडळीनी झाकली मूठ हा मंत्र ठेवावा. ज्या गोष्टीत हळवेपणा वाटेल त्याच बाबतीत तुमचा कठोरपणाही वाढेल. नोकरीतील कामात तुम्ही तुमचा ठसा उमटवाल. १४ च्या सकाळी ९ ते दुपारी १४.३० पर्यंत महत्वाची कामे करू नयेत. १६ व १७ रोजी व्यवसायाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून बघण्याच्या दृष्टीने आखणी कराल. १८ व १९ शक्यतो कोणालाही पैसे उसने देऊ नयेत. १८ ला खरेदी केलेली वस्तू पुन्हा बदलून आणावी लागेल.
वृषभ :– जमीन, घर या व्यवहारात पुरेपूर दक्षता घ्यावी लागेल. फायनल शब्द या सप्ताहात देउ नका. इतरांना मदत करण्यासाठी तुमचा वेळ व पैसे दोन्ही खर्च होणार आहेत. आपल्या कार्यक्षमतेला अति ताण देउ नका. संतती कडून आनंदाची बातमी कळेल. प्रवासाचा योग आहे पण महत्वाच्या वस्तू प्रवासात सांभाळाव्या लागतील. आदर्श विचारांना व वागण्याला सन्मान मिळेल. सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा वाढेल. १६ व १८ रोजी नोकरदार वर्गास नोकरीतील महत्वाच्या कोर्टाच्या कायदेशीर कामासाठी बाहेरगावी जावे लागेल. १९ ला देण्याघेण्याचे व्यवहार करू नये.
मिथुन :–अधिकारी वर्गास हातात असलेल्या अधिकारामुळे पराक्रम दाखवण्याची इच्छा होईल. व्यवसायात पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल.१५ व १७ रोजी आत्ता नव्याने करावयाची गुंतवणूक फक्त औषधाच्या कंपन्यांचे व धातुच्या वस्तूंचे शेअर्स फायदेशीर ठरतील. १५ रोजीचे व्यवहार दुपारी २.३० नंतर करावेत. वैवाहिक जीवनात यशस्वी झाल्याची पावती मिळेल. स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्यांनी सध्याचे १९ तारखेपर्यंत जरा आरामशीर अभ्यास करायला हरकत नाही त्यानंतर मात्र खूप जोर करावा लागेल.
कर्क :– १३ व १४ दोन्ही दिवस कामाच्या रगाड्यात स्वतःला हरवून घ्याल व चांगलीच दमणूक होईल. नोकरीत सहकार्यांबरोबरील संबंध वृद्धींगत होतील. १५ ला बँक, पतसंस्था, चार्टर्ड अकौटंटच्या आँफीसमधील कर्मचार्यांना कामाचा ताण फार जाणवेल. पण स्वतःची किंमत कळेल व अभिमान वाटेल. घरातील, आँफीसमधील फर्नीचर बदलून घर आँफीस सजवण्याचे विचार सुरू होतील. १७ किंवा १८ ला एखाद्या मित्र मैत्रिणींसाठी जामीन राहण्याची परिस्थीती उद्भवेल. १८ ची दुपारी मनस्ताप देईल. १८ ची संध्याकाळ व १९ हा पूर्ण दिवस अतिशय उत्साहात जाणार आहे.
सिंह:–१३ रोजी अधिकार गाजवण्याची वृत्ती उफाळून येईल. विशेषतः पोलीस खात्यातील अधिकारी वर्गाने डोके शांत ठेवावे. १४ व १५रोजी तुमच्या हट्टी स्वभावाला मुरड घालावी लागेल. लहान मुले तर हट्टीपणाचा कहरच करतील. सामाजिक उपक्रमामधे भाग घेण्याऐवजी तुमच्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. १५ सकाळी ०८.४५ ते ११ वाजेपर्यंत मानसिक त्रासाचा जाईल. १७ व १८ पासूनसरकारी वर्गाच्या प्रशासकीय कामास गती मिळेल व कामे मार्गी लागतील. व्यवसाय उद्धोगात करण्यात येणारी गुंतवणूक फायदेशीर राहील.
कन्या :–कोणत्याही समारंभात जाणे टाळा. हा पूर्ण सप्ताह प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. १४ रोजी सार्वजनीक ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणार्या विद्यार्थ्यानी आपला अभ्यास जोरदार सुरूच ठेवावा. हे संपूर्ण वर्ष तुम्हाला शिक्षणातील यशासाठी अतिशय लाभदायक आहे. सुवर्णसंधी सोडू नका. विवाहित महिलांनी कुटुंबाकरता घेतलेल्या कष्टाची जाणीव, इतरांना झाल्याचे पाहून महिला कृतकृत्य होतील.१८ व १९ रोजी कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
तुळ :–कुटुंबातील व्यक्तींच्या इच्छा अपेक्षांना प्राधान्य द्या. १३ चा दिवस दुपारी ४.३० पर्यंत काही सा दगदगीचा व त्रासदायक जाईल. तसेच या वेळेत देण्या घेण्याचा कोणताच व्यवहार करू नका. सामाजिक पातळीवर केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. १५ रोजी व्यवसायीकांनी मिटींग्ज घेउ नयेत. बँकेच्या कर्जाचा बाऊ करू नका. योग्य ती सवलत मिळणार आहे. या वर्षी अभ्यासातील यशाच्या मार्गात येणारे अडथळ्यांवर मात करण्यासाठी चे नियोजन १६ ला करा अध्यात्मिक शक्तीची मदत मिळेल.
वृश्र्चिक :–कुटुंबात चांगले वातावरण निर्माण करण्याकरीता कुलदेवतेची या उपासनेला १३ ला संकल्प करून सुरूवात करा. १४ व १५ त्रासाचे व मानसिक बेचैनीचे जातील. स्वतःच निर्माण केलेल्या अडचणींसाठी परक्यांची मदत घेउ नका. १६ रोजी श्री गुरूमाउलीला निवेदन दिल्यास मार्ग सुकर होईल १८ व १९ हे दोन्ही दिवस धातुच्या खरेदीसाठी किंवा शेअर्समधील गुंतवणूकीसाठी चांगले आहेत. डाँक्टरी शाखेच्या अभ्यासकांना उत्साह व चैतन्याचा अनुभव येईल. मनःशांतीसाठी श्री दत्तमहाराजांच्या उपासना करावी.
धनु:–१३ रोजी दुपारी ४.३० पर्यंत तुम्ही आजवर केलेल्या कामाचे कौतुक होईल. शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांचे समाजाकडून मान सन्मान होतील. १४ व १५ रोजी अतिउत्साहात विचार न करता घाई करू नये. तुमचा नि:स्वार्थीपणा तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. कोणत्याही अफवांवर विश्र्वास ठेवू नका. १६ व १७ रोजी आईकडील नात्याला आर्थिक मदत करावी लागेल. सरकारी बँकेच्या अधिकारी कर्मचारी वर्गाने सह्या करणे, तपासणे या कामात अतिशय जागरूक रहावे. १९ रोजी कुटुंबातातील व्यक्तींना समजून न घेता आश्र्वासन देउ नये.
मकर :– या सप्ताहात १५ व १७ हे दोन दिवस तुमचा प्रत्येक क्षेत्रात लाभ करणार असल्याने योग्य ते नियोजन करा. कार्यारंभ करा. जे कराल त्यात यश मिळणार आहे. तरी आयुष्याला योग्य वळण देणार्या बाबींना प्राधान्य द्या. दि. १३ रोजी जनता संपर्क टाळा. राजकारण्यांना जनतेकडून रोष घ्यावा लागेल. १७ ची अमावास्या त्रासदायक जाईल. प्रवासही टाळावा. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या बातम्यांवर विश्र्वास ठेवू नका. १९ ला सुद्धा व्यवहारात काळजी घ्यावी, शक्यतो व्यवहार करूच नयेत.
कुंभ :–१४ रोजी मनात येणारे विचार वस्तुस्थितीबरोबर पडताळून बघा. कुटुंबाकडून तुमच्या कलागुणांची चेष्टा केली जाईल. १६ व १७ रोजी संस्थेचे पदाधिकारी, बँकेचे अधिकारी कायदेतज्ज्ञ यांच्याबरोबर बोलताना खूप काळजी पूर्वक शब्द वापरावे लागतील. कोणासही आश्र्वासन देताना प्रथम आपल्या क्षमताांचा विचार करा व मगच निर्णय घ्या. स्थावर मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायद्याची मदत घ्या. आयुष्यातील ताण तणावदूर ठेवायचे असतील तर दृष्टीकोन बदलणे महत्वाचे राहील. १९ रोजी नवीन कामाला सुरूवात करू नका.
मीन :–कुटुंबातील व्यक्तींच्या बाबतीत अतिभावनीक होऊ नका. १३ रोजी .मित्राच्या मदतीसाठी धाऊन जावे लागेल. आपल्या रागावर ताबा ठेवल्यास पुढे होणारे वाद टळतील व नातेसंबंध बिघडणार नाहीत. विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठण्यासाठी कामात, प्रयत्नात झोकून द्यावे लागेल. आपल्यावर असलेल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवा. घराच्या अंतर्गत सजावटीचे काम तूर्तास रद्ध करा. १८ व १९ हे दोन दिवस तुम्हाला लाभदायक असल्याने हाती घेतलेल्या कामात यश खेचून आणाल.
|| शुभं भवतु ||
Thank you Tai
Aabhari aahe Tai