Read In
दैनिक राशीफल ११ सप्टेबर
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
आश्र्चर्यजनक लाभ, दत्तक संततीचा विचार, ऐच्छीक सेवानिवृत्ती व हरवलेल्या वस्तूचा लाभ यांसाठी वाचा आजचे भविष्य एका क्लीकवर.
शुक्रवार ११ सप्टेबर . चंद्र रास मिथुन असून, १५:२३ पर्यंत चंद्र नक्षत्र मृगशीर्ष आहे. व नंतर आर्द्रा नक्षत्र सुरू होत आहे. तरी या कालावधीचा विचार करून हे नक्षत्रीय फलादेश देत आहे
मेष :- धातुच्या वस्तुंच्या कंपनीमधे केलेली गुंतव़णूक चांगला फायदा देईल शैक्षणिक दृष्टय़ा आजपर्यंत, चढता आलेख असलेल्या मुलांना उगीचच ग ची बाधा होऊन अभ्यासाविषयी अनास्था वाटेल. क्षणात कांही होतेय तर क्षणात बरे वाटतेय असे वाटले तरीही डाँक्टराचा सल्ला घ्यावा. महिलांना सासरकडून व पुरूषांना सासुरवाडीकडून आश्चर्यजनक लाभ होईल.
वृषभ :- कालपर्यंत लाजत बोलणारी मुलगी आज अचानक बोल्डपणे वागू लागेल पण हा परिणाम फक्त १८ सप्टेबर पर्यंतच राहणार आहे. वकिलांनी आपल्या कामात जराही ढील दिली तर परिणाम भयंकर होतील. वाहन विक्रीचा विचार असल्यास घाईने व्यवहार न केल्यास चांगला फायदा होईल. दत्तक संततीचा विचार करत असाल तर लवकरच संधी मिळणार आहे तरी विचार पक्का करून ठेवा.
मिथुन :- कुटुंबातील नव्याने जन्माला आलेले बाळ पुनर्जन्माचे असल्याचे संकेत मिळतील व तसे अनुभवही येथील. पदोन्नतीच्या विचारात अडकलेल्यांना आनंदाची बातमी मिळेल. ऐच्छिक सेवानिवृत्तीची संधी उपलब्ध होणार आहे तरी मनाची तयारी करा. आजवर शिष्यवृत्तीवर शिकणार्यांनी हवालदील होऊ नये. मार्ग निघणार आहे. घरासाठी कर्ज इच्छूकांनी धीर सोडू नये. कर्जाची सोय होणार आहे.
कर्क :- वकीलांना कोर्टाच्या कामासाठी दुसर्या गावी जाणे भाग पडेल. महिलांना ब्लडप्रेशरचा त्रास संभवतो तरी कोणत्याही विषयाचा बाऊ करू नये. मन शांत ठेवावे. व्यवसायातील खाचाखोचांवर चर्चा करू नये. वडिलांकडून मोलाचा उपदेश मिळेल व त्यांच्या कर्तृत्वाने भारावून जाल. वडीलांचे नॉलेज बघून त्यांच्याविषयी पूर्वीपेक्षा जास्त आदर निर्माण होईल.
सिंह :- अपत्य प्राप्तीच्या इच्छूकांनी आपली ईच्छापूर्ती होण्याचे संकेत मिळतील. घर बांधण्यासाठी लागणार्या खर्चाची विवंचना करू नका. आईकडून भरघोस मदत मिळेल. जे भाडेकरूंच्या शोधात असतील त्यांनी पैशाच्या लोभाने घाई करू नये. व्यवहार सुखकर होणार नाही. कोणत्याही प्रकारची लाँटरी, फुकटचे धन मिळण्याची कोणतीही शक्यता नाही तरी प्रलोभनाला बळी पडू नये.
कन्या :- सध्या उच्च शिक्षणाचे रेंगाळलेले काम एवढ्यात मार्गी लागणार नाही. पण तूर्त अभ्यास सुरू ठेवू शकता. विवाहेच्छूचे तडजोडीचे विचार असल्यास ओळखीमधेच विवाह जमण्याचे संकेत मिळतील. घाईने कोणताच निर्णय घेऊ नका. कलाकार, गायक यांना आपल्या कलेचे सादरीकरण करता येणार आहे. जरा धीराने घेतल्यास बेत पक्का होईल.
तुळ :- आज सकाळी जाग आल्यापासूनच कालच्या शिलकी कामाचे विचार सतावू लागतील. फार दिवसापूर्वी तुमची हरवलेली वस्तू अचानक सापडेल व आनंद होईल. लेखक, पत्रकार यांना वरिष्ठांच्या दडपणाखाली काम करावे लागेल. प्रेमाच्या अवास्तव कल्पना दूर करून वास्तवाचा विचार केल्यास नात्यात वितूष्ट येणार नाही. मधुमेहीनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे.
वृश्र्चिक :- नेत्रदृष्टी बाबतच्या त्रासासाठी डोळ्याच्या डाँक्टराचा सल्ला घ्यावा लागेल. गर्भवती महिलांनी दिवस भरत आले असतील तर कंपल्सरी विश्रांती घ्यावी. ओव्हर काँन्फीडन्सने वागू नये. आपल्याला काहीतरी होते आहे या शंकेत राहू नये. डॉक्टर, थेरपीस्ट, व समुपदेशकांनी आपली वाणी मृदू ठेवावी. इंटरनेट वरून चे सेमिनार चा बेत मीत्रांच्या मदतीने पक्का ठरेल.
धनु :- तुमचा जर पेशा शिक्षकी असेल तर समाजाकडून आदर, मान, सन्मान मिळेल. मंदिराचे पुजारी, ज्योतिषी, योगी यांच्याकडून समाजासाठी मोलाचे काम केले जाईल. कवी मंडळीना आपली कला वेबिनार मधून सादर करता येणार आहे. कोर्टातील कामात उगाच लुडबूड करू नका. कुटुंबात वादग्रस्त विषयावरील बोलणे टाळा. दीर, मेव्हणे यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. त्यांच्यासाठी दगदग करावी लागणार आहे.
मकर :-व्यवसायात नवीन करार करू नये. नवीन भांडवलदाराच्या मदतीचा विचार करत असाल तर १९ आँक्टोबर नंतर बोलणे भेटणे ठरवा त्या आधी नको. कौटुंबिक प्रश्न सोडवताना अतिभावूक होऊ नका. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी आजचा दिवस संध्याकाळी ६ पर्यंत उत्तम आहे. आपली आकलन शक्ती वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांना आजच सुरूवात करा.
कुंभ :- आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा एक मिशन आहे असा विचार करा. व कोरोनाच्या संकटापासून दूर रहा. सुरक्षित रहा. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. आज तुम्ही जनता संपर्कात येणार नाही याची दखल घ्या. आपली मते कुटुंबातील जोडीदारावर लादू नका. आज खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
मीन :कुटुंबात, बाहेर प्रत्येक व्यक्तीशी बोलताना संयम बाळगावा लागेल. कायदा पाळण्याच्या बाबतीत बेफिकीरीचे धोरण सोडावे लागेल. मनातील कोंडलेल्या प्रश्र्नांना आज बाहेर काढण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. कलाकार मंडळीना आपल्या कलेत रममाण होण्याचे योग आहेत. आजच्या अवघड प्रसंगातून सहिसलामत बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल.
||शुभं.-भवतु||