Read In
दैनिक राशीफल गुरुवार १० सप्टेंबर २०२०
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
आज अष्टमी, चंद्र रास वृषभ, चंद्र नक्षत्र रोहिणी दुपारी १३.३७ पर्यंत व नंतर मृगशीर्ष शुक्रवार ११ च्या दुपारी १३.२३ पर्यंत. म्हणून वृषभ राशीतील रोहिणी व मृगशीर्ष नक्षत्रांचा विचार करून नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :- आज संततीकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता होईल. अवखळ मुलामध्ये झालेला बदल लक्षात येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक होईल. महत्त्वाचे होणारे काम आज हुलकावणी देईल तरी श्रद्धेने श्री कुलस्वामीनीला प्रार्थना करावी. व्यवसायातून मानसिक त्रास संभवतो. सासूबाईंची काळजी घ्यावी. अध्यात्मिक शक्तीचा अनुभव येईल.
वृषभ :- आज तुमची कामे व्यवसायाशी संबंधित असणार आहेत तरी कोणताही निर्णय पक्का असेल तरच विषयाला हात घाला. महिलांनी आपल्या पर्सची काळजी घ्यावी ,खर्च झालेल्या पैशाचा हिशोब लागणार नाही. मोठ्या भावंडांबरोबर तात्विक मतभेद होतील. आज तुमचा आरामाचा दिवस आहे. आर्थिक व्यवहाराची घाई करू नका.
मिथुन :- लांबलेला सरकारी पत्रव्यवहार आज केल्यास दंडातून सुटका होईल. सरकारी, खाजगी पदाधिकाऱ्यांनी अधिकाराचा वापर काळजीपूर्वक करावा. जरी लॉकडाउन असले तरी शाळा कॉलेजच्या प्रवेशाची स्थितीची माहिती घ्यावी. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये. सर्वानीच पायांची काळजी घ्यावी.
कर्क :-बर्याच दिवसांपासून वडिलांची दवाखान्याची अपॉईंटमेंट अचानक ठरेल. आज तुमचा आनंदाचा व उत्साहाचा दिवस आहे. गुरूतुल्य असलेल्या जेष्ठ व्यक्तीबरोबर संपर्क होऊन बोलण्याची संधी मिळेल. सूचक स्वप्नाद्वारे पुढील घटनांची सूचना मिळेल. घशाच्या त्रासातून मुक्तता होईल. नोकरीच्या प्रतिक्षेतील तरूणांना चांगली संधी मिळेल.
सिंह :- आज तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असेल. नोकरीत, व्यवसायात तुमचे मत विचारात घेतले जाईल. कलाकार मंडळींचे समाजाकडून कौतुक होईल. लहान मुलांना पडण्याची व दुखापतीची भीती आहे. वडिलांकडील नात्याकडून आनंदाची खबरबात मिळेल. शेअर्सच्या व्यवहारातून चांगला लाभ होईल. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील.
कन्या :- विद्यार्थांना मनपसंत विषयाच्या प्रवेशाला अडचण निर्माण होईल. व्यवहारात कडक बोलण्याने गैरसमज होऊन व्यवहार बिघडेल. संततीबरोबर चर्चेचा मूड बघून घुमजाव करावे लागेल. आजोळकडील नात्याची चौकशी करा. सरकारी नियम न पाळल्याने पेनल्टी भरावी लागणार आहे. आज मित्रमंडळींबरोबर फारसे पटणार नाही.
तूळ :- घसा, स्वरयंत्राच्या त्रासावर वेळीच उपाय करा. दुर्लक्ष करू नका. तुम्हाला असलेली पैशाची गरज अनपेक्षितपणे पूर्ण होणार आहे. नियोजित प्रवासाचा बेत रद्ध करावा लागेल. विद्यार्थी अभ्यासाच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करतील. उष्णतेचा त्रास संभवतो. पुरूषांना सासुरवाडीकडील चिंतेत वाढ होईल.
वृश्र्चिक :- आज मौन धरल्यास मानसिक त्रासातून सुटका होईल. तसेच द्वितीय संततीचे आजारपण वाढेल. आजता दिवस पेंगुळलेला राहील. आराम करता आला तर आराम करावा. फार्मसीच्या विद्यार्थांना अभ्यासाबरोबर जुळवून घ्यावे लागेल. नर्सिंग क्षेत्रातील स्त्री पुरूषांना अतिशय दगदग होणार आहे.
धनु :– लोखंडाच्या व्यावसायिकांनी कोणत्याही आर्थिक उलाढाली करू नयेत. बँकेचा कर्ज हप्ता देण्यावर योग्य सवलत मिळेल. पॅनिक होऊ नका. १० वर्षाच्या आतील लहान मुलांच्या डोक्याला किंवा नाकाला दुखापत होण्याची शक्यता आहे. गायक, वादक यांचे सामाजिक स्तरावर कौतुक होईल. स्पर्धापरीक्षेची जिद्ध सोडू नका.
कुंभ :- आज वैचारिक गोंधळ होणार आहे व काही घटनांमुळे निर्णय घेता येणार नाही तरी जास्त विचार करू नका. पुढील घटनांबाबतचे तुमचे अंदाज बरोबर येथील. मित्रमैत्रिणींबरोबर काही वेळ आनंदात जाणार आहे. लहान भावंडाची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर प्रथम ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
मीन :- आर्थिक घडामोडी घडतील. जुने येणे विनासायास वसूल होईल. प्रवासाचा बेत रद्ध करावा लागेल. रेल्वे, पोस्ट, टेलिफोनमध्ये काम करणार्यांनी कोणत्याही बाबतीत अग्रेसिव्ह होऊ नये. वार्ताहर, संपादक यांनी बातमीची शहानिशा करून मगच निर्णय घ्यावा. ज्यांचा तुम्हाला राग होता त्यांच्या विषयीचा राग अचानकपणे कमी झाल्याचे जाणवेल.
मकर :- गुरूकृपेचा अलभ्य लाभ होईल. आज वृषभ रास असून रोहीणी नक्षत्र दुपारी १.३७ पर्यंत आहे व नंतर मंगळाचे मृगशीर्ष नक्षत्र सुरू होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून पुढील भविष्य देत आहे. आज नोकरीच्या कामात काही प्रमाणात अडथळे निर्माण होतील. तुमचा शनी हा १, ५ व ९ या स्थानांचा उपनक्षत्र स्वामी आहे. शनी १ अंश २९ कलांचा असून स्वतःच्याच राशीत, रवीच्या नक्षत्रात व गुरूच्या उपनक्षत्रात आहे. नोकरीत किंवा व्यवसायात तुम्हाला तुमच्या नवनवीन कल्पनाना मूर्त स्वरूप देण्याची परवानगी वरीष्ठांकडून मिळेल तसेच व्यवसायाच्या, मार्केटींगच्या वेगवेगळ्या दिशा सापडतील. ज्यांना तुम्ही गुरू मानता त्यांची वेगळीच कृपादृष्टी लाभेल. कुटुंबात एकमेकांविषयी जिव्हाळा व प्रेम यात वाढ होईल. व एक अंतरिक गूढ नाते निर्माण झाल्याचे जाणवेल. भाग्यस्थानाचा स्वामी मंगळ, मंगळाच्या राशीत व मंगळाच्या उपउप नक्षत्रात आहे व गुरूच्या उपनक्षत्रात आहे.श्री गुरूमाऊलीची एवढी कृपा होईल की सगळ्या डचणींवर एकच उपाय सापडेल. एकंदर आजचा दिवस आनंदाचा व सुखाचा जाईल.
|| शुभं भवतु ||
Thank you Tai
Dhanyawad