Read In
दैनिक राशीफल
आज बुधवार ९ सप्टेंबर २०२०
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज पहाटे ४. ०५ पर्यंत सप्तमी व नंतर अष्टमी. राशी वृषभ, चंद्र नक्षत्र रोहिणी सप्टेबर दुपारी ११.१४ ते गुरूवार १० सप्टेंबर २०२० दुपारी १३. ३७ पर्यंत आहे. .
कृष्णमूर्ती कुंडली पद्धतीने ९ सप्टेंबरच्या सकाळी ५.३० या वेळेवरून संपूर्ण दिवसाचे भविष्य लिहीले आहे. कृष्णमूर्ती पद्धतीने तुळ लग्न २९ अंश असून त्याचा स्वामी शुक्र, नक्षत्र स्वामी गुरू, उपनक्षत्रस्वामी चंद्र, उपउप नक्षत्र स्वामी चंद्र आहे. आजचा दिवस दुपारी १३.०७ नंतर शुभ आहे.
मेष :- आज चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात चंद्र व चंद्राच्याच हस्त नक्षत्रात बुध आहे. तरी बोलण्यात मुत्सद्दीपणा नसावा. संतती कडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता होईल. जोडीदारा कडून प्रेमाचा वर्षाव होईल. लहान भावंडाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
वृषभ :- तुमच्या व्यवहारी वागण्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला जाणवेल. वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत वरीष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. अचानक संततीसाठी मोठा खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केल्यास करिअरची वाटचाल सोपी जाईल.
मिथुन :पती-पत्नीच्या मदतीने एकमेकांचा भाग्योदय होणार असल्याने प्रोजेक्ट, व्यवसाय हातात घेण्यापूर्वी साधकबाधक चर्चा करणे महत्वाचे राहील. राजकीयदृष्टय़ा आज तुमच्या अधिकाराल, मताला महत्व मिळेल. जोडीदाराबरोबर प्रीतीषडाष्टक व्यवहार होतील.
कर्क :व्यवसायातील अडचणींवर मार्ग निघेल. पत्नी वा मैत्रिणीच्या मदतीने लाभदायक घटना घडतील. कडवट, लागट बोलणे टाळा अन्यथा वादाला कारण घडेल. आईला मधुमेह असल्यास विशेष काळजी घ्यावी लागेल. लहान भावंडाकडून अध्यात्मिक उन्नतीच्या मार्गाची माहिती मिळेल.
सिंह :-सध्याच्या अडचणींवर बुद्धीने मात कराल. विद्यार्थ्यांना यशाचे योग्य व महत्वाचे मार्ग सापडतील. सरकारी स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्यांनी तज्ञांचे योग्य ते मार्गदर्शन घ्यावे. अधिकारी वर्गाकडून कामातील क्लीष्ट प्रश्न सुटेल व कौतुक होईल.
कन्या :- बँक कर्मचारी, मेडिकल लँब टेक्निशियन च्या व्यक्तींना लोकांच्या रोषास सहन करावे लागेल. प्रेमाच्या अवास्तव कल्पना दूर करून वास्तवाचा विचार केल्यास नात्यात वितूष्ट येणार नाही. अचानक खाण्यापिण्यावर खर्च करावा वाटेल.
तुळ :कुटुंबात नवीन गाडी, घर घेण्याचे विचार सुरू होतील. चालू असलेल्या व्यवसायातून भाग्योदय होण्याचे संकेत मिळतील. तरी त्यातील सल्ले तज्ञांकडून घ्यावेत. कुशाग्र बुद्धीने वस्तुस्थितीचे भान ठेवून संवाद साधल्यास आज अचानक जूने येणे वसूल होईल.
वृश्र्चिक :- नोकरीत वा व्यवसायात आजपर्यंत गुप्त ठेवलेल्या गोष्टीना अचानक तोंड फुटेल. पैशाच्या देव घेवीच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आजोळ कडील व्यक्तींबरोबर वैचारिक मतभेद होउन वादाचे प्रसंग उद्भवतील.
धनु :- स्वतः केलेल्या कष्टाची कींमत कळेल व इतरांवर अवलंबून राहिल्याने कामे पडून राहतील. धार्मिक कार्य करणार्या गुरूजाीना चांगला लाभ होईल. लहान भावंडांबरोबर वैचारिक खटके उडतील. तरी आपले म्हणणे समजावून सांगा.
मकर :- मनातील योजना पेपरवर आणल्यास त्यावर विचार होईल. व्यवसायात सहकार्यांचा सल्ला घ्यावा. हॉस्पिटलमधे काम करणार्या कर्मचार्यांना कामातून आनंद मिळाल्याचा अनुभव येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या कष्टाचे कौतुक होईल.
कुंभ :- दैनंदिन खर्चा बरोबर चैनीसाठी अचानक मोठा खर्च कराल. पैशांचा हिशोब लागणार नाही. महिलांना आपल्या चीजवस्तु सांभाळाव्या लागतील. अचानक नुकसान झाल्याचे जाणवेल. घर, गाडी अशा चैनीच्या वस्तुंच्या खरेदीचे बेत ठरतील.
मीन :-स्वभावातील तापटपणाला आज मुरड घालावी लागेल. हातातील असलेल्या मौल्यवानॉ गोष्टींना सांभाळून ठेवा. राजकीय व्यक्तींना गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. मशीनवर काम करणार्या कर्मचार्यांनी आपले डोके व मन शांत ठेवल्यास दुर्घटना टळेल.
|| शुभं – भवतु ||
Thank you Tai