Read In
दैनिक राशीफल मंगळवार ८ सप्टेंबर २०२०
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
आज षष्ठी २४.०२ पर्यंत चंद्र रास मेष १५.०८ पर्यंत व चंद्र नक्षत्र भरणी ८.२४ पर्यंत. त्यानंतर वृषभ रास व कृतिका नक्षत्र सुरू होत आहे. या सर्वांचा विचार करून नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेषः आज मानसिक शक्ती वाढल्याचा जाणवेल व कामातील उत्साहही वाढेल. काहीही व कोणतेही दुखणे असेल तर ते मानसिक आहे, हे लक्षात ठेवा. व्यावसायिक बोलण्यामध्ये कडवटपणा येईल. वडीलभावंडाची भेट होईल वा प्रत्यक्ष बोलणेही होईल.
वृषभः आज तुमच्या मनाची अस्वस्थता वाढून उत्साह वाटणार नाही. मोठ्या बहिणीची चौकशी करावी. लहान मुलांच्या बोलण्यावर नियंत्रण न घातल्याचे परिणाम त्रासदायक झाल्याचे दिसून येईल. श्री गुरुकृपेचा लाभ होऊन अध्यात्मिक शक्तीचा अनुभव येईल.
मिथुनः प्रकृती अस्वास्थ्य ही मानसिक नसून शारीरिक बदलाचा भाग आहे हे जाणून घ्या. थोड्याशा विरोधानेही स्वभावातील बंडखोरी वाढेल. चैनीच्या वस्तू घेण्याकडे कल वाढेल. गायक मंडळींना आज एखादी मैफल गाजवता येणार आहे. पतीपत्नीच्या एक विचाराने घर, जमीन किंवा शेत खरेदी करण्याचे विचार ठरतील.
कर्कः आज मनाला एकदम प्रफुल्लित वाटून एखाद्या सणाची आठवण येईल. सरकारी खात्यातून येणे बाकी असल्यास ते मिळण्यासाठीचे प्रयत्न करावेत, सहजगत्या प्राप्त होतील. वयस्कर मंडळींच्या बरगड्या व पाठदुखीचा त्रास वाढेल. लेखक मंडळींच्या लेखनाचे समाजाकडून कौतुक होईल.
सिंहः बर्याच दिवसापासून रेंगाळलेल्या कामास आज सुरूवात केल्यास काम लवकरच पूर्णत्वाकडे जाईल. ऑफिसमध्ये सामाजिक क्षेत्रात अधिकार गाजवण्याची संधी मिळेल व तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने आदर्श निर्माण कराल. उत्तम वक्तृत्व कलेचा नमुना दिसून येईल.
कन्याः अतिबोलण्यामुळे कसे नुकसान होते याचा अनुभव येईल. उच्चशिक्षित व्यक्तींचा आज मानसन्मान होणार आहे. अभ्यासू विद्यार्थ्यांच्या इच्छा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षेत जबरदस्त वाढ होईल. नव्या चैनीच्या वस्तूंची खरेदी करताना पैशाचा विचार केला जाणार नाही.
तूळः आज उत्तम वस्त्र अलंकाराची आपली आवड व्यक्त करण्याची संधी मिळेल. अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींना श्री गुरु माऊलीकडून महत्त्वाच्या सूचना मिळून उपासनेबाबतची माहिती मिळेल. दूरगावी असलेल्या आईची चौकशी करावी. नवीन नोकरीच्या प्रतिक्षेतील तरुणांना नवी दिशा सापडेल.
वृश्चिकः आज तुमच्या स्वभावातील चिडचिडेपणा काही प्रमाणात कमी झाल्याचे तुम्हासच जाणवेल. मनातील छुपे विचार बाहेर काढण्याचे तंत्र सापडेल. शाळा, कोचिंग क्लास येथील शिक्षकांना अचानक प्रवासाचा आदेश मिळेल. तुम्ही करत असलेले ओरिएंटेशन महत्त्वाचे ठरून त्यासाठी तुम्हाला समाजाकडून कौतुकाची थाप मिळेल.
धनुः तुमच्यापासून लांब असलेल्या श्री गुरु माऊलीबरोबर संवादाची संधी मिळाल्यामुळे आत्मिक समाधान मिळेल. वयस्कर मंडळींना पाय घसरून पडण्याचा धोका आहे. तरीही चालताना चढ उतार करताना विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांच्या डोळा व नाक या इंद्रियांना इजा होण्याची दाट शक्यता आहे.
मकरः आज राजकीय मंडळींना समाजापासून दूर लांब जाऊन एकटे राहावेसे वाटेल. ज्येष्ठ व श्रेष्ठ यांचा तुम्हाला मोलाचा उपदेश मिळेल, त्यामुळे तुमच्या विचारांची दिशा बदलणार आहे. कुटुंबात पुरुष भावंडात वाद निर्माण होऊन क्लेष वाढतील. वारसाहक्काबाबतही मतभेद होतील. पतीपत्नीत शिलकीत ठेवलेल्या धनाबाबत वाद होणार आहे.
कुंभः नोकरदार वर्गाचे, सरकारी अधिकार्यांचे, घरातून काम करणार्यांच्या कष्टात वाढ होणार आहे. पोलीस, होमगार्ड यांचे शारीरिक कष्ट वाचतील व मनोबल खचणारे प्रसंग घडतील. आजचा दिवस प्रवासास त्रासदायक असल्याने प्रवास करू नये. तरुण वर्गाने अतिधाडस करून कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू नये.
मीनः तुमच्या वैयक्तिक व्यवसायात तुम्ही ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवला आहे, त्याच्याकडून तुम्ही फसले जात नसल्याची खात्री करून घ्या. नोकरदार वर्गास ऑफिसमधील कामाबाबत, अधिकार्यांबाबत काही गुप्त गोष्टी कळतील. तुम्हाला आज दु. १२ ते उद्या दु. ३ वाजेपर्यंत अचानक आर्थिक लाभ होणार आहे. लहान भावंडाचा लहरीपणा वाढेल.
II शुभं भवतु II
Dhanyawad