Read In
सोमवार ७ सप्टेंबर २०२०चे राशीभविष्य
आज मेष भरणी असलेल्यांना भाग्याचा डबल धमाका. आजचे भविष्य हे पहाटेच्या ५.३०च्या कृष्णमूर्ती पद्धतीच्या कुंडली वरून तयार करण्यात आलेले आहे. आज पहाटे ५.३० वा. सिंह लग्न असून ते ७ अंशावर आहे. त्यामुळे लग्नाचा स्वामी रवी असून, नक्षत्र मघा व स्वामी
केतु आहे व उपनक्षत्र स्वामी राहू आहे. आजची रास मेष असून नक्षत्र भरणी व त्याचा स्वामी शुक्र व उपनक्षत्र स्वामीही शुक्र आहे.
मेष :- आज अतिशय भाग्याचा दिवस आहे. अष्टऐश्वर्य जे म्हणतात त्याची सुरूवात होणार आहे. आपण काय करावे व काय चालले आहे याचा आढावा घ्यावा. ७ व ८ सप्टेंबर रोजी उच्चशिक्षणाचे विचार पक्के कराल. भाग्य स्थानाचा उप उपनक्षत्र स्वामी गुरू आहे त्यामुळे शिक्षणाच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. ९, १० सप्टेंबर रोजी व्यवसायाच्या क्षेत्रांचा विचार करा. देव, धार्मिक काम करणार्यांना इतरांकडून योग्य तो मान मिळेल. तुमची इच्छाशक्ती, व्यवसायाची कुवत, त्यातून होणारे फायदे भाग्योदय या सर्वाना राहु मदत करत आहे तरी विचार पक्का करा.
वृषभ:- आजच्या कुंडलीत तुमची रास ही व्यवसायाच्या स्थानी असल्याने ६ व ७ सप्टेंबर रोजी व्यावसायिक बाबतीत चांगले निर्णय घ्याल. व्यवसायासाठी सरकारी क्षेत्रे निवडल्यास चांगले यश मिळेल. ८ व ९ सप्टेंबर रोजी अध्यात्मिक अभ्यासकांनी गुरूज्ञा पाळल्यास अभ्यासाला योग्य दिशा मिळेल. ११ सप्टेंबरला सकाळपासून ते दुपारी ३.३० वा.पर्यंत मानसिक त्रास संभवतो. ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये. १२ सप्टेंबर रोजी शाब्दिक चकमकी होण्याची शक्यता आहे.
मिथुन :- ज्या कामात तुम्ही खडतर कष्ट घेतलेले आहेत त्या कामाच्या यशाकडे तुम्ही वाटचाल करत आहात याची जाणीव ६ व ७ सप्टेंबर रोजी होईल. नोकरीत आपल्या अधिकारपदाचा वापर योग्य पद्धतीने करता येईल. ८ व ९ सप्टेंबर रोजी सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना विशेष मान मिळेल. ११ सप्टेंबर रोजी नोकरी निमित्ताने लहानसा प्रवास करावा लागेल. १२ सप्टेंबर रोजी तुम्ही ज्या लाभाच्या प्रतिक्षेत आहात ते लाभाची सुरूवात होणार आहे.
कर्क :- आज ६ व ७ सप्टेंबर रोजी तुमच्या दशमस्थानातील चंद्र व तोच तुमच्या तृतीय स्थानाचा उपनक्षत्र स्वामी असल्याने व्यवसायाच्या योग्य दिशा सापडतील व भविष्यात त्या फलदायी ठरतील. वकील मंडळीनी आपल्या अभ्यासाशिवाय बोलू नये. विशेषतः क्रिमिनल क्षेत्रातील मान्यवरांनी याची दखल घ्यावी. ८ व ९ सप्टेंबर रोजी लहान भावाकडून खूप मोठी महत्त्वाची टीप मिळेल. ११ व १२ सप्टेंबर हे दोन दिवस एकमेकावर अवलंबून असतील.
सिंह :- आजच्या सूर्योदयास रवीची रास तुमच्या लग्नात असल्याने आजचा दिवस चैतन्याचा राहील. भाग्याच्या दृष्टीने व्यावसायिक योजनांचा विचार कराल. ६ व ७ सप्टेंबरपासून वडिलांचे आजारपण कमी कमी होऊ लागेल. ८ व ९ सप्टेंबर रोजी अध्यात्मात प्रगती करण्याच्या इच्छुकांना गुरूकृपेचा लाभ होईल. १० सप्टेंबर रोजी मनाची शक्ती वाढून अवघड कामेही सोपी वाटू लागतील. ११ व १२ सप्टेंबर रोजी कौटुंबिक जोडीदार तसेच व्यवसायातील भागीदार यांचे संबंध समाधानकारक सुधारतील.
कन्या :- तुमचा राशीस्वामी बुध हा रवीच्या नक्षत्रात असून रवी हा २ व ४ या स्थानांचा नक्षत्र स्वामी असल्याने बौद्धिक क्षेत्रातील कामे करण्यास हा सप्ताह अतिशय लाभदायक राहील. ५, ९, व ११ या भावांचा उपनक्षत्र स्वामी केतू आहे. श्री गुरूमाऊलीच्या कृपेने तुम्ही हाती घेतलेल्या कामाला आशीर्वाद मिळेल. शेअर बाजारातील गुंतवणूक लाभदायक राहील. १२ सप्टेंबर रोजी कोणताही निर्णय घेताना कुटुंबातील ज्येष्ठांचा व जोडीदाराचा सल्ला घ्या.
तूळ:- तुमच्या राशीला ६ व ७ सप्टेंबर तारखेचे दोन्ही दिवस सर्वच क्षेत्रात सहकारी मदत करणार आहेत. ८ सप्टेंबरला तुमच्या व्यावसायिक विचारांना मूर्त रूप देण्यासाठीचे प्रयत्न फलद्रूप होतील. १० सप्टेंबर रोजी बँक कर्मचार्यांचे कष्ट वाढणार आहेत. कलाकार, चित्रकार यांना ११ सप्टेंबर रोजी विशेष मान मिळेल. ११ सप्टेंबरच्या दुपारनंतर ते १२ सप्टेंबरपर्यंत मौल्यवान खरेदी लाभदायक ठरेल. विशेषतः महिला आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करू शकणार आहेत.
वृश्र्चिक:- ६ व ७ रोजी नोकरीत तुमच्या विषयीची काही महत्त्वाची चर्चा कळेल. महिला वर्गाने त्यावर काहीही कॉमेंट्स करू नयेत. ८ सप्टेंबर रोजी सरकारी कामातून लाभ संभवतो. तसेच सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या व्यावसायिकांना चांगल्या यशाचा मार्ग सापडेल. १० सप्टेंबर रोजी व्यवसाय बदलाचे विचार मनात येतील. पण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय निर्णय घेऊ नये. १२ सप्टेंबरचा दिवस मात्र अतिशय कष्टाचा व धावपळीचा जाईल.
धनु :- आजच्या सकाळपासूनच नोकरीतील अधिकार, व्यवसायातील लाभ यांची गणिते सुरू होतील. अधिकाराचा गैरवापर केल्यास कायदेशीर बाबी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. १० व ११ सप्टेंबर रोजी संततीकडून आनंदाच्या बातम्या कळतील. ऑन लाईन सेमिनारमधील तुमचा सहभाग उल्लेखनीय ठरेल. तरूण वर्गास वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. १२ सप्टेंबरच्या मिटींग्ज, महत्त्वाची बोलणी यामधे बोलण्यात सौम्यता आवश्यक राहील.
मकर :- ६ व ७ सप्टेंबर रोजी विजेच्या उपकरणांपासून धोका संभवतो तरी काळजी घ्यावी. इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेतलेल्यांनी धरसोड वृत्ती करू नये. वयस्कर व्यक्तींनी मानसिक शांतीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या श्री कुलदेवतेची उपासना, नामस्मरण याच्या सहाय्याने मानसिक व्याधीवर उपाय होईल. शेतजमिनीच्या विक्रीचा विषय ११ किंवा १२ सप्टेंबर रोजी फायनल निर्णयाला जाईल. कुटुंबाचा विचार आवश्यक राहील. घाई करू नये.
कुंभ :- ६ व ७ सप्टेंबर रोजी होणारे लहान भावंडांचे सहकार्य कायमचे लक्षात राहणारे ठरेल.८ सप्टेंबर रोजी करावयाची कामे व मेहनत विचार करून करावीत कारण त्याबाबतच्या निर्णयातच बदल होण्याची शक्यता आहे. वैयक्तीक व्यवसायाची जागा, दुकान याबाबत काहीतरी कायदेशीर बाब कानावर येईल. १२ सप्टेंबर रोजी शेअर्समधील गुंतवणूक द्विधा मनस्थिती निर्माण करेल. औषधांच्या शेअर्समधून लाभ होईल.
मीन :- ६ व ७ सप्टेंबर रोजी हातातील पैशाला वाट फुटेल. शुक्राच्या नक्षत्रातील गुरू फारसे समाधान देणार नाही. नोकरीच्या ठिकाणी विनाकारण स्त्री व पुरूष यांना एकमेकांविषयी आदराची भावना वाटणार नाही. तरी दोन हात दूरच रहावे. ८ सप्टेंबर
रोजी विवाहेच्छुक तरूणांना आपल्यापेक्षा थोडी मोठ्या वयाची मुलगी पसंत पडेल. ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्यावी. ११ सप्टेंबर रोजी पती-पत्नीच्या व्यवसायात एकदम मोठा लाभ होईल.
|| शुभं – भवतु. ||
Chhan Mahiti, thank you