weekly-horoscope-2020

रविवार ६ सप्टेंबर २०२० ते शनिवार १२ सप्टेंबर २०२० – हा आठवडा सर्वच राशींना समाधानकारक

Read In

 

 

रविवार ६ सप्टेंबर २०२० ते शनिवार १२ सप्टेंबर २०२०

साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.

weekly-horoscope-2020या सप्ताहात मेष, वृषभ व मिथुन या राशीतून चंद्र भ्रमण करणार आहे. ६ सप्टेंबर रविवार रोजी मेष अश्विनी, ७ सप्टेंबर सोमवारी मेष भरणी, ८ सप्टेंबर मंगळवारी मेष १५.०८, पर्यंत व भरणी ०८.२४ पर्यंत. नंतर कृत्तिका. ९ सप्टेंबर बुधवारी वृषभ कृतिका ११. १४ पर्यंत, १० सप्टेंबर गुरूवार वृषभ २६.३६ पर्यंत, रोहिणी १३.३७ पर्यंत, ११ सप्टेंबर शुक्रवार मिथुन मृगशीर्ष १५.२३, १२ सप्टेंबर शनिवार मिथुन आर्द्रा १६.२३पर्यंत.

 

मेषः या सप्ताहात ६ व ११ सप्टेंबर रोजी देवगणी नक्षत्र असल्याने सात्विक कामे करायला हरकत नाही. ८सप्टेंबर रोजी महत्त्वाची कामे करू नयेत. तसेच आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर काही गैरसमजुतीतून वाद निर्माण होऊ शकतो, तरी बोलण्यात नियंत्रणाची आवश्यकता आहे. ७, ८ व ९ सप्टेंबर रोजी व्यवसायातून येणारे धन प्रथम गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी वापरा. अन्यथा त्या धनाचा उपयोग सुखावह होणार नाही. ११ सप्टेंबर रोजी संततीच्या प्रगतीबाबत त्याच्याकडून आढावा घ्यावा.. तसेच त्याला दिले जाणारे पैसे कोणत्या कारणासाठी खर्च होत आहेत याची माहिती घ्यावी. १२ सप्टेंबर रोजी संपत्तीच्या वागण्याचा, त्याच्या सवयीचा मानसिक त्रास जाणवेल. रविवारी येणारे अश्विनी नक्षत्र कार्यसिद्धी करेल.

 

वृषभः व्यवसायात अचानक पैसे येथील. पण त्याचा संदर्भ लागणार नाही. अध्यात्मिक अभ्यासकांना अतिशय चांगला येईल. ६ सप्टेंबरच्या अश्विनी नक्षत्रापासून उपासनेस प्रारंभ करावा. ७ व ८ सप्टेंबर रोजी मनाला सुख व आनंद देणार्‍या गोष्टी घडतील. आरोग्यात सुधारणा होईल. ८ सप्टेंबरच्या सकाळनंतर ते ९ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत अडकलेल्या सरकारी कामात हात घालावा. कुटुंबाच्या मुलांच्या आजारपणाची काळजी वाढेल. ज्या कामाचा निश्चय केला असेल त्या कामाची सुरूवात १० सप्टेंबरला १.३० पर्यंत केल्या हमखास यश मिळेल.९ सप्टेंबरच्या दुपारनंतर मात्र गुंतवणूक, खरेदी, नव्याने औषध घेणे यासारखी कामे करू नयेत.

 

मिथुन: मानसिक चिडचिड, उगाचच आरोग्याची तक्रार व मनातील निरूत्साहामुळे काम करावेसे वाटणार नाही. ५ व ६ सप्टेंबरच्या जागरणाने मानसिक अस्वस्थता वाढेल. ९ व १० सप्टेंबरच्या सात्विक शांत मनोवृत्तीच्या मित्र मैत्रिणींबरोबर बोला. मनावरील भार हलका होईल. ८ सप्टेंबरच्या सकाळ नंतर ते ९ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत नोकरदारांना वरिष्ठांना स्पष्टीकरण द्यावे लागेल. तसेच व्यावसायिकांना सरकारी नोटिशीला सामोरे जावे लागेल. १० सप्टेंबरची संध्याकाळ विशेष समाधान देईल व कुटुंबातील वातावरण आनंदाचे ठेवेल. ९ सप्टेंबर रोजी महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करू नयेत व नवीन मशीनरीची सुरूवात करू नये.

 

 

कर्क: व्यवसायातील चढउताराने नाराज होऊ नका. तुमची परिस्थिती इतरांपेक्षा खूपच चांगली आहे. देव तारी त्याला कोण मारी हे लक्षात ठेवून देवावर म्हणजेच कष्टावर व कर्मावर श्रद्धा ठेवा. ६ सप्टेंबर रोजी अनपेक्षितपणे एखादी मदत मिळेल व अडचण दूर होईल. ७ व ८ सप्टेंबर रोजी कामाला थांबवा.१० सप्टेंबर रोजी भाग भांडवलाचा अभ्यास करा व मगच बँकेची मदत मागा. ओव्हर ड्राफ्ट, लोन कशाची तरी सोय होईल.११ सप्टेंबरला कर्मावरचा विश्वास दृढ करणार्‍या घटना घडतील. १२ सप्टेंबरला सप्ताहाच्या शेवटी तरी मन शांत

करणार्‍या घटना घडतील. वयोवृद्धांनी आरोग्याची काळजी घ्यावी. खोट्या आत्मविश्वासात राहू नये.

 

सिंहः सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आर्थिक विवंचना जाणवेल. शाळा कॉलेजच्या मुलामुलींनी कोणत्याही स्वरूपातील पैजेच्या गोष्टी करू नयेत. स्वतः खंबीर नसेल तर आपल्या बरोबर कोणीही नसेल हे लक्षात ठेवा. ८ व ९ सप्टेंबर रोजी वडिलांकडून ओळख मिळून काम सुकर होण्याचे संकेत मिळतील. जुने येणे तसेच एखादे बँकेच्या रिकरींग वा एफ.डी.च्या माध्यामातून मोठी आर्थिक सोय होईल. १० सप्टेंबरचा गुरूवार आनंदाची बातमी घेऊन येईल व प्रत्यक्ष श्री दत्तगुरूंची कृपा होईल. ११ सप्टेंबरपासून आशेचा किरण दिसेल व कामाला हुरूप येईल.

 

कन्या : जे कोणी आजारी आहेत ते परमेश्वरी कृपेने चांगले बरे होऊन लवकरच घरी येतील. ७, ८ सप्टेंबरपासून प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. ९ सप्टेंबर रोजी मात्र काही प्रमाणात काळजी घ्यावी लागेल. १० सप्टेंबर गुरूवारच्या अष्टमी तिथीचा व १२ सप्टेंबरच्या आर्द्रा नक्षत्राचा स्वामी श्री शिव असल्याने तो संकटाचा नाश करणार आहे. १० सप्टेंबर रोजीचे वृषभेतील रोहिणी नक्षत्र वडिलांच्या आशीर्वादाने व मदतीने भाग्योदयाचे संकेत मिळतील. तरूणांना मुरड घालणे म्हणजे काय याचा अनुभव येईल. शेअर्समधून धनलाभ संभवतो.

 

तूळ : कुटुंब, व्यवसाय याची गल्लत करू नका. श्री गुरूमाऊलीच्या कृपेने हा सप्ताह चांगलाच भरभराटीचा जाणार आहे. तूळ स्वाती नक्षत्र असलेल्यांना दैवी कृपेचा लाभ होईल. ६ व ७ सप्टेंबर हे दोन्ही दिवस अचानक धनलाभाचे आहेत. ८ सप्टेंबर रोजी कोणताही सरकारी नियम तोडू नका. दंड भरावा लागेल. ८ सप्टेंबरच्या सकाळनंतर ते ९ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत लहान मुलांना व वृद्धांना अग्नीपासून सांभाळावे लागेल. ११ सप्टेंबर रोजी पुढील घडणार्‍या सर्वच बर्‍या वाईट घटनांचा अचानक अंदाज येईल. खाजगी नोकरदारांना बदलीच्या ठिकाणी जावे लागेल.

 

वृश्चिकः बर्‍याच दिवसांपासून चाललेली तब्बेतीच्या तक्रारीत सुधारणा होऊ लागेल. ७ व ८ सप्टेंबरपासून डोकेदुखी, पोटदुखी हा त्रास कमी होऊ लागेल. तरूण वर्गाला हार्मोन्स इम्बॅलन्समुळे होणार्या त्रासावर उपाय मिळेल. तसेच ५० वयाच्या स्त्रियांना मोनोपॉजचा त्रास नाही ना याची खात्री करू घ्यावी. तब्बेतीत उष्णता वाढेल. संपत्तीचा लोभ

आवरता येणार नाही. सरकारी नोकर, पोलीस खाते व सर्वानीच आर्थिक व्यवहार जपून करावेत. पुरूषांना सासुरवाडीकडून आर्थिक गिफ्ट मिळेल. १२ सप्टेंबर रोजी श्री शंकराच्या कृपेने भाग्योदयाची चाहूल लागेल.

 

धनु : लहान वयाची मुले व तरूण वर्गास अचानक खोटे बोलावेसे वाटेल. ६ व ७ सप्टेंबर रोजी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विद्यार्थांना संस्थेच्या काही छुप्या गोष्टींना सामोरे जावे लागेल. लहान मुलांचा लहरीपणा वाढेल. कौटुंबिक जीवनात पतीपत्नीमधे वाद निर्माण होतील. ९ सप्टेंबरला मन शांत ठेवून विचार करा. आज तुम्हाला फक्त स्वतःवरच प्रेम करावेसे वाटेल. तरी जोडीदाराने समजून घेणे महत्त्वाचे राहील. राजकीयदृष्ट्या आज गैरसमज वाढवणारा दिवस आहे तरी मौन बाळगा. व्यवसायात नवनवीन योजना आखण्याची कल्पना लाभदायक ठरेल.

 

मकरः ६ व ७ सप्टेंबर रोजी आईच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागणार आहे. घरातील एखादा पाळीव प्राणी हरवेल वा पळून जाईल. संततीच्या डिमांडस् पूर्ण करताना त्यांना वस्तुस्थितीची कल्पना द्या. ८ व ९ रोजी त्या बंड करतील. तुमच्या वागण्यातील पारदर्शकपणा, मेहनती वृत्ती समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवेल. आजोळकडील नात्यात काही कारणाने दुरावा येईल किंवा त्याच्या तब्बेतीची काळजी वाढेल. ११ व १२ रोजी व्यवसायानिमित्ताने एखादी व्हिजीट करावी लागेल त्यासाठी प्रवास करावा लागेल, प्रवासात त्रास संभवतो.

 

कुंभ : ६ व ७ सप्टेंबर रोजी संततीच्या चुकीच्या सवयींवर पांघरूण घालू नका. भावाकडील चौकशी करा त्याला तुमच्या मदतीची गरज असणार आहे. कुटुंबात पोटदुखीचा त्रास असल्यास दुर्लक्ष करू नये. सुख व समाधानाच्या खोट्या कल्पना दूर होतील. ११ व १२ सप्टेंबर रोजी जुळलेल्या प्रेमात दुरावा येण्याचे संकेत आहेत तरी आत्मचिंतन करा. शेअर मार्केटमधून फायदा होणार नाही तरी व्याप करू नये. घराचा व्यवहार नियोजित वेळेत होणार नाही तरीही मानसिक शांती ठेवावी लागेल. १० सप्टेंबरच्या केसचे कोर्टकचेरीतील काम तुमच्या बाजूने पुढे सरकेल.

 

मीन : ६ व ८ सप्टेंबर रोजी नोकरदार वर्गास महिन्याच्या वेतनामध्ये अचानक होणारा बदल सहन करावा लागेल. कोणत्याही प्रकारचे बंड करू नये. सुखस्थानातील राहू रोजी या नक्षत्रात असल्याने तुमच्या विरोधाचा तुम्हालाच त्रास होईल. ९ तारखेला नोकरीत बदल करावा वाटेल पण सध्या नवीन नोकरीचे योग नसल्याने शांत रहावे. नोकरीबरोबर जोडधंदा असणार्‍यांना नोकरीतील पैसा व्यवसायात लावावा लागेल. ११ व १२ रोजी एखादी अफवा कानावर येईल. वयस्कर मंडळीनी १२ सप्टेंबर रोजी आरोग्याची काळजी घ्यावी.

|| शुभं – भवतु ||

One thought on “रविवार ६ सप्टेंबर २०२० ते शनिवार १२ सप्टेंबर २०२० – हा आठवडा सर्वच राशींना समाधानकारक

  1. खुप छान. दिलासा मिळाला इतके सकारात्मक वाचुन

  2. Khup mast.. kharr aahe sagle… Thank you so much for sharing this… Please add me in WhatsApp group if you have any.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *