Read In
दैनिक राशीफल शनिवार ५ सप्टेंबर २०२०.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
शनिवार ५ सप्टेंबर २०२० आजचे भविष्य
आज तृतीया १६.३८ पर्यंत, नंतर चतुर्थी. चंद्रनक्षत्र रेवती २६.२० पर्यंत. गंड योग १४.३८ पर्यंत, चंद्र रास मीन २६.२० पर्यंत.
संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय २०.५५
दिनविशेष :– .भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो
आजचे नक्षत्र रेवती आहे. नक्षत्र मालेतील शेवटचे नक्षत्र. हे नक्षत्र मीन राशीत येत असून याचे चारही चरण मीन राशीत येतात. या नक्षत्राचा गुण कामदायक शुभ असून याचा स्वामी सूर्य आहे. हे नक्षत्र मृदू, स्थिर व ‘अंधलोचन’ आहे. ‘अंधलोचन’ म्हणजे या नक्षत्रावर वस्तू हरवली असता ती लवकर सापडते. या नक्षत्रातील तार्यांची संख्या ३२ आहे. या नक्षत्रावर सोने, चांदी, मोती, पोवळे धारण करण्यास, नव्याने औषध घेण्यास तसेच विवाह, मुंज, लहान बाळास अन्नाची सुरूवात करण्याकरिता शुभ आहे.
मेष:- तुमच्या वागण्यात लहरीपणा जाणवेल. क्षणात राग वाढेल पण कमीही लगेच होईल. प्रवासाची गरज वाटेल पण प्रवास अतिशय कष्टप्रद होणार आहे तरी शक्यतो टाळा. व्यवसायातील निर्णय जरा सबुरीने घ्या. नोकरीत अवघड प्रश्नही चुटकीसरशी सोडवून कौतुकास पात्र व्हाल.
वृषभ :- राजकीय व्यक्तींना गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. सासुरवाडीकडून काही कारण नसतानाही विशेष आर्थिक भेट मिळेल. गणित शाखेच्या विद्यार्थांचा सत्कार सन्मान होईल. गर्भवती स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. मोठ्या भावंडाकडून शाबासकी मिळेल.
मिथुन :- स्वभावात अचानक चिडचिड वाढेल. मनाला बेचैनी येईल. आईकडील बुद्धीचा वारसा प्रतिष्ठा वाढवेल. शिक्षक मंडळीना उत्तम कारकिर्दीबाबत मान मिळेल. सिनेनाट्य कलाकारांचे कौतुक होईल. पायांची काळजी घ्यावी लागेल.
कर्क :- आजचा दिवस एकदम सुखात व आनंदात जाणार आहे. दिवसभर फोन, मेसेज व कौतुकांनी मन सुखावेल. आजोळकडील नात्यांची काळजी वाढेल. विद्यार्थी वर्गाची महत्त्वाकांक्षा वाढेल व त्यानुसार नियोजन कराल. महिलांना नियमात विशेष सवलतींचा कोम्बो मिळेल.
सिंह :- पैशाचे येणे वसूल झाल्यामुळे चिंता मिटेल. अडचणीच्या काळात आपले व परके यांची चांगली ओळख पटेल. स्वभाव उतावळा बनेल. दुध मिठाईसारख्या पदार्थाने पचनक्रिया बिघडेल. लहान मुलांना अग्नीपासून जपावे लागेल. तरूणींनी प्रेमात गैरसमज निर्माण होऊ देऊ नयेत.
कन्या :- प्रेमाने व समजूतदारपणाने नात्यातील तिढा सोडवाल. तरूण वर्ग काव्यवाचन, ललित लेख यात नंबर मिळवतील. लहान मुले शक्तीपेक्षा युक्तीने स्पर्धा जिंकतील. विवाहेच्छुकांनी तडजोडीचा विचार ठेवल्यास कार्य साधेल. प्रवासाचा बेत रद्द करावा लागेल.
तूळ :- कामातील कष्टाची प्रवृत्ती अतुलनीय ठरेल. तब्बेतीची तक्रार जाणवेल. वडिलांच्या व्यवसायात हातभार लावावा लागेल. बँकेतील कर्मचारी वर्गास मानसिक तणाव येईल. शेअर्समधील गुंतवणूक लाभदायक राहील. आजचा दिवस अतिशय आनंदाचा व सुखाचा जाईल.
वृश्चिक :- कलाकार मंडळींचे मनोधैर्य खचणार्या घटना घडतील. कुटुंबात मंगलकार्याचे नाद उमटतील. बुद्धीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा विशेष मान सन्मान होईल. बर्याच दिवसांपासून ज्या गोष्टीची काळजी करत होता तो बार फुसका निघेल.
धनु :- श्री दत्त महाराजांच्या उपासकांनी महाराजांचे नामस्मरण करावे. त्वचा रोगावर लवकरच उपाय सापडणार आहे. लहान मुलांना विजेच्या उपकरणांपासून जपावे लागेल. प्रतिष्ठेला बाधा येईल असे काहीही घडणार नाही याची काळजी घ्या.
मकर :- कुटुंबात एकवाक्यता राहण्यासाठी सर्वांचा प्रयत्न महत्त्वाचा ठरेल. चर्चेने समस्येवर मात कराल. जुने येणे अचानक वसूल होईल व व्यवसायातील भागीदार स्वेच्छेने मदतीचा हात पुढे करतील. तुमच्या वागण्यातील पारदर्शकपणा तुमची प्रतिष्ठा वाढवेल.
कुंभ :- नोकरीत सहकारी वर्गाची चांगली मदत मिळेल. व्यवसायात नवनवीन योजना आखण्याची कल्पना लाभदायक ठरेल. विशेषतः महिला व्यावसायिकांना अडचणी दूर झाल्याचे जाणवेल. शिक्षक, प्रोफेसर, गणिततज्ज्ञ व चित्रकार यांचा मानसन्मान होईल.
मीन :- बौद्धिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवल्यामुळे सत्कार होईल व प्रतिष्ठा वाढेल. पती-पत्नीच्या समंजसपणातून एक नवा आदर्श निर्माण होईल. बर्याच दिवसापासून रखडलेल्या कामाला आज सुरूवात केल्यास कामाला वेग येऊन लवकर पूर्ण होईल.