दैनिक राशिफल – शुक्रवार 4 सप्टेंबर 2020
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
आज मोठी उद्धोगाची संधी, जुने येणे, समाजाकडून मानसन्मान तर सासुरवाडीकडून भला मोठा धनलाभ होणार आहे. बघा आपल्या ग्रहांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्या.
आज द्वितीया14. 23 पर्यंत, चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा 23.27 पर्यंत, चंद्र रास मीन, सुर्योदय 06.26 , सूर्यास्त 18.49.
आज उत्तरा भाद्रपदा हे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी शनी असून उत्तराभाद्रपदाचे चारही चरण मीन राशीत येतात. हे नक्षत्र मनुष्य गणी असून ऊर्धमुखी नक्षत्र आहे. जेव्हा हे नक्षत्र तृतीया या तिथीला येथे त्या दिवशी कोणतेही शुभ काम करू नये. विशेषतः या नक्षत्रावर कावीळ, जुलाब किंवा कानाचे विकार होतात.
टीप :-आर्थिक बाबतीत फसवणूक करणारे हे नक्षत्र आहे तरी गुंतवणुकीचे व्यवहार करू नयेत.
मेष :-तुमच्या व्ययस्थानी या नक्षत्राचा संबंध येत असल्याने हाँस्पिटलमधील आयसोलेटेड विभाग, सँनिटायझेशन किंवा वृद्धाश्रमाशी संबंध येईल. व्यवसायात गुंतवणूक करू नये. महत्वाच्या कामाची जबाबदारी स्विकारली जाईल. तुमच्या कर्तबगारीनुसार उद्धोगाची संधी चालून येईल.
वृषभ :- विद्यार्थी वर्गाला चमकण्याची संधी मिळेल. तरूणांना सूचक दृष्टांत वा सूचक स्वप्ने पडतील. अध्यात्मिक क्षेत्राची गोडी व ओढ वाटेल. उसने दिलेल्या पैशासाठी एक साधा फोन केलात तरी काम होउन जाईल. कलाकार मंडळींचे समाजाकडून कौतूक होईल.
मिथुन :– आजचे नक्षत्र तुमच्या व्यवसायाशी संबंधित असूनही उत्पादन व व्यापार या बाबतची चर्चा करू नये फलद्रूप होणार नाही. प्रकाशक संस्थानी सकारात्मक विचार केल्यास भविष्यात फायदा होईल. विवाह, भागीदारी, किंवा कोर्टातील कामाबाबत चांगल्या घडामोडी होतील.
कर्क :-अचानक आपल्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाच्या व्यक्तिशी भेट होईल. व कामाबाबतची चर्चा फलद्रूप होताना दिसेल. सार्वजनिक कामात पुढाकार मिळून अधिकारात वाढ होईल. लेखक, वक्ते यांना वेबिनारच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधता येईल.
सिंह :- व्यापारी लोकांना धाडसाचे व्यवहार करावेसे वाटतील. व्यवहारातून फायदाही होईल पण व्यवहार तपासून मगच करा. वृद्धाश्रमाशी संबंध येईल. तब्बेतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. हाती घेतलेल्या कामातून मिळणार्या फायद्याची परफेक्ट कल्पना येईल.
कन्या :- अती उत्साहाने नावडत्या कामातही गुंतून जाल . स्वतंत्र व्यावसायिकांना सरकारी योजनेचा लाभ घेता येईल. कामाचे महत्व ओळखूनच पैसे खर्च करा. पैशाची आवक वाढणार आहे पण नियोजन आवश्यक राहील. राजकीयदृष्टय़ा आज मौन बाळगणे महत्वाचे आहे.
तूळ :- व्यवसायात शेअर बाजारातून अचानक नफा होईल. सामाजिक कामासाठी मोठी पदरमोड करावी लागेल. लहान भावंडाच्या तब्बेतीची काळजी वाढेल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. विद्यार्थ्यांना आपले विशेष कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.
वृश्र्चिक :– रखडलेल्या कामात गती येउन काम मार्गी लागेल. लहान वयाच्या मुलांचे पडणे धडपडणे होउन दुखापत होईल. वडिलार्जित इस्टेट विकण्याचे बेत ठरतील. विलंबी दुखणे असल्यास आता थोडेच दिवस सहन करावे लागतील. 19 तारखेपासून बदलणारा राहू त्रास कमी करणार आहे.
धनु :– अती विचार करण्याने कोणताच निर्णय घेतला जाणार नाही. सहजपणे एखादा उद्धोगधंदा चालून येईल. कोणत्याही बंद पडत आलेल्या व्यवसायाचा उत्कर्ष करू शकाल तरी विचार करावा. शेअर बाजार दुपारनंतर फायदेशीर राहील. पतिराजांना स्त्रीहट्ट पुरावावा लागेल.
मकर :- हातातील कामाचे योग्य नियोजन केल्यास कामाच्या यशाची काळजी करण्याचे कारण नाही. कामातील फायदा व जबाबदारी यांची सांगड घालू नका. सरकारी पत्राच्या उत्तराची वाट बघूनच निर्णय घ्या. जेष्ठ व तज्ञांबरोबर चर्चा करून मगच निर्णय घ्या.
कुंभ :- शततारका नक्षत्र असलेल्यांनी राम भरोसे निर्णय घेऊ नयेत. मानसिक शक्ती वाढेल. सरकारी अडकलेल्या कामाकडे लक्ष दिल्यास काम होईल. विवाहेच्छुनी अंदाज बांधण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेतली तर सोन्याची संधी सुटणार नाही. नोकर वर्गाचा प्रामाणिकपणा जाणवेल.
मीन :– बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना सन्मान मिळेल. शास्त्रीय विषयाच्या शोधांस व अध्ययनास विशेष मान सन्मान करण्यात येईल. धर्मार्थ संस्थेच्या अधिकारी वर्गाचे समाजाकडून कौतुक होईल. सासुरवाडीकडून सन्मानार्थ धनलाभ होईल.