daily horoscope

दैनिक राशिफल – गुरूवार 3 सप्टेंबर 2020

आजपासून होतेय धनलाभाला सुरूवात, बघा आपली रास काय म्हणतेय

 कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

 गुरूवार 3 सप्टेंबर 2020 आजचे भविष्य

daily horoscope

आज प्रतिपदा दुपारी 12.36 पर्यंत,  चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा 20.50.पर्यंत, चंद्र रास कुंभ दुपारी 14.13 पर्यंत. द्वितीया श्राद्ध. सुर्योदय 6.26 व सूर्यास्त. 6.49.

आज पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र आहे व ह्या नक्षत्राचा स्वामीगुरू आहे. या नक्षत्राचे ३ चरण कुंभेत येत असून शेवटचे चौथे चरण मीन राशीत येथे. ज्यांचे चंद्रनक्षत्र  पूर्वा भाद्रपदा आहे त्यांना जून्या कामातील प्रगतीने समाधान मिळेल. व जूने येणेही येईल. आरोग्याचे नियम काटेकोरपणाने पाळावे लागतील

टीप :- पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र उग्र असल्याने या नक्षत्रावर कोणतीही आर्थिक शुभ कार्ये करू नयेत. .

पण गणितारंभासाठी हे नक्षत्र चांगले आहे.

मेषः– हातातील काम कितीही अवघड असले तरी काम करण्याची उमेद वाढणार आहे.   रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. उत्पन्नाचे विविध मार्ग समोर येतील. वडीलधारयांकडून उपदेशाचे डोस मिळणार आहेत. तरी चुकीचे समर्थन करू नका.पुढील घटनांची सूचकता मिळेल.

वृषभ:- व्यवसायात अचानक मदतीचा हात पुढे येईल. सरकारी अडकलेल्या कामाकडे लक्ष दिल्यास मनस्ताप वाचेल. वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत वरीष्ठांकडून खडे बोल ऐकावे लागतील. उसने दिलेले पैसे  परत येतील.

मिथुन :आज आळस झटकून कामाला लागावे लागेल. कामात, प्रवासात सहकार्‍यांची मदत मिळेल.  आपण कायद्याच्या कचाट्यात अडकत नाही ना याची दक्षता घ्या.  अध्यात्मिक अभ्यासा विषयी उत्सुकता वाढेल. व्यवसायातील भागिदाराचे वागणे शंकास्पद राहील.

कर्क:- बर्‍याच दिवसानंतर पतीपत्नीमध्ये एकवाक्यता राहील. अपेक्षित यशाचा व उत्पन्नाचा मार्ग दिसेल. व्यवसायात व व्यवहारात  चोख रहा. अध्यात्मिक व्यक्तिंना योग्य दिशा सापडेल. नियोजित काम वेळेवर व सुखरूपपणे फार पडेल.

सिंह :- ज्यांचे नोकरीतील पगार वा कष्टाचे येणे बाकी आहे त्यांना पैसे मिळतील. आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका. फारसे यश येणार नाही. चार्टर्ड अकौटंट, वकील यांचे जूने येणे  वसूल होईल. आजचा दिवस आनंदात व ऐहिक सुखाचा जाईल. ताप येण्याची शक्यता आहे तरी आरोग्याची काळजी घ्यावी.

कन्या :- कामात अतीउत्साह वाटून  उमेदही वाढेल. तूमच्याकडून एखादे कर्तबगारीचे काम होईल. पोलीसांचे  वरिष्ठांकडून कौतूक होईल. मात्र संतती विषयी चिंता निर्माण होईल. व्यवसाय किंवा शेअर्समधे आज गुंतवणूक करू नका. कुटुंबात वादग्रस्त विषय त्रास देतील.

तूळ :- महत्वाचा पत्रव्यवहार करा. नातेवाईक व भाऊबंद यांचेबरोबरील संबंध सुधारण्याची संधी आहे. तरी संपर्क करा. आजारी व वयस्कर नातेवाईकांची चौकशी करा. गेल्या बर्‍याच दिवसांचा शीण घालवण्यासाठी विश्रांतीची गरज भासेल.

वृश्र्चिक :- नोकरीतून निवृत्त होत असाल तर जवळपास बदली मिळेल. आर्थिक गणिते सुटण्याचीचिन्हे दिसतील. नातेवाईकांसाठी मोठा खर्च केला जाईल. कलाकार मंडळीना मानसिक त्रास देणार्‍या घटना घडतील. स्वतः वाहन चालवून प्रवास करू नये.

धनु :- सर्व कंसेप्टस् क्लीअर असूनही अचानक विचारांचे द्वंद माजेल. आज कोणताच निर्णय घेउ नका. संततीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शेअर बाजारातील परिस्थिती तुमचे नुकसान दर्शवते. अचानक तुमच्या बाबतीत गैरसमज निर्माण होतील.

मकर:- हाती घेतलेल्या कामाबाबत चिंता निर्माण होईल. दूरदर्शी धोरण स्विकारा. छुपे शत्रू मागे हटतील व तुम्हालाही त्यांचा आवाका कळेल. व्यवहारातील गुप्ततेचे महत्व ओळखा. पत्रव्यवहार व लेखी कामे करू नका. कुटुंबात वादग्रस्त विषय त्रास देतील.

कुंभ :- पुढील घटनांबाबत सूचकता जाणवेल. स्वतःचे अनुभव शेअर करू नका. स्नेही लोकांपासून ही अचानक सल्लारूपी मदत मिळेल. आपण कायद्याचा भंग करत नाही याची खात्री करा. प्रेम प्रकरणात विश्वासार्ह घटना घडतील. गृहसौख्य चांगले लाभेल.

मीन :- प्रवासाचा बेत रद्ध करा. व्यवसायात इतरांकडून आदर मिळेल. आपल्यामुळे गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या. सार्वजनिक ठिकाणी इतरांना आवश्यक ती मदत करावी लागेल. सरकारी कार्यालयात अडकलेले काम मार्गी लागेल.

 

 

One thought on “दैनिक राशिफल – गुरूवार 3 सप्टेंबर 2020

  1. वाह गुरु माऊली जे आम्हालाहवे होते ते सहज दिलेत. खुपच छान आणि सोपे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *