आपणा सर्वांसमोर कृष्णमूर्ती पद्धतीने रत्नांचा वापर कसा करावा हा विषय मांडण्यास मला आनंद होत आहे. आजपर्यंत या पद्धतीने पत्रिका पाहून काढलेली उत्तरे कशी बरोबर येतात हे सर्व आपल्याला माहित आहेच. त्याचबरोबर सुचवलेले उपायही काम पूर्ण होण्यास कशी मदत करतात हे ही आपण अनुभवले आहे. बर्याच दिवसांपासून “रत्नशास्त्र एक उपाय” यावर लिहायचे ठरवले होते. आज श्री गणेशाच्या कृपेने हा योग जुळून आलाय.
कृष्णमूर्ती पद्धत ही पूर्णतः नक्षत्रावर आधारलेली पद्धती आहे. यात ग्रह उच्च राशीत आहे की नीच राशीत आहे की मित्रगृही आहे यावर कोणताही फलादेश ठरत नाही. प्रत्येक ग्रह त्याच्या महादशेत – – अंर्तदशेत तसेच तो ज्या स्थानी आहे तेथील फळे न देता त्या ग्रहाचा नक्षत्र स्वामी, उपनक्षत्रस्वामी, उप-उप नक्षत्र स्वामी जेथे असेल त्या भावाची फळे देतो. आता वरील नियमानुसार त्या भावाची मदत घेतल्यास काम होण्याची पूरकता मिळते. आता प्रथम, कोणत्या भावांचा विचार कसा करावा हे पाहुया.
पारंपरिक पद्धती ः—या पद्धतीत जन्मपत्रिकेत सहा, आठ, बारा या भावांचा विचार करू नये असे मत आहे. वास्तविक यांची पण काही कारकत्व आहेतच. पण त्या भावांची रेमिडी वापरून मदत घेउ नये. पण…
कृष्णमूर्ती पद्धतीत मात्र एखादा विशिष्ट ग्रह त्याच्या महदशा, अंर्तदशेत तो ग्रह कोणती फळे देणार हे दशास्वामी व अंर्तदशास्वामी कोणत्या ग्रहाच्या सबमधे आहे यावरून ठरते. ** कृष्णमूर्ती मधे Sub Lord महत्वाचा ठरतो. या सब लाँर्ड विषयीची माहिती वेगळ्या एका लेखात बघुया. सब लाँर्ड चे जे रत्न, उपरत्न असतेत्याचाा वापर केल्यास उपयोग होतो. त्याचबरोबर रंगाचा वापरही करता येतो. आता आपण रत्नांचा विचार करूया.
एकूण नक्षत्रे २७ आहेत. त्या ती नऊ भागात विभागणी केली आहे. हे नऊ भाग सारख्याच व्याप्तीचे नसून विशोत्तरी दिशेच्या प्रमाणात आहेत. पुनः या नऊ भागांचे ८१ भाग केले आहेत. असे एकूण २४९ भाग झाले आहेत. यालाच सब सब म्हणजे उप– उप नक्षत्र स्वामी असे म्हटले आहे. याच सबचे किंवा सब – सब चे रत्न वापरल्यास खात्रीने उपयोग होतो व तसे आजपर्यंतच्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
आता प्रत्येकी ग्रहाचे रत्न, त्याचा उपयोग, त्याची कारकत्वे, त्याचे व्यवसाय, त्याच्या अंर्तगत येणारे व्यवसाय याची माहिती घेऊया.
सिंह राशीचा स्वामी रवी आहे. व रवीचे रत्न आहे माणिक. माणिक हा सर्व रत्नांचा राजा आहे.
माणिक मिळण्याची ठिकाणे – – श्रीलंका, भारत, बर्मा, साउथ आफ्रीका, टांझानिया.
विशेष सुचना ==माणिक वापरताना कधीही सिंथेटीक किंवा बनावट वापरू नये. चांगल्या प्रतीचा, नैसर्गिक वापरावा. माणिक हा त्वरीत रिझल्ट देत असल्याने तज्ञांचा सल्ला घेऊनच वापरावा.
- रवीची माहितीः—रवी हा जगाचा राजा असून तो श्याम वर्णाचा आहे. तो पूर्व दिशेचा स्वामी असून ग्रीष्म ऋतूचाही स्वामी आहे. तो वड, पिंपळ, आंबा, फणस, अशा मोठमोठ्या वृक्षांचा कारक असून त्याला क्षत्रिय वर्णाचा पुरूष मानले आहे. त्याचे डोळे पिंगल वर्णात आहेत व त्याचा स्वभाव पित्तकारक आहे. रवी हा तेज तत्त्वाचा असून आपल्या अस्थिसंस्थेवर अंमल करणारा आहे.
- कपाळदुखी, मोठा ताप, खवखव, क्षय, अतिसार यांचा कारक आहे.
- मनाची शुद्धता, आरोग्य, आवड, पित्रृदोष, आयुष्यवृद्धी डोळ्याचे विकार शत्रूपासून संरक्षण, मान सन्मान प्राप्ती, यासाठी वापरावा.
- राजकारण, शेती, सरकारी नोकरी, पुस्तक विक्रेते, डाँक्टर, कवी, इलेक्ट्रिकल काँन्ट्रँक्टर, फर्निचरचे दुकानदार व उत्पादक यांना चांगला लाभदायी असतो.
कोणी कोणत्या रंगाचा वापरावा
- गुलाबी माणिकः—ज्यांचा व्यवसाय शिक्षक, प्रोफेसर, सर्व प्रकारचे सल्लागार, यांनी गुलाबी रंगाचा माणीक वापरावा.
- लाल डार्क लालः—ज्या व्यक्ती राजकारणाशी संबंधित आहेत, ज्या प्रशासन पाहतात, डिफेन्स, आर्मी तसेच पोलीस खात्यातील कोणतेही पद असो त्यांनी लाल गडद रंगाचा माणिक वापरावा.
- डाळींबी रंगाचा माणिक – – ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यात लागणारे फंडस्, बँकांची मदत यासाठी डाळींबी रंगाचा वापरावा.
- जांभळट लाल माणिक – – जे म्युझिशीयन, आर्टिस्ट, तसेच जे मोठमोठ्या व्यावसायिकांना प्रोफेशनली सल्ला देतात, गाईड करतात त्यांनी हा जांभळट रंगाचा माणिक वापरावा.
- वरीलपैकी कोणताही माणिक वापरताना त्यासाठी सोने किंवा तांबे याचाच वापर करावा. माणिक हा कमीत कमी ३ कँरेटपर्यंतचा वापरावा.
माणिक परिधान करण्यापूर्वी त्यावर रवीच्या कोणताही मंत्राने अभिमंत्रित करून रविवारी व शक्यतो रवी आपल्या राशीला कितवा आहे हे पाहू तज्ञांच्या सल्ल्याने परिधान करावा.
वरील सर्व माहिती कोणत्याही पुस्तकातून उतरवलेली नाही. मला शिकताना ज्या पद्धतीने शिकवले आहे त्यानुसार तुमच्या समोर ठेवले आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते अवश्य कळवा. लवकरच दुसर्या रत्नाची माहितीही पाठवत आहे.
शुभं – भवतु
.
Chhan mahiti
Thank you